मन

नैराश्य

Submitted by Abhishek Sawant on 23 October, 2017 - 10:55

मानवी जीवनात प्रयेकालाच नैरश्याचा सामना करावा लागतो. कारणंं वेगवेगळी असली तरी तो अनुभव सारखाच असतो. या काळात अनेक लोक आपल्याला काही बाही सांगत असतात पण आपल्या निगेटीव्हीटी नैराश्य यावर त्याचा काहिही परिणाम होत नाही. अनेकजण बरेच ऊपाय सांगतात पण ते त्यावेळी खरच डीप्रेस किंवा निराश नसतात. माझ्यामते नैराश्य आलेल्या माणसाने दुसर्‍या नैराश्य आलेल्या माणसांशी बोलायला पाहिजे. तर हा धागा तुमच्या डिप्रेसीव्ह विचारांसाठी. तुमच्या आयुष्यातील निगेटीव्ह गोष्टी इथे लिहा.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कासव - जेथे जातो तेथे मी माझा सांगाती

Submitted by सई. on 6 October, 2017 - 04:15

कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माजी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे

शब्दखुणा: 

निचरा

Submitted by सई. on 22 June, 2017 - 03:04

एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.

शब्दखुणा: 

एक पाऊस असाही

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 June, 2017 - 02:18

धुरकट झालं सारं
भरारलं वारं
मोतीपवळ्याचं