शेवट...
झाली बरीच माझी तारीफ सोसण्याची
त्यांना बरीच घाई , माझ्याच शेवटाची...
आले न चोर केव्हा या झोपडीत माझ्या
त्यांना नसेल बहुधा, ती जाण वैभवाची...
जेव्हा अनेक गेले आले अनेक तेव्हा
जडलीच ना कुणाशी, ती वीण काळजाची....
गर्दी बरीच जमली ढाळीत अश्रु खोटे
का नेहमीच व्हावी , ती हार वादळाची...
दिसले वनात परवा जे प्रेत चातकाचे
त्याने किती पहावी, ती वाट पावसाची...
~~ शिवम्...