हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

Submitted by मार्गी on 29 July, 2017 - 04:30

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात. मला माहिती असलेल्या थोड्या गाण्यांमध्ये दिसलेला असा अर्थ आपल्यासोबत शेअर करतो. ही गाणी प्रसिद्ध असलेली व माझ्या अल्प श्रवणात आलेल्या थोड्या गाण्यांपैकी आहेत. अशी इतरही अनेक गाणी असू शकतील. मान्यवरांनी त्यावर प्रकाश टाकावा.

उदाहरणार्थ-

मै पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है ...

मुझसे पहले कितने शायर
आए और आकर चले गए...
कुछ आहें भर कर लौट गए
कुछ नग़मे गाकर चले गए...
वो भी एक पल का किस्सा थे
मैं भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा
जो आज तुम्हारा हिस्सा हूँ

हे गाणं तर जीवनाचं क्षणभंगुरत्व दर्शवतं. अध्यात्माचा पहिला पाठ!

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहाँ, ना महसूस हो जहाँ, ना महसूस हो जहाँ
मैं दिल हो उस मुक़ाम में लाता चला गया...
मैं जिंदगी का साथ निभाता चलाता गया…
हर फ़िक्र को धुवें में उडाता चला गया...

हे गाणं तर सगळ्या धर्माचं सार आहे. धर्मामधलं अगदी क्रीम आहे! सुख आणि दु:खामध्ये फरकच उरणार नाही अशी दिशा! ह्या गाण्याच्या सर्वच कलाकारांना नमन!

तुम पुकार लो
तुम्हारा इन्तज़ार है

हे गाणं गुरूचा शोध घेणा-या शिष्याची तगमग दर्शवतं!

चलो दिलदार चलो चाँद के पार चलो
हम है तैयार चलो
हम नशे में हैं, सम्हालो हमे तुम
नीन्द आती हैं, जगालो तुम, जगालो हमें तुम

ह्या गाण्यात शिष्य गुरूला साद घालतो आणि म्हणतो की, राजसा, घेऊन चल. मी तयार आहे. मी अंधारात आहे, निद्रेत आहे, तू मला जागं कर, घेऊन चल!

जाईए आप जहाँ जाएंगे
ये नज़र लौट के फिर आएगी
दूर तक आपके पीछे पीछे
मेरी आवाज चली जाएगी

हे गुरूने शिष्याला दिलेलं वचन असतं. जन्मोजन्मीच्या प्रवासामध्ये तू कुठेही भरकटलास, तरी मी तुला आवाज देईन. तुला मला बघण्याची दृष्टी मिळेल.

आणि जेव्हा गुरू शिष्याकडे बघतो तेव्हा-

तुमने मुझे देखा हो कर मेहेरबान
रूक गई ये जमीं थम गया आसमाँ जानेमन जानेजाँ

मेहेर म्हणजे करूणा. मेहेरबान म्हणजे करूणावान. जेव्हा करूणावान गुरू शिष्याकडे बघतो, तेव्हाच सर्व काही शांत, स्तब्ध, स्थिर होऊन जातं.

आणि मग शिष्य म्हणतो-

पड़ गई दिल पर मेरे आपकी परछाईयाँ
हर तरफ बजने लगी सैकडों शहनाईयाँ
दो जहाँ की ख़ुशीयाँ हो गई हासिल मुझे
आपकी नज़रों ने समझा प्यार के क़ाबिल मुझे

गुरूची कृपा काय बरसली, सगळा आसमंत बहरला.

दिल की ए धडकन ठहर जा मिल गई मन्ज़िल मुझे
क्यों मै तुफानों से डरूं, मेरा साहील आप हैं

जगरहाटीच्या भवसागरामध्ये आता कितीही वादळे येऊ देत, हरकत नाही.

आपकी नज़रों ने समझा प्यार के क़ाबिल मुझे
कह रही है हर नज़र बन्दा परवर शुक्रिया

एक कृतज्ञता, एक धन्यता, एक कृतार्थता.

कधी कधी गुरू असा अचानक समोर येतो- ओळखूही येत नाही, पण तरीसुद्धा-

अजनबी मुझको इतना बता दे दिल मेरा क्यों परेशान है
जैसे ऐसा लगे जैसे बरसों की पहचान है

ओळख नसली तरी जुनी गतजन्माची खूण पटते.

आणि जेव्हा शिष्याला गुरूची ओळख पटते, तेव्हा गुरू समोर शिष्य नतमस्तक होतो. शिष्याची बुद्धी, विचार, आसक्ती सर्व काही गळून पडतं व तो अचानक समर्पण करून चुकतो! करून चुकतो, कारण ते अचानक घडतं, ठरवून, सगळं तपासून घडत नाही. अचानकच घडतं.

देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान...
कदमों पे तेरे निकले मेरा दिल है बस यही अरमान...

बाकी इच्छा जाऊन आता समर्पण हीच एक इच्छा उरते.

आ चल के तुझे मै ले के चलूँ
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी ना हो, आसू भी ना हो
बस प्यार ही प्यार पले
एक ऐसे गगन के तले
जहाँ दूर नज़र दौडाए, आज़ाद गगन लहराए लहराए लहराए

आणि गुरू शिष्याला एका वेगळ्याच दिशेने नेतात जिथे फक्त आनंदी आनंद असतो; जिथे स्वातंत्र्याची वेगळी मिती असते. अशा उत्तुंग गगनी हा प्रवास घडतो.

आणि अशी वेळ येते की, शिष्य हा फक्त गुरूचं प्रतिबिंब म्हणून उरतो. शिष्याचं स्वत:चं असं काही राहात नाही.

उसके सिवा कोई याद नही, उसके सिवा कोई बात नही
वो दौड़े है रग रग में, वो दौड़े है नस नस में
अब कुछ न रहा मेरे बस में हुआ हुआ मै मस्त

आणि मग सतत हेच जाणवत राहतं-

मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए
जैसे कन्धों पे रखा बोझ हट जाए
जैसे भोला सा बचपन फिरसे आए
जैसे बरसों में कोई गंगा नहाए. . .

धुल सा गया ये मन
खुल सा गया हर बंधन
जीवन अब लगता है पावन मुझको. . .

यूं ही चला चल राही यूं ही चला चल
कौन ये मुझको पुकारे
नदियां पहाड़ झील और झरने, जंगल और वादी
इनमें है किसके इशारें . . .

समोर दृश्य कोणतंही असो, ते सगळे इशारे एकाचेच असतात.

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: http://www.niranjan-vichar.blogspot.in/

Group content visibility: 
Use group defaults

अम्म्म्म..... तुमचा लेख वाचून एक गाणं आठवलं....

रे बाबा
तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा
तुमसे मिलने को दिल करता है
तुम्ही हो जिसपे दिल मरता है इत्यादी इत्यादी

तर यातले बाबा म्हणजे शिवबाबा (प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरिय ग्यान विद्यालय फेम शिवबाबा) असे आमचे राजयोगवाले काका म्हणायचे....

असो, कुणाचं काय कुणाचं काय.

हे व्हाट्स ऍप वरून आले होते - अतिशय सुंदर निरूपण आहे

पप्पी दे पप्पी दे पारुला..
आवाज वाढव DJ तुला आईची..
चिमणी उडाली भुर्र..
पोरी जरा जपून दांडा धर..
झिंग झिंग झींगाट...

या आणि अशा अनेक भक्तीरसाने ओथंबलेल्या गाण्यांच्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती किंवा इतर सणाच्या काळात विविध चित्रपटांची गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवली जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न.

*

कामावर जायला उशीर झायला
बघतोय रिक्षावाला
बाई मज बघतोय रिक्षावाला

अतिशय भाव पूर्ण गाणं आहे.
अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही

**
बिडी जलैले जिगर से पिया ...
जिगर मा बडी आग है....

अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे.

**
आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे ...

अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे डीजे म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्या शी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगनियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय.

**
पप्पी दे पप्पी दे पारूला

अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे.

झालय झिंग झिंगाट

देवीची आरती चालू असताना जस भगत च्या अंगी येत तस तुज़्या आगमना नी मि त्या आनंदानी कोणता ही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा

याड लागल

भगवंताच्या भक्तित लोक इतके वेडे होतात घर दार संपत्ति माया मोह सगळे पाश तुटले जातात न तुज याड लागत

D j वाले बाबू मेरा गाना बजाओ

भगवंताला अत्यंत कळकळी ने सांगितले आहे या भावगीता मधे
डीजे वाले म्हणजे भगवंत
भगवंता माझी प्रार्थना तुज़्या हृदया पर्यन्त पोहचावी म्हणून तुच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण जे तुला हव

हे भाव मनात जागवत आता गणेशोत्सवातील गाणी ऐका. आता त्रास होणार नाही

माझे सगळ्यात आवडते गाणे -
रंगी को नारंगी कहे, बने दूधको खोया, चलती को गाडी कहे, देख कबीरा रोया
जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूठ क्या और भला सच है क्या!!

व्वा, अगदी खरे.

त्याचे काय आहे - वयाप्रमाणे गाण्याचे अर्थ बदलतात. काही वयात भजनात सुद्धा शृंगार जाणवतो तर काही वयात अश्लील गाण्यातहि अध्यात्म दिसते.
मला बहुधा सगळीच कडे प्रचंड विनोदच दिसतो!

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!!

@उडता डुक्कर जी, खूपच जोरदार! हासुद्धा एक नजरिया आहेच! Happy Happy तुमचं नावही खूप आवडलं! Happy