साधना - १
“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत:॥“ ( गीता - ७.३)
अर्थ - हजारांत एखादाच माझ्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतो व तशा प्रयत्न करणार्यांमध्ये एखाद्यालाच माझ्या स्वरुपाचं ज्ञान होतं.
“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत:॥“ ( गीता - ७.३)
अर्थ - हजारांत एखादाच माझ्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतो व तशा प्रयत्न करणार्यांमध्ये एखाद्यालाच माझ्या स्वरुपाचं ज्ञान होतं.
समाजात राहून समाजापेक्षा वेगळंही दिसायचं, श्रेष्ठही दिसायचं आणि त्यांच्यातलंच एक आहोत हे ही दाखवायला धडपडायचं. सर्वच कर्मकांडांमागे हीच अगम्य भावना असते माणसाची. त्यातूनच वेगवेगळे पूजाविधी, देव जन्म घेतात. 'मी इतरांपेक्षा जास्त श्रद्धावान आणि परमभक्त आहे' ही भावना ही एकाच देवाच्या देवळात जमलेल्या भक्तांच्या वेगवेगळ्या आविर्भाव, हालचाली, घोषणा यांतून जाणवते. सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला.
ज्ञानेश्वरी अध्याय १५ पुरुषोत्तम योग
प्रिय अदू. . . .
काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.
|| ॐ ||
दि. २७ एप्रिल २०१६
ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!
५८ वर्षांची सर्व्हिस झाल्यावर मी रिटायर व्हायचे ठरवले. कंपनीने मला २ वर्षांचे एक्स्टेंशन दिल्यामुळे ६० वर्षांपर्यंत मी काम केले. ५८ व्या वर्षी विचार केला पुढच्या २ वर्षांत विचार करूया साठीनंतर काय करायचे! पण २ वर्षे गेली तरी माझ्या डोक्यात काहीच आलं नाही...पण २ वर्षे तर निघून गेली. आणि मी पूर्णपणे वेळ रिकामा ठेवून रिटायर झालो. अशी ही माझी रिटायरमेंटची कथा. अनेक लोकांनी अनेक प्रकरचे सल्ले दिले. कोणी म्हणाले पुण्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. रोज एकेका कार्यक्रमाला जरी गेलात तरी तुम्हाला वेळ पुरणार नाही.