डायलॉगबाजीतले सेक्सिझम!!

Submitted by π on 19 May, 2017 - 11:38

कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'

आपले हिंदी चित्रपटही याबाबतीत मागे नाहीत.
राजकुमार, अजित यांच्यासारखे नरपुंगव तर इतर कुठल्याही बाबीपेक्षा त्यांच्या डायलॉगबाजीनेच अजरामर झाले.
पण एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही. बॉलिवुडचे सर्व 'डायलॉग्स' सहसा मेल कॅरॅक्टर्सच्याच तोंडी असतात! स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?
हिंदी चित्रपटांमधले टॉप डायलॉग्स आठवून पहा.
'जाओ, पैले उस आदमी का साइन लेके आओ'
'मेरे पास मां है'
'जो डर गया, समझो मर गया'
'साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है'
'पुष्पा, आय हेट टिअर्स'
'ये बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है'
'जली को राख कहते है...' वगैरे वगैरे.
पण सर्वच्या सर्व पुरुष पात्रांचे.
स्त्री नट्यांच्या वाट्याला मात्र 'मैं तुम्हारे बच्चों की मां बनने वाली हूं' किंवा 'बेटा, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है' अशा जेनेरिक डायलॉगांपलिकडे नसतंच.
कधीकधी हिरोला एखाद्या स्त्रीपात्राला तिची जागा दाखवून देता येण्यासाठी, किंवा तिचा बावळटपणा अधोरेखित करता यावा म्हणून तिला एखादा 'लिडिंग' डायलॉग दिला जातो.
उदा. बराच वेळ बसंतीची बालिश बडबड, आणि अमिताभने 'तुम्हारा नाम क्या है बसंती' विचारणे.
किंवा 'लोग इस तरह अपने दरवाजे खिडकियां खुल्ली रखे तो चोर-उचक्के घरमे घुसेंगे ही' सारखा चीप डायलॉग.

बराच वेळ विचार केल्यावर एक स्त्रीपात्री डायलॉग सापडला... 'थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है'
आणखी खूऽऽप वेळाने आठवला 'परमिसन लेना चाहिये ना!??...'
पण असे एका हाताच्या बोटावर मोजता येतील.

असं का बुवा? स्त्री अभिनेत्यांवर नाच, गाणी अशांसारखी महत्वाची कामे सोडून चांगले डायलॉग 'वाया' घालवणे अडचणीचे पडत असावे का? की हिरॉइनच्या पर्सनॅलिटीला जितका फोकस मिळेल तितकी तिची इतर 'अंगे' झाकोळली जात असावीत?

बहुत नाइन्साफी है ये (छ्याः... पुन्हा पुरुषाचाच डायलॉग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरा वाचन ही हे शासन >>> वाचन मुळे वाक्याचा अर्थच बदलला एकदम Happy

इन्सान जो रिअल में चाहता है वो उसे हमेशा मिलता है - जब वी मेट ची गीत

मेरा वाचन ही हे शासन >>> वाचन मुळे वाक्याचा अर्थच बदलला एकदम << तरी च्रप्स ने बरच चांगल लिहीलय, वास्तवाच्या खुप जवळ.... :प

बहोत बडा हो गया बेटए, लेकिन अपनी मां को खरीदने की कोशिश ना कर - निरुपा रॉय, दीवार

I don't bite you know... unless it's called for - ऑड्री हेपबर्न, चॅराड

"स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?" - असं अशामुळे की आपल्याकडे स्त्री पात्र protagonist असलेले मसाला सिनेमे खूप कमी असतात. बरेचसे स्त्री भुमिका सशक्त असणारे सिनेमे एकदम 'दमदार अभिनय' कॅटेगरीत येतात, 'दमदार संवाद' कॅटेगरीत नाही.

त्यातून स्त्री पात्र सशक्त दाखवायच्या नादात बरेच वेळा त्या स्त्री पात्राच्या तोंडी 'पुरूषी' संवाद दिले जातात. म्हणजे शिव्या देणारी, टपोरी बोलणारी ई. मला ह्या संवादांवर पुरूषांची मक्तेदारी आहे असं म्हणायचं नाहीये, पण सर्वसामान्य लोकांच्या मनात हे संवाद म्हणणारी स्त्री 'मर्दानी' असते.

वर आलेल्या काही उदाहरणात (चेन्नई एक्सप्रेस मधली दिपीका पदुकोण, जब वी मेट मधली करीना कपूर) मात्र सशक्त 'स्त्री' भुमिका असलेल्या करमणूकप्रधान सिनेमांचा उल्लेख आलाय आणी अशा सिनेमांमधून लक्षात रहाणारे स्त्री पात्रांचे संवाद ऐकायला मिळतील.

तर तर!! Happy
स्वतःच्या भावाला पण, "लै कामाला जातो रं तू.." पण भन्नाट टाकते एकदम. Lol

सीता और गीता मधील पंख्यावर बसलेली हेमा।

चाची मै यहां हूं

हा डायलॉग पण गाजलेला असे आमच्या काका मंडळींकडुन कळते.

वैसे तो हमे जादा बात करने की आदत तो है नही ... बसंती... शोले
काटों को मुर्झाने का खौफ नही होता... अनारकली... मुघल-ए-आझम
शाका मेरा भगवान है... फुल और पथ्थर

आर्ची मलाही आठवली होती पण सैराट 'बॉलिवुड' सिनेमा नाही म्हणून लिहिलं नाही.
सैराट अनेक बाबतीत ग्राउंडब्रेकिंग मुव्ही आहे.
बोकवास डिक्शनरी आत्ताच युट्युबवर शोधली. एकदम भारी!

मी फारसे सिनेमे पहात नाही , त्यातले डायलॉग लक्षात ठेवणे सुद्धा फार लक्ष पूर्व करते असे नाही. पण हे सर्व मला पटकन आठवणारे डायलॉग्स.

रन फॉरेस्ट रन - जेनी इन फॉरेस्ट गम्प

I'll have what she's having - व्हेन हॅरी मेट सॅली

You people work on commission, right? Big mistake. - प्रेटी वूमन

BAM! A f—in’ bullet rips off part of your head! Your brains are laying on the ground in little bloody pieces! Now I ask you: Would you give a f— what kind of pants the son of a b—- who shot you was wearing?! मरिसा टूमे - माय कझिन विनी.

आर्ची मलाही आठवली होती पण सैराट 'बॉलिवुड' सिनेमा नाही म्हणून लिहिलं नाही. >>
ओके. "बॉलिवूड डायलॉग बाजीतले सेक्सिझम"
असे शिर्षक करता येइल.

आब्बा डब्बा जब्बा.
हम जरासे बेवफा क्या हो गये आप तो बच्चलन हो गये
आद्रक हो गया है ये आदमी कही से भी बढ रहा है
थारि लुगाइ लागे तो म्हारे जैसी......
वा देख कबुतर
आता सगळा तनु वेड्स मनु लिहावा लागेल

Pages