चित्रपट

ट्रॅव्हल मुव्हीज

Submitted by जाई. on 24 November, 2016 - 00:30

मायबोलीवर अश्या प्रकारचा बाफ आहे का माहीत नाही.

काल टीव्ही वर जिंदगी ना मिलेगी दोबारा बघत होते. त्या सिनेमावरून या बाफची कल्पना सुचली.
प्रवास , रोड ट्रिप , सहल ही संकल्पना असलेल्या चित्रपटाबाबत ( मराठी/ हिंदी/ इंग्लिश / अन्यभाषिक असे कोणतेही चालतील ) इथे चर्चा करू..

१) जिंदगी ना मिलेगी दोबारा--
तीन मित्र त्यांच्यापैकी एकाच लग्न ठरल्यावर त्यांनी अगोदरपासून ठरवलेल्या पिकनिकसाठी निघतात . या प्रवासदरम्यान चित्रपटाची कथा उलगडत जाते.

२) हायवे-

चित्रगीतमाला .. आमचा बिनाका व चित्रपट संगीताचा प्रवास

Submitted by preetam ranjana on 21 July, 2016 - 00:14

मित्रांनो, बिनाका गीतमालेचे बोट धरून हिंदी चित्रपट संगीताचा अभ्यास मी सुरु केला आहे. तो श्राव्य स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा धागा. आपला अभिप्राय आपले प्रश्न माझा हा अभ्यास आणखी परीपूर्ण करतील असा मला विश्वास आहे. हा अभ्यास केवळ बिनाकाच्या यादीपुरता मर्यादित नसून त्या काळातले चित्रपट व संगीत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. बिनाका चे मानांकन हे लोकप्रियतेच्या निकषावर झाले. पण आज जर या यादी कडे पुन्हा पाहिले व त्या वर्षातील चित्रपट संगीताचा विचार केला तर तुम्हाला ही यादी आज बदलावी असे वाटते का? याचाही विचार आम्ही केला आहे.

विषय: 

मी बनवलेली पहिली शॉर्टफिल्म !!!

Submitted by मी मधुरा on 5 April, 2016 - 09:58

माझा पहिला लघुपट! ☺
नक्की पहा.

Watch, like n subscribe.
400+ views & 40+ likes completed.

https://youtu.be/nYVdJOJ0p6w

"चौकटी बाहेरचा - चॉक अॅण्ड डस्टर" (Movie Review - Chalk n Duster)

Submitted by निक्षिपा on 15 January, 2016 - 02:00

"चौकटी बाहेरचा - चॉक अॅण्ड डस्टर"

chalk-n-duster.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

कट्यार : एक समर्थ माध्यमांतर !

Submitted by झंप्या दामले on 2 December, 2015 - 15:29

'कला श्रेष्ठ की घराणे', 'बांध घालून अडवून ठेवलेले स्वर महत्वाचे की पाण्याप्रमाणे जिथे जाईल त्याचे रंग रूप घेणारे नितळ स्वर श्रेष्ठ' या पुरातन वादावर भाष्य करणारे 'कट्यार काळजात घुसली हे दारव्हेकर मास्तरांचे नाटक जितके वसंतराव आणि अभिषेकीबुवांमुळे नावाजले गेले तितकेच त्यातल्या संगीतविचारांमुळेही !!! संगीताला कसलेही बंधन नसते. त्यांना कसले बंधन असलेच तर ते असते सात स्वरांचे, हे ठामपणे सांगणारे हे नाटक. नायक-नायिका, कौटुंबिक आव्हाने अशा नेहमीच्याच विषयापेक्षा वेगळे काही सांगणाऱ्या चित्रपटांची मी नेहमीच उत्सुकतेणे वाट बघतो. शिवाय नाटकाचे माध्यमांतर हा विषय जितका औत्सुक्याचा तितकाच नाजूक !

शब्दखुणा: 

सदाबहार रसदार अंगूर

Submitted by निनाद on 2 November, 2015 - 19:27

देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.

पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.

या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.

विषय: 

काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

अ‍ॅण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर

Submitted by टीना on 10 September, 2015 - 18:08

The famous line.. "And they lived happily ever after.."

शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..

विषय: 

बायोस्कोप- नितांत सुंदर काव्यपट

Submitted by मोहन की मीरा on 31 August, 2015 - 01:05

एखाद्या कवीने कविता लिहिताना त्याच्या मनात काही अर्थ अभिप्रेत असतो. समोरचा श्रोता जेन्व्हा ही कविता वाचतो तेंव्हा त्याचा आर्थ आपल्या द्रुष्टीने लावतो. बायोस्कोप हा सिनेमा अशाच चार सिनेमांचे एकत्रीकरण आहे. गुलजार साहेबांची प्रस्तावना ह्या सिनेमाला मिळाली आहे. एक अप्रतिम अनुभव असेच मी ह्या प्रयोगाबद्दल म्हणेन. बायोस्कोप मधे जशी वेगवेगळी चित्र असतात. तसेच ह्या सिनेमात चार शॉर्ट फिल्म्स आहेत. निर्माते अभय शेवडे हा सिनेमा घेवुन सध्या अमेरिकेत आहेत.

पहिली शॉर्ट फिल्म= "दिल-ए-नादान"
कवी = गालिब
दिग्दर्शक = गजेंद्र अहिरे
कलाकार = नीना कुलकर्णी, सुहास पळशिकर

विषय: 

हायवे - एक गतिमान प्रवास

Submitted by जाई. on 30 August, 2015 - 06:19

वाचताना कधी कधी काही वाक्य विशेष लक्षात राहतात. मनात दीर्घकाळ रेंगाळून राहतात. " कधी कधी प्रवास पूर्ण करण्याच्या आनंदापेक्षाही तो प्रवास केल्याच्या अनुभव अधिक आनंद देऊन जातो " हे असच लक्षात राहिलेलं वाक्य. ऊमेश कुलकर्णी दिग्दर्शित हायवेचा प्रवास आपल्याला याच वाक्याची अनुभूती देऊन जातो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट