चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज नाम शबाना पाहून आली...
अरिशय बेकार वाटला मला पिच्चर..
दिग्दर्शन वाईट .. संवाद खुपच पुळचट.. मनोज वाजपेयीला वाया घालवला आहे.. अ‍ॅक्शन सिक्वेन्स भंगार, एकही ठोसा किंवा बुक्की एकालाही लागेल तर शप्पथ ( स्पॉयलर : हाईट म्हणजे तिचा मित्र मरतो तेव्हा तिची आई हिच्या कानाखाली वाजवते तेव्हा तिचा हात अक्षरशः अधांतरी हवेत घुमलेला दिसतो..याक्क झालं बघुन) .. अक्कीचा फाईट सिक्वेन्स बरा आहे पण त्यातही सल्लूच ह्युमर का टाकलं असाव? नसत काही तरी जमलं असतं..
एडिटींग अतिशय घाण (पहिल्या टास्क ला जेव्हा तिला एका खबरीला वाचवायच असत त्यावेळेसचा गच्चीवरुन उडी मारायचा शॉट आणि असे अगणित शॉट) .. तापसीला अभिनयात काही चान्स नव्हता एवढा.. तिचे फाईट सिन्स खुप ओढुन्ताणून केल्यासारखे वाटले मलातरी..
डॅनी डेग्झोप्पाचं दर्शन सुखावह... अय्या मधल्या हिरोला अ‍ॅक्टींग अज्जिब्ब्बात जमलेली नाही .. सतत ते उगा कॅमेराकडे काय पाहायचं? आणि चिडल्यावर उगा चेहरा आणि चेहर्‍यावरचे मसल्स हलवायचे क्लासेस त्याने रितिक कडून घेतले असावे असे वाटतात..
अशक्य बोर झाला मला चित्रपट..
तापसीचा पुमि दाखवलेला पोरगा फार घाण अभिनय करतो.. तिची मॅचसुद्धा खुप मरगळलेली वाटली.. सुरुवातीला जो कोणी तिचा फोटो काढत होता तो मुद्दाम तिचे ब्लर आणि चेहरा पूर्ण येणार नाही असे फोटो काढत असल्यासारखा वाटला..
एक आणखी प्रश्न पडला तो म्हणजे असं कुणी ब्लँक कॉल करुन तुमच्याशी डील करत तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडून देशविरोधी काम करुन घेणार नाही हे कशावरुन? असा प्रश्न एखाद्या सेन्सिबल पोरीला पडायला हवा कि नाही? कारण पुढं ती त्याला माझा धर्म आहे असा म्हणुन माझ नाव फायद्याच आहे असं बोलतेच ना...
तटी.. जेवढा थोडाफार अक्की उघडा दिसला आहे त्यात क्लिन शेव्ह नसलेली त्याची चेस्ट बघुन खिलाडी सिरीज चे दिवस आठवले Wink लगेच आता तू चीज बडी है मस्त मस्त म्हणून नाचतो कि काय असं वाटल.. Wink Happy

ठीक ठाक आहे चित्रपट.फर्स्ट हाफ बरा आहे. काही त्रुटी तीव्रतेने जाणवल्या. एकदाही शबाना विचारत नाही की हे काम धोकादायक आहे का नाही . प्लस तो व्हिलन सहजतेने आपल्या बद्दलची कोअर माहिती शेयर करतो
सेकंद हाफ मला बोअर झाला .अक्षय कुमार ला उगागच एन्ट्री दिली .

