चित्रगीतमाला .. आमचा बिनाका व चित्रपट संगीताचा प्रवास

Submitted by preetam ranjana on 21 July, 2016 - 00:14

मित्रांनो, बिनाका गीतमालेचे बोट धरून हिंदी चित्रपट संगीताचा अभ्यास मी सुरु केला आहे. तो श्राव्य स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा धागा. आपला अभिप्राय आपले प्रश्न माझा हा अभ्यास आणखी परीपूर्ण करतील असा मला विश्वास आहे. हा अभ्यास केवळ बिनाकाच्या यादीपुरता मर्यादित नसून त्या काळातले चित्रपट व संगीत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. बिनाका चे मानांकन हे लोकप्रियतेच्या निकषावर झाले. पण आज जर या यादी कडे पुन्हा पाहिले व त्या वर्षातील चित्रपट संगीताचा विचार केला तर तुम्हाला ही यादी आज बदलावी असे वाटते का? याचाही विचार आम्ही केला आहे. त्या बरोबरच जर त्या काळी मराठी बिनाका यादी असली असती तर कोणत्या गाण्यांना त्या वार्षिक यादीत स्थान मिळेल याचाही अभ्यास आम्ही करतो आहोत. चला तर मग आमच्या बरोबर या संगीत सफारीला सुरुवात करू या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रगीतमाला १९५७ – नया दौर

१९५७ चा नया दौर हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट. दिलीप कुमार यांची उत्तम अदाकारी, वैजयान्तिमाला यांचा सहजसुंदर वावर, व्यवसायाची गणिते सांभाळून सामाजिक प्रश्नाला हात घालणारे बी आर चोप्रा यांचे दिग्दर्शन आणि ओ पी नय्यर याचे सदाबहार संगीत यांच्या जोरावर ह्या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारुड केले. योग असा की इतक्या यशस्वी चित्रपट असूनही ओ पी यांचा दिलीप कुमार व बी आर चोप्रा यांच्या बरोबरचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. ह्या चित्रपटासाठी दिलीपकुमार यांना चक्क कोर्टात साक्षीदार म्हणून उभे राहावे लागले आणि आपल्या प्रेमाचा इजहार करावा लागला. ऐकू यात हा श्राव्य अनुभव …

चित्रगीतमाला १९५७ – मदर इंडिया

मदर इंडिया हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ५ चित्रपटा पैकी एक आहे. या चित्रपटातील बिरजू च्या भूमिकेसाठी आधी चक्क एका हॉलीवूड स्टारचा विचार झाला होता व त्याच्या बरोबर कामालाही सुरुवात झाली होती. दिलीपकुमार यांना हि भूमिका करायची होती. भारता तर्फे हा चित्रपट ऑस्करला गेला व याचे ऑस्कर केवळ एका मताने हुकले. जाणून घेऊ यात या ऐतीहासिक चित्रपटाविषयी आजच्या भागात.