गझल

कंटाळ्याचाही कंटाळा !

Submitted by रसप on 19 June, 2013 - 06:29

कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा

एक दिवस जेव्हा सुटली नोकरी अचानक
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा

जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?

एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा

एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा

शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'

पाऊस आवडत नाही

Submitted by रसप on 15 June, 2013 - 00:41

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html

शब्दखुणा: 

पाऊस आवडत नाही

Submitted by रसप on 15 June, 2013 - 00:41

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html

शब्दखुणा: 

भांडार हुंदक्यांचे....!

Submitted by अभय आर्वीकर on 7 June, 2013 - 09:23

भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी

शस्त्र घ्यायला हवे

Submitted by अभय आर्वीकर on 4 June, 2013 - 00:00

शस्त्र घ्यायला हवे

श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे
टोचल्या फळास ठीक सावरायला हवे

शीग येइना कधीच पायलीस का इथे?
कोण लाटतोय रास आकळायला हवे

भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे

लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे

कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
झेप घेत उंच-उंच बागडायला हवे

हुलकडूबी नाव

Submitted by अभय आर्वीकर on 2 June, 2013 - 05:19

हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली

तेव्हा

Submitted by अमेय२८०८०७ on 23 May, 2013 - 10:53

काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित

शब्दखुणा: 

अकबर इलाहाबादी

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2013 - 02:28

काही वर्षांपूर्वी अकबर इलाहाबादीचा एक कविता-संग्रह माझ्या वाचनात आला. थोडा चाळल्यानंतर त्याची काही मते मला टोकाची, अपरिपक्व वाटली म्हणून तो तसाच ठेवून दिला. काही महिन्यांपूर्वी अनंतकडून अकबरचा एक शेर ऐकल्यावर खूप वाईट वाटले. बरेच दिवस ती अस्वस्थता राहिली. तो शेर (जो अकबरच्या संग्रहात फुटकर अशआर मधे सामील) आहे:

हुए इस कदर मुहज़्ज़ब, कभी घर का मुंह न देखा
कटी उम्र होटलों में, मरे अस्पताल जाकर

(मुहज़्ज़ब: सभ्य)

काही दिवसांपासून अकबर गंभीरपणे वाचताना त्याचे बरेच सुंदर शेर मला सापडले. ते सगळ्यांसोबत शेअर करावे ह्या लिखाणाचा हा एक उद्देश्य.

विषय: 
शब्दखुणा: 

मोह

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2013 - 02:28

रात्र होता आस बांधत स्वप्नतारा चमकतो ना
गंधवाही कल्पनांचा सोनचाफा उमलतो ना

एक वेडा रात्रभर का चाळतो पाने वहीची
अर्थ त्याच्या आवडीचा मग पहाटे गवसतो ना

घर कसे ओसाड वाटे, फार त्याची याद दाटे
चेहरा त्याचा मला अपरोक्ष त्याच्या रडवतो ना

मी किती ठरवून बघतो, हृदयही काढून बघतो
मोह होतो आंधळा की वाट कोणी उजळतो ना

प्रहर आहे जायचा अन ऐकते कोठे मुळी मन
राहिला मक्ता `समिर' जो कागदावर उतरतो ना

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल