ताटकळलेला बुद्ध.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
"आनंदाचे डोही आनंद तरंग "
माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.घरदार,नोकरी पैसा,गाडी,जमीनजुमला,मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस अतृप्तच असतो.कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.
अध्यात्म म्हणजे काय?२४ तास पोथ्या-पुराण करणे म्हणजे अध्यात्म नव्हे.अध्यात्म म्हणजे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
"ममैव अंशो जीवलोके,जीवभूता सनातन:
मानाशाष्ठानी इम्द्रीयांनी ,प्रकृती स्थानिकार्षति /"
तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्