गझल

हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

कडूशार

Submitted by समीर चव्हाण on 8 August, 2014 - 00:12

जगण्याची चव जात राहिली
जी तुझिया पश्चात राहिली

बोलाया बोलतो कसनुसे
की इच्छा गेल्यात राहिली

कडूशारशी सय एखादी
गोड स्मृतींच्या आत राहिली

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली

तिच्या पुढे-मागे दुनिया पण
ती कोठे कोणात राहिली

वीतभराच्या घरात वारा
आस जशी डोळ्यांत राहिली

मिणमिणणे खुपले कायमचे
झळाळी न लक्षात राहिली

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

प्रबंध

Submitted by अपूर्व on 25 July, 2014 - 08:12

चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा

येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा

ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा

एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा

झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा

विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा

माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा

- अपूर्व ओक

शब्दखुणा: 

गूढ

Submitted by समीर चव्हाण on 16 July, 2014 - 00:47

हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे

फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे

डोळ्यांत तुझ्याही इच्छा धूसर धूसर
काहीच दिसेनासे का झाले आहे

प्रेमात निखरले एके प्रतिमेचेपण
हे रंग विटेनासे का झाले आहे

हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे

सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे

विषय: 
शब्दखुणा: 

शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला

Submitted by अमित्रजित on 27 June, 2014 - 01:06

शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला
वाचले निवडक आणि आली झीट आहे

तू म्हणतोस खरा त्याची गझल निराळी
तो गझलकार एक नंबर चीट आहे

सतत जो घेतो विठ्ठलाचे नाव त्याचे
शेर वाचूनी जनतेस आला वीट आहे

कोण करेल टी़का त्याला कोपर्‍यात घे
विरोधाला रोज होते मारपीट आहे

व्याख्यान देण्याचे व्यसन लागले तुला जे
डोसक्याला लागलेली हीट आहे

बूच लावावे अता तुझ्या प्रतिभेला कसे
वाचकाचा मोड आता 'डोळे मीट' आहे

शेवट

Submitted by समीर चव्हाण on 27 May, 2014 - 04:09

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 

" गझल"

Submitted by poojas on 26 May, 2014 - 01:17

तशी ती ही कविता जरासा बदल
जिव्हारी रूते ती म्हणावी गझल..

कुणी शब्द शब्दांत घायाळ होतो
कुणी सांगता शेर होते कतल
कुणी प्रेम विरहात अव्यक्त होता
सुचे जी व्यथा ती म्हणावी गझल..

कधी शायरी केधवा फक्त ओवी
कधी चार ओळीतली दरमजल
जशी पूर्ण होता कळे चित्त आत्मा
उणे वृत्त मात्रा निनावी गझल..

मला काय भावे तिच्या कौतुकाचे
कडू बोल माझे जिथे बेदखल
मिळे दाद जेव्हा मुखाने कुणाच्या
खरी पूर्ण झाली म्हणावी गझल !!

poojaS..

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

काही म्हणू नका !

Submitted by डॉ अशोक on 18 May, 2014 - 02:54

काही म्हणू नका !

"हो" ही म्हणू नका, "नाही" म्हणू नका
मौनात राहणे, काही म्हणू नका !

हे तर खरेच की, कोणी न आपले
"ये" ही म्हणू नका, "जा" ही म्ह्णू नका !

सवालास हर एक, ना जवाब असतो
नाही लिहू नका, "कां" ही म्हणू नका !

मुक्काम गाठण्या, मार्ग अपुला ह्वा
भेटेल त्या कुणा, राही म्हणू नका

गरजूस शोधणे, ना सहज राहिले
"उठ" ही म्हणू नका, "खा" ही म्हणू नका !

-अशोक
डॉ अशोक

साग़रसाहेब

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2014 - 04:52

साग़रसाहेबांची आणि माझी पहिली भेट ९८-९९ मध्ये कधीतरी झाली. त्या भेटीबद्दल विशेषकाही सांगण्यासारखे नाही. एवढेच जाणवले की हा शायर अतिशय साधा असावा. पुढे अनेक मुशायरांमधे वरवर भेटत राहिलो. एवढे आठवते की भरतनाट्यमंदिरात विनय वाईकर आले होते. अर्थातच साग़रसाहेब पुण्यातल्या उर्दू गझलकारांमध्ये मोठे नाव असल्याने उपस्थित होतेच. साग़रसाहेबांनी स्वतःचा परिचय एक छोटा शायर म्हणून गंमतीत केल्याचे चांगले स्मरते. कार्यक्रमानंतर आम्ही ब-यापैकी गप्पा केल्या. आता नक्की आठवत नाही की त्यांच्या मीरा का दातार दर्ग्यामागील पानाच्या दुकानापर्यंत माझी मजल कशी पोहोचली.

विषय: 
शब्दखुणा: 

पळपुट्या जखमा किती..

Submitted by दुसरबीडकर on 4 May, 2014 - 07:26

पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!

मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!

लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!

आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!

ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी...
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!

कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..??

सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल