झोका
°°°°°°°
झोका घेई मन
पाळण्या वाचून
आत गाते कोण
शब्दाविन॥
प्रकाश फांदीला
असंख्य सुमन
पुंज पखरण
कणोकणी ॥
नाद रुणझुण
इवली कंपण
पराची स्पंदन
भ्रमराच्या ॥
तया पाहणारा
पाहता शोधून
शून्यची संपूर्ण
दाटू आले ॥
विक्रांत वलय
विलय डोहात
तळ कातळात
घनदाट॥
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita. blogspot.com
अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत
अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्याशी थबकलो
अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग
दिशा, मिति, कालगति
कसे ठरती निरर्थ?
स्थिर, अविनाशी ऐसे
शोधू कासया मी व्यर्थ?
कार्य-कारण नियम
थिटा पडतो कशाने?
निरगाठ प्रत्यक्षाची
का न सुटते प्रज्ञेने?
अंध:कार भोवताली
कधी प्रकाश दिसेल?
श्रांत-क्लांत जिज्ञासेला
कधी उत्तर मिळेल?
गुंता गहन, कठिण
कधी सुटेल की नाही?
बाहेरचे ओलांडून
आतमध्ये आता पाही !
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ
खूप दिवसांनी काल रात्री जगजीत सिंगच्या गझल ऐकत बसले होते. आजकाल त्या वळणावर जायचं टाळतेच. एकदा का नाद लागला की मग थांबत नाही. वाटतं सर्व काम सोडून फक्त ऐकत बसावं. मग घरात काय चाललंय, पोरांना काय हवंय, स्वयंपाक, आवरणं सगळं मागे पडतं आणि कान फक्त त्याच्या आवाजाकडे लागून राहतात. शेवटी नाईलाजाने सर्व बंद करून झोपले. सकाळी मात्र गाडीत बसल्यावर लगेचच सुरु केली आणि एका पाठोपाठ गाणी सुरु झाली. कितीही वर्ष झाली असू दे ऐकून, गाणं सुरु झालं की आपोआप शब्द ओठांत येऊ लागतात आणि ते भाव मनात. त्यात आज पाऊसही होता सोबतीला. मग काय आहाच....
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!
दि. ३ जुलै २०१६
प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी!
ओशो. . . .
जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . . आयुष्याची दोन भागांमध्ये विभागणी करावी- जुलै २०१२ पूर्वी आणि जुलै २०१२ नंतर असं. . .
प्रिय अदू. . . .
काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .