मुळात असा एखादा चित्रपट आहे हेच मला माहित नव्हते। सहज तूनळी वर दिसला, प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, केतकी चितळे सारखी स्टारकास्ट पाहिली, बघायला सुरुवात केली, खूप ओरिजिनल थ्रिलर मिस्ट्री आहे.
एक फ्लॅट आहे आणि पोलीस दरवाजा तोडून आत शिरतात तर तिथे दिसते स्मिता चा मृतदेह आणि बाजूला बसलेला एक कुत्रा. स्मिता च्या शरीरावर कुत्र्याने हल्ला केलेल्या खुणा दिसतात, पोलीस कुत्र्याला ताब्यात घेतात आणि केस फाईल करतात.
स्मिता ची एक करोड ची इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तिचा नवरा विनायक ला पैसे नको असतात, ते पैसे सरळ स्मिता च्या आई ला देण्यात यावेत असे त्याचे म्हणणे असते.
अलीकडे इम्तिहान नावाचं एक सिनेमा बघितला.
या सिनेमात रवीना टंडन, सैफ आली खान, सनी देओल आणि दलीप ताहिल प्रमुख भूमिकेत आहेत.
जोडीला विनोद करण्याच्या प्रयत्नात असरानी आहेत. या चित्रपटातले असरानी असलेले प्रसंग तुम्ही बघितलेत तर .... पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन तुमच्याकडे खूप सहनशक्ती आहे आणि दुसरं म्हणजे ते प्रसंग कसे होते ते मला कळवा.
यातील बरेचसे प्रसंग मी पाहू न शकल्याने पुढे ढकलण्यात आले.
'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई.
मणिकर्णिका मूवी बद्दल आणि विशेषतः कंगना बद्दल बरेच वादंग सुरु होते, आहेत. अगदी सुरुवातीपासूनच. डायरेक्टर सोडून जाणे, कंगनानी हातात सूत्र घेणे, मग काही कलाकार प्रोजेक्ट सोडून जाणे इत्यादी... आणि अगदी अलीकडे करणी सेनानी धमक्या देणे तर खूपच हास्यास्पद वाटलेलं. पण हे सगळे केवळ TRP साठी केलेले असू शकते, अशीही शंका होती. त्यामुळे मणिकर्णिका मूवी बघायचाच असं काही ठरवलं नव्हतं. रादर नेटफ्लिक्स/ ऍमेझॉन वर अली कि पाहू, असाच विचार होता. पण काल अचानक जुळून आलं आणि मूवी बघायला गेलो. काहीच अपेक्षा ना ठेवता. पण मनातल्या-मनात, कमीतकमी भन्साळी पेक्षा तरी बरं काही असू दे असं म्हणतच.
तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.
मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि "जाऊ दे न व" हे गाणं पाहीलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट "सुधाकर रेड्डी येक्कांटी" यांनी दिग्दर्शित केला आहे. "सुधाकर" हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, लेखक आहे. नागराज मंजुळे आणि सुधारक यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत "अद्वैत निमलेकर" यांनी दिले आहे. अ.व. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात एकच गाणे आहे पण तेच गाणे चित्रपटाचे कथा सार ३.४४ मिनिटात दाखवते. प्रमुख भूमिका "नागराज मंजुळे", "देविका दफ्तरदार" आणि "श्रीनिवास पोकळे" यांची आहे.
मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.
सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.
बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा "अंगूर" पाहिला आणि ह-ह-पु-वा झाली.
देवेन वर्मांचा रश्शीचा भाव करतानाचा सीन म्हणावं किंवा संजीव कुमारांचा "जोकर आ गयाSSS" चं टाईमिंग - सगळंच अफलातून.