काल बालगंधर्व परत पाहिला. त्यातील 'रवी मी' या मानापमान नाटकातील गाण्याची situation खटकली. म्हणजे मूळ नाटकात जेव्हा ते गाणे येते, तेव्हा भामिनी अगदी साध्या कपड्यामधे असते कारण ती गरीब मुलगी असल्याचे नाटक करत असते. या प्रसंगाच्या आधी तिचे 'अजि टाकू गडे धनवेषा' हे गाणे ही आहे. सिनेमात मात्र भामिनी भरजरी कपडे, दागिन्यांनी मढलेली आहे. अर्थात ज्यांनी मूळ नाटक बघितले नाही त्यांना हा प्रसंग खटकणार नाही. पण तरी अजून मूळ नाटकाचा थोडा अभ्यास केला असता तर हे टाळता येण्याजोगे होते.

हल्ली दादांचे सिनेमे बघतोय.
चिकवा चा ३ रा पार्ट आला त्यावर आपली कमेंट असावी म्हणुन टाकली , बाकी काही नाही. Proud

नाम शबाना अतिशय घाई घाईत बनलेला वाटतो.
एकही दृश्य असे नाही जिथे सुरू होताच पुढे काय वाढून ठेवलाय त्याचा अंदाज येत नाही. एकच अपवाद मला सापडला तो म्हणजे अक्षयची पहिली एन्ट्री. अक्षय सुद्धा यात आहे हे मला माहित नव्हते. बाकी पहिला भाग जरी बाळबोध असला तरी मला आवडला. दुसरा भाग कंटाळवाणा वाटला. पहिल्यापेक्षा बाळबोध.

Spoiler......

मुळात गुप्त हेर वगैरे लोक्स ओसाड पडलेल्या कंटेनर यार्डात बायोमेट्रिकवर चालणारी ऑफिसे का बरे बनवतात? सभ्य जागी ऑफिस असले की जाम संशय येतो आणि ओसाड जागी कोट घालून लोक फिरायला लागले तरी कोणाला काही संशय येत नाही? आणि हे गुप्तहेर इतके बीजी असतात की हिंदी सिनेमे पण बघायला वेळ नसतो?. हिंदी सिनेमे बघितले असते तर व्हिलनला सुसू करायला सोडणे म्हणजेच त्याला आपल्याला मारायची संधी देणे ही शेम्बड्या पोरानेही 50 वेळा पाहिलेली गोष्ट त्यांनीही पाहून ते शहाणे झाले असते. व्हिलन मात्र हिंदी चित्रपट रसिक होता, त्यामुळे 2 ठोसे खाताच स्वतः बद्दलची खरी माहिती तो घडाघडा सांगून बसला, पण पुढचा प्लॅन करूनच.

एकच गोष्ट मला चांगली वाटली. बाल गुन्हेगार म्हणून 2 वर्षे रिमांडहोममध्ये काढूनही ती बाहेर येऊन पुढचे शिक्षण, नॉर्मल मुलामुलींशी मैत्री वगैरे साधारण आयुष्य जगताना दाखवलीय. नाहीतर हिंदी चित्रपटात बालपणीचे रिमांड होम म्हणजे पुढच्या आयुष्यातल्या डॉनपदाची नांदी असते.

हो 'नाम शबाना' अगदीच बाळबोध आहे. सर्वात बंडल प्रकार म्हणजे व्हिलन आपल्याच डॉक्टरचा पत्ता देतो! कोण करेल असं? आणि डॉक्टरही सज्जनपणे लगेच केसपेपर, फोटो, सर्जरी डिटेल्स सग्ग्गळं देतो! 'एजन्ट' म्हणून जितके काही लोक दाखवले आहेत ते तर एकापेक्षा एक पोटू आहेत! Uhoh 'बेबी' खूपच भारी होता इन ऑल रिस्पेक्ट्स!

