गेल्या वर्षीपासून आम्ही स्वयम ला डान्स क्लास चालू केला . त्या निमित्ताने एक कला त्याच्या अंगी येईल आणि व्यायाम पण होत राहील, हा आमचा हेतू होता त्यामागे .
मी स्वतः डॉ. असल्याने स्वयमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेत होते. आणि त्यानेही मला चांगली साथ दिली. त्यामुळे या वर्षभरात सतत डान्स करत राहिल्याने त्याची भूक वाढली , आहार वाढला , प्रतिकारशक्ती वाढली , तब्येत सुधारली , हे अनेक फायदे आम्हाला अनुभवाला आले.
पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो असं कोणातरी व्हाटसॲपीय विद्वानाने म्हणून ठेवलंय. या विधानामधे १००% सत्यता असून मीही त्याचा एक नरबळी आहे. कोणतीही सोंगं करता येतात पण बारीक होण्याचं सोंग करता येत नाही हे तत्वज्ञान अनुभवा वरून सिध्द झालेले आहे. आजकाल मी माझ्या वाढत्या वयाला दोष द्यावा का माझ्या कामाच्या पध्दतीला का माझ्यातल्या आळसाला हा जरी आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असला तरी वाढते वजन हा निर्विवाद राष्ट्रिय प्रश्न होऊ घातला आहे. दशवर्षीय कन्येपासून पंचषष्ठदश वर्षीय मातोश्री पर्यंत सर्वाना पडलेला हा एक ज्वलंत प्रश्न आहे.
आजारपणात काय खावे आणि आणि काय नको हा प्रश्न नेहमीच पडतो. काय खाल्ले की त्रास होतो, काय खाणे चांगले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाला चव नसताना काय घश्याखाली उतरू शकते. शेवटी अपराधी पोटाची भूक तर भागवलीच पाहिजे. पण काही पदार्थ ईतरवेळी अत्यंत आवडीचे असूनही आजारपणात तोंडाला चव नसल्याने खावेसे वाटत नाहीत, किंवा खावेसे वाटले तरी सर्दी ताप खोकल्यात चालत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आजारपणात खायचे पदार्थ ठरलेले असतात. तेच या धाग्यावर लिहायचे आहेत. कदाचित हे पदार्थ व्यक्तीपरत्वे बदलतील. एकाचे दुसर्याला चालणार नाहीत. पण चालले तर लोकांना चार अतिरीक्त पर्याय मिळतील.
घरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.
कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?
हे आहे माझ्या पुढच्या आठवड्याचे आहार नियोजन. हे नियोजन खालील गृहितकांवर आधारित आहे
काही गृहीतके :
1. मी दिल्लीला राहते. पालक, मेथी, शेपू अश्या गुणी पालेभाज्या येथे फक्त हिवाळ्यात मिळतात. बाकीचे 8 महीने केवळ फळभाज्य आणि पनीर, राजमा, छोले, डाळी यांच्या आधारे काढावी लागतात.
2. मी सकाळी 9 वाजता घरातून निघते आणि संध्याकाली 7 वाजता घरी परतते.
3. मी अत्यंत आळशी आहे. लग्नाआधी इकडची काडी तिकडे सुद्धा केलेली नाही.
4. दिल्लीत फक्त मी आणि माझा नवरा असे दोघच राहतो. आणि तो बराच समजूतदार असल्याने जेवण बनवण्याबाबत फारसा आग्रही नसतो.
मेक्सिकन स्वयंपाक कसा करावा. बेसिक माहिती व प्रमाण इत्यादींसाठी चर्चा येथे करावी. माझ्या शंका खालील प्रमाणे.
बरिटो एंचिलाडा, फाहिताज, केसाडिया हे सर्व कसे करतात. गूगल करून माहिती नक्की मिळेल पण जर घरी करतच असाल तर ते सोपे पडेल. बेसिक मसाले काय आणायचे? चिली मध्ये राजमा बीन्स वापरायच्या का तोत्तिया म्हणजे पोळीच का पातळ लाटलेली असे फार बेसिक प्रश्न आहेत. इथे फाहिताज बरोबर एक राइस
मिळतो तो फार मस्त लागतो त्याची नक्की काये रेशिपी?
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.