मृत्यु

नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2022 - 14:01

नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला - https://www.maayboli.com/node/80784

........................................................

विषय: 
शब्दखुणा: 

मृत्यूचा दंश

Submitted by मार्गी on 26 May, 2021 - 02:21

सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही.

शब्दखुणा: 

मृत्यु

Submitted by मकु on 13 November, 2017 - 23:50

जीवनाने मृत्युला विचारले की तू प्रश्न आहेस का उत्तर
तर तो म्हणाला -
जोडीदारापैकी जो मागे उरतो त्याच्यासाठी प्रश्न,
पण ज्याच्या मरणदायी वेदना संपवतो त्याच्यासाठी उत्तर
आलो मी अकाली तर प्रश्न,
पण संपवले नकोसे वार्धक्य तर उत्तर
रोजचे जगणे ज्याचे मरते त्याच्यासाठी प्रश्न,
पण रोजचे मरण जगणार्यांसाठी उत्तर
तुझ्या सहवासाची सवय झालेल्याला प्रश्न,
आणि तू नकोसा झालेल्याला उत्तर

माझं असणं हा प्रश्न, माझं असणं हे उत्तर,
मी उत्तराचा प्रश्न, मीच प्रश्नाचे उत्तर

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई!"

Submitted by मार्गी on 8 July, 2016 - 00:50


सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.

|| ॐ ||

दि. २७ एप्रिल २०१६

ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!

मृत्यु

Submitted by अभिदेश on 14 January, 2015 - 13:52

--------------------------------------------------

(५) मृत्यु
२०-१२-२०१४
--------------------------------------------------

मृत्युच्या दारी जो उभा

त्याचा कार्यकाळ संपला ।

मृत्यु हे शेवटचे भय

ज्यात नसे कोणालाही संशय ।।१।।

जगावे कसे ते आपण ठरवायचे आहे

आनंदात हसायचे आणि दुःख पचवत रहायचे आहे ।

जीवन जगताना मृत्यु अटळ आहे

हेच एक खरे सत्य आहे ।।२।।

जो जातो तो देवाला भेटतो

सुख दुख: देवाला सांगतो ।

तारा बनून आम्हाला दिसतो

आमच्या आठवणीत तो नेहमी राहतो ।।३।।

शब्दखुणा: 

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

आस

Submitted by मोहना on 29 January, 2012 - 18:48

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मृत्यु

Submitted by सखि१२३ on 5 May, 2011 - 05:32

मृत्यु
हा येतो आपल्या घरी
पौउल न वाजवता
अनपेक्षित अश्या पाहून्चाराकारिता
वेळ साधून बरोबर हा येतो खालती
अलगद हा उचलून नेतो आपल्याला वरती
प्रत्येकाशी याची गाठ एकदा तरी पड़ते
मृत्यु या शब्दाने नुसती घाबरगुंडी उड़ते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मृत्यु