देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.
पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.
या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
The famous line.. "And they lived happily ever after.."
शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..
एखाद्या कवीने कविता लिहिताना त्याच्या मनात काही अर्थ अभिप्रेत असतो. समोरचा श्रोता जेन्व्हा ही कविता वाचतो तेंव्हा त्याचा आर्थ आपल्या द्रुष्टीने लावतो. बायोस्कोप हा सिनेमा अशाच चार सिनेमांचे एकत्रीकरण आहे. गुलजार साहेबांची प्रस्तावना ह्या सिनेमाला मिळाली आहे. एक अप्रतिम अनुभव असेच मी ह्या प्रयोगाबद्दल म्हणेन. बायोस्कोप मधे जशी वेगवेगळी चित्र असतात. तसेच ह्या सिनेमात चार शॉर्ट फिल्म्स आहेत. निर्माते अभय शेवडे हा सिनेमा घेवुन सध्या अमेरिकेत आहेत.
पहिली शॉर्ट फिल्म= "दिल-ए-नादान"
कवी = गालिब
दिग्दर्शक = गजेंद्र अहिरे
कलाकार = नीना कुलकर्णी, सुहास पळशिकर
वाचताना कधी कधी काही वाक्य विशेष लक्षात राहतात. मनात दीर्घकाळ रेंगाळून राहतात. " कधी कधी प्रवास पूर्ण करण्याच्या आनंदापेक्षाही तो प्रवास केल्याच्या अनुभव अधिक आनंद देऊन जातो " हे असच लक्षात राहिलेलं वाक्य. ऊमेश कुलकर्णी दिग्दर्शित हायवेचा प्रवास आपल्याला याच वाक्याची अनुभूती देऊन जातो.
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून हे नाव कधी मला लक्ष द्यावसं वाटलच नव्हतं. लहानपणी कधीतरी टीवी वर ना ना करते प्यार तुम्हिसे कर बैठे म्हणणारा एक छान चॉकलेट हीरो म्हणून इतकीच यांची ओळख. जास्तीत जास्तं दीवार, त्रिशूल मधे अमिताभचा भाऊ किंवा मित्र म्हणून. बस, त्यापुढे या शशी कपूर या हिरोची ची ओळख असली तरीही शशी कपूर ह्या अभिनेत्याची कधीच ओळख नव्हती.
काही दिवसांपूर्वी एक झालं की एक गोड गाणं ऐकायला मिळालं. हे गाणं कशातलं असेल म्हणून शोधत होते तर एक फार छान चित्रपट हाती लागला. हा चित्रपट होता जुनून. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि निर्माता शशी कपूर.
‘तीन-तीन सुगरणी आणि स्वयंपाक मात्र आळणी’ , ‘तीन तिगडा, फिर भी काम बिगाडा??’........ Any thing else to say?
सचिन खेडेकर कडून ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘आजचा दिवस माझा’ आणि ‘काकस्पर्श’ या चित्रपटांमुळे वाढलेल्या अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघायला जाणार असाल तर जाऊ नका.
अमेय (दी.दो.दु मधला कैवल्य) आवडत नसेल तर तिकीट काढण्याकरता बाहेर काढलेलं क्रेडीट कार्ड आत्ताच्या आत्ता पाकिटात ठेवा परत. नाहीतर ‘नावडतीच मीठ आळणी’ अशी गत व्हायची.
सोनाली कुलकर्णी आणि अमेय वाघ यांचा अभिनय बघायचा असेल, तर मात्र नक्की बघा.
मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी.
साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच......
असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.
हा धागा काढण्याचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'संदूक' (सुमित राघवन - भार्गवी चिरमुले) हा सिनेमा.
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने मला हा सिनेमा पाहातांना नुकत्याच पाहिलेल्या 'विटी-दांडू' (अजय देवगण प्रॉडक्शन) या सिनेमाची आठवण येत होती. आणि लक्षात आलं कि या सिनेमात इंग्रजांची चौकी/ जेल/ स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यासाठी जो तुरुंग 'विटी-दांडू' या सिनेमात दाखवलेला आहे तेच लोकेशन नी तोच तुरुंग 'संदूक' मध्येही वापरला आहे.
कोणतं गाणं कोणत्या रूपात कधी, कुठे, कसं भेटेल काहीही सांगता येत नाही... त्यातही काही गाणी परत परत भेटत राहतात. कधी एक हलकीशी झलक दाखवून उत्सुकता चाळवून जातात, आणि मग सुरु होतो शोध. या शोधात तुमच्याही नकळत तुम्ही गुरफटत जाता, गाणं हुलकावणी देऊन निघूनही गेलेलं असतं. काळाच्या ओघात कधीतरी सक्रीय शोधही मागे पडतो. कधी मित्रांबरोबर विषय निघाला तर तुमच्या शोधाबद्दल, उत्सुकतेबद्दल त्यांच्याशी बोललं जातं. मग ते ही काही काळ त्या शोधयात्रेत सामील होतात. कधी उत्तर मिळतं, कधी मिळत नाही. मनात मागे नुसताच त्या गाण्याचा, प्रश्नाचा ठसा उरतो. हलकासा, न जाणवणारा, त्रास न देणारा पण तरीही पुसुन न टाकता येणारा.