मला ते सगळ्यात जास्त खटकले. तो अजून एक दिवस राहणार असतो मलेशियात, त्याया एका दिवसात भारतातून दुसरा डॉक्टर मागवून नवे operation पण सुरू. ते चीन बिन कापून जोडायचे काम असे विदाऊट प्लॅन होते का? आणि त्यात अजून जास्त हॅन्डसम बनवा हे pre requisite पण असणारच, आधीच्या अनुभवावरून Happy Happy सगळ्यात जास्त हसायला आले जेव्हा ज्याला 10 वर्षे पाठलाग करून , कित्येक एजेन्ट्स गमवूनही पकडता आले नाही त्याचा खातमा एक नवी, अननुभवी एजेन्ट् करणार. स्त्री एजेन्ट्स निवडायचे कारण स्त्रियांचे जास्तीचे इन्स्टिनक्ट असे वाजपेयीने दिल्यावर अखेरच्या दृश्यात काहीतरी वेगळे जे पुरुष एजेन्ट् करणार नाही ते तरी दाखवायचे. तर तिथेही आनंद...

अक्षय चा छोटासा रोल आहे असं माहिती होत मला..
अगदी सुरुवातीला गोव्यात ती पब मधे मास्क उचलल्ते आणि बाजुला वेंडेटा चा मास्क कोणीतरी उचलतो, मग तिला हाताने पकडून बाजुला नेतो तेव्हाच त्याच्या बॉडी लँग्वेजवरुन क्लिक झालेलं मला कि ये तो अक्कीही होगा...
त्यानंतर ती फोनपन करते मनोज वाजपेयीला..

मनोज वाजपेयीतर निव्वळ टेलिफोन ऑपरेटर दाखवलाय बिच्चारा..
अक्षयला जास्त फुटेज दिल अस मला वाटल नाही.. कुठेही त्याचा गवगवा केला नव्हता.. तिच्या फाईट सिन्स मधे त्याला घुसवल नाही किंवा काहीही.. हा त्याचे असलेनसले फाईट सिन्स खुप फेअर, ट्रेन्ड आणि ओरिजिनल वाटले कारण तो त्यात खरचं बाप आहे याउलट तापसी खुप प्रयत्नपूर्वक ते करत होती हे तिच्या बॉडी लॅग्वेज वरुन मला वाटल.. म्हणुन तिच्यासमोर तो भाव खाऊन जात असेलही.. असो

मुख्य धारेतल्या एका चित्रपटात ( बेबी ) छोटासा तरी महत्वपुर्ण रोल मिळावा, अपेक्षा नसताना तो लोकांच्या लक्षात रहावा आणि केवळ त्या
कॅरॅक्टर साठी आणखी एखादा चित्रपट निर्माण केला जावा, हे मला कौतुकाचे वाटते. ( मला नाही वाटत असे आधी हिंदीत झाले होते. )

मशिन बघितला का कुणी? >> नाही ब्वा..

काल 'गोईंग इन स्टाईल' बघीतला..
एकदम मस्त... आवडते अभिनेते असल्यामुळे नावडणं हा प्रकारच नव्हता.. मॉर्गन फ्रिमन, मायकल केन आणि अ‍ॅलन अर्किन यांची मुख्य भुमिका असलेला..
तीन पेन्शनधारी लाईफलाँग मित्रांवर आलेल्या पैस्याच्या अडचणीमुळे ते उदासिन असलेल्या सिस्टीमला धारेवर धरुन जे कांड करतात ते सगळचं जाम मस्त आहे...
क्वालिटी ह्युमर, म्हातार्‍या लोकांचे डे टू डे प्रॉब्लेम्स... बँक मॅनेजर, त्यांचे नातवांसोबत असलेले संबंध, बँकेतली ती छोटूकली, त्या तिघांचे प्लॅन्स, त्याकरता केलेली प्रॅक्टीस सगळच खुप खुमासदार होत..
सर्वात महत्वाच म्हणजे कुठचं आम्ही म्हातारे बिच्चारे अशी ट्रिटमेंट नाही.. दुखा:ची किनार असली तर तीपन अगदी चवीपुरती आहे.. स्वतःचा मृत्यु येण्याकरता उरलेल्या वेळेचे आणि खर्चाचे गणित सुद्धा ते ज्या पद्धतीने रमतगमत करतात त्यावरु एक पॉझिटिव्हीटी झिरपते..

आपल्याकडे 'म्हातार्‍यांचे इमोशन्श' आणि 'गरीब बिच्चारे ते' या गोष्टींचा इतका गाजावाजा असतो कि लोक म्हातारे झाले हेपन त्यांच्या लेकरांची गलती आहे कि काय असं वाटायला लागतं... असो.. नक्की पाहण्यासारखा..

आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं कि संपूर्ण थेटरात एक मी आणि माझा मित्र असे दोनच वयाने तरुण लोकं होतो... बाकी सगळे ५० ६०चे.. चित्रपटातील अभिनेत्यांना पाहून चित्रपट जोखणारी पब्लिक पहिल्यांदा पाहिली.. आनंद आहे.. असो..

मला बघायचा आहे हा सिनेमा. पण सबर्ब मध्ये आलाच नाही. तेव्ड्या सा ठी फिनीक्स मॉलला जायचे जिवावर आले. नेट फ्लिक्स वर आला की बघेन. सर्व नट मंडळी जोर दार आहेत.

सुट्टी आली ... पहिलीच्या पोरानी बघावे असे हिंदी / हिंदी डब / अ‍ॅनिमेशन वगैरे मुवी आली आहे का ? येणार आहे का ?

बॉस बेबी मस्त आहे. अ‍ॅनिमेशन मस्त आहे... बेबींचे घर , गार्डन अगदी मस्त आहेत

आता द मम्मी येत आहे.. त्यात मम्मी स्त्री आहे.. पुरुषाच्या ममीला ममी म्हणतात. स्त्रीच्या ममीला मम्मीण म्हणायचे का?

बॉस बेबी मस्त आहे. अ‍ॅनिमेशन मस्त आहे... बेबींचे घर , गार्डन अगदी मस्त आहेत>> मीपन पाहिला..अगदी रिलीज झाला त्याच दिवशी..
आता इंतजार आहे Despicable Me 3 चा.. सोबतीला तब्बल १४ वर्षांनी Incredibles सुद्धा येतोय ..

Fast & Furious 8 खास भारतीय लोकांसाठी बनवलेला अचाट चित्रपट. काहीही दाखवतात. ते मिसाईलची चीप काढुन घ्यायचा सिन बघुन तिरंगा आठवला. त्यात राजकुमार पण असेच प्रलयनाथ गुंडास्वामीच्या मिसाईलच्या चीप काढुन आणतो. Happy

गुंडास्वामीच्या मिसाईलच्या चीप काढुन आणतो>>> ते 'फ्यूज कंडक्टर' असतात माईंंड यू. पुन्हा अशी चूक करु नका प्लीज. तिरंगा, गुंडा इत्यादींच्या बाबतीत थोड्याश्याही चुकीच्या रेफरन्समुळे इथे अनेकांच्या भावना दुखावतात, प्लीज बी केअरफुल.

तिरंगा, गुंडा इत्यादींच्या बाबतीत थोड्याश्याही चुकीच्या रेफरन्समुळे इथे अनेकांच्या भावना दुखावतात, प्लीज बी केअरफुल.
>> सॉरी बरका आपल्या भावना दुखावल्याबद्द्ल Happy

तिरंगा, गुंडा इत्यादींच्या बाबतीत थोड्याश्याही चुकीच्या रेफरन्समुळे इथे अनेकांच्या भावना दुखावतात, प्लीज बी केअरफुल.>> हे बाकी बराबर बोल्लात तुमी.. माग चेतन का कोण तीन चुका वाला भगत त्यानपन 'गुंडा' चित्रपटावर पुष्पवर्षाव केला होता ट्विटर वर... लोकांनी त्याची नसलेली अक्कल काढून ठेवली होती.. Proud

मी आज 'बेगमजान' पाहिला..
काही लिहिण्याच्या हालत मधे नाहीए.. बोर झाला मला..

Pages