धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?
नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात.