चित्रपट

पद्मावत - परीक्षण

Submitted by भागवत on 27 January, 2018 - 03:37

भव्य आणि उंच देखावे आणि सेट्स, उंची वस्त्र, कलाकारांची दमदार फळी आणि अभिनय, उत्तम छायाचित्रण आणि संवाद घेतलेली विशेष मेहनत चित्रपटात जाणवते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत श्रवणीय आणि प्रभावी आहे. रजपूत लोकांची अस्मिता, लढाऊ बाणा, त्यांचा संयम, प्रथा आणि दिलदारपणा यांचा चित्रपटावर विशेष प्रभाव जाणवतो. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन आणि त्यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. कोणताही चित्रपटाची कल्पना आणि पात्र आधी दिग्दर्शकाच्या विचारात आणि डोक्यात उतरतात त्याचं प्रमाणे सगळी कथा भन्साळी यांच्या दिग्दर्शनात दिसून येते.

पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - ३. द ट्रेन (१९७०)

Submitted by स्वप्ना_राज on 8 January, 2018 - 04:32

काही काही चित्रपटांबद्दल आपण आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेलं असतं. म्हणजे ते शाळा-कॉलेजात असताना कसे तो चित्रपट पाहायला गेले होते (कधीकधी ते त्यांच्या आईवडीलांचा डोळा चुकवून गेलेले असतात - पण ही गोष्ट ते आपण शिक्षण संपवून नोकरीला लागेपर्यंत आपल्याला सांगत नाहीत!), त्याची गाणी कशी हिट होती, त्यांची कशी पारायणं केली जायची वगैरे वगैरे. मग आपल्यालाही तो चित्रपट पहायची उत्सुकता लागते. १९७० सालचा 'द ट्रेन' हा रहस्यपट माझ्यासाठी अश्याच चित्रपटांपैकी एक.

विषय: 
शब्दखुणा: 

करीब करीब सिंगल - एक सुहाना सफर

Submitted by मॅगी on 10 November, 2017 - 22:42

काल खूप वर्षांनी एखादा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि तो बघून इतकी मजा आली की लगेच लिहायलाच बसले!

तनुजा चंद्राने दिग्दर्शित केल्यामुळे एक जरा धाकधूक होती की तिचे आधीचे दुश्मन, संघर्ष असे मारधाड थ्रिलर्स असल्यामुळे एकदम हा रॉमकॉम कसा काय असेल.. पण मध्ये इतकी आठ दहा वर्षे गेल्यामुळे असेल कदाचित पण तिने हा विषय हाताळला आणि खूप सुंदर ट्रीटमेन्ट दिली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

Submitted by फारएण्ड on 29 October, 2017 - 18:32

आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच मर्यादित फोकस ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.

शब्दखुणा: 

संवाद - अफाट आणि अतर्क्य

Submitted by राफा on 7 October, 2017 - 14:36

सलीम-जावेद विषयी लेख लिहिल्यावर आलेल्या उस्फूर्त आणि अप्रतिम प्रतिसादानंतर अजून झटक्यात लिहावे वाटले..
गप्पांचे एक्स्टेंडेड सेशन दारात निरोप घेताना व्हावे तसे!

ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल तर सोन्याहून पिवळे. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)

कासव नावाची रांगोळी

Submitted by सिम्बा on 6 October, 2017 - 09:38

कालच कासव हा सुंदर चित्रपट पाहायला मिळाला, हि संधी मिळून दिल्या बद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. आधीच या चित्रपटावर सई, सई केसकर आणी अगो यांनी इतके छान लिहिले आहे कि मी चित्रपटाच्या आशयाबद्दल काही लिहिणे म्हणजे त्याला तीट लावण्यासारखे वाटेल.
चित्रपट पहिल्या पासून ,कालिदासाने म्हंटल्या प्रमाणे,
रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्‌-
पर्युत्सुको भवति यत्सुखितोsपि जंतु:।
अशी अवस्था झाली आहे, घरी कोणी हा चित्रपट अजून पहिला नाहीये. आलेल्या अस्वस्थतेला कोणाशीतरी शेअर करण्यासाठी इकडे लिहितोय

कासव : एकटेपणाची सामूहिक गोष्ट

Submitted by अगो on 6 October, 2017 - 07:10

माणूस ह्या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो वगैरे वाक्यं आपण वर्षानुवर्षं वाचत आलेलो असतो किंवा प्रसंगोपात बोलून दाखवत असतो. अशी वाक्यं दुसर्‍यांची उदाहरणं देऊन बोलायला बरी वाटली तरी आपल्यावर हे उमजण्याची वेळ येऊ नये असंही आपल्याला कुठेतरी वाटत असतंच. तरीही जवळजवळ प्रत्येकाला आयुष्यात एखाद्या साक्षात्कारी क्षणी एकटेपणाच्या ह्या आदिम अनुभूतीचा प्रत्यय येतच असतो. आपले कुणी नाही, आपण एकटे पडलोय ही ती जाणीव ! भितीदायक असते ही जाणीव फार. एखाद्या चुकार क्षणी नुसती विजेसारखी लखलखून ती येत जात राहिली तर फारसे बिघडत नाही. उलट आपले पाय जमिनीवर ठेवायला त्या लख्ख जाणीवेची मदतच होते.

विषय: 
शब्दखुणा: 

अब रोज रोज तो आदमी जीत नहीं सकता ना...

Submitted by राफा on 5 October, 2017 - 01:39

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.

‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...

त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.

तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!

शब्दखुणा: 

" मला काहीच प्रॉब्लेम नाही " हाच तर खरा प्रॉब्लेम आहे

Submitted by सुजा on 17 August, 2017 - 01:17

काल " मला काहीच प्रॉब्लेम नाही " बघितला . सिनेमा अजिबातच समजला नाही हाच आम्हाला प्रॉब्लेम झाला. नायक नायिका दोघंही आईवडिंलाच्या मनाविरुद्ध जाऊन कोर्टात लग्न करतात. दोन्ही पालकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात पण समजाऊ शकत नाहीत. मग काय लग्न करतात आणि स्वतःच घरकुल उभारतात . कष्ट चालूच असतात आणि काहीतरी बिनसतं अस नायिकेला जाणवत पण ते काय आहे ते प्रेक्षकांना समजतच नाही कारण काही प्रॉब्लेमच दाखवला नाहीये . बिनसण्याकरता काय प्रॉब्लेम असतो तो सशक्तपणे अधोरेखितच होत नाही . सगळं वरवरचं वाटत राहत. नायक सरळ मार्गी आहे . तो ऑफिस मध्ये काही अफरातफर/झोलझाल करत नाही .

विषय: 

ऐलान-ए-जंगः एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51

ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका Happy

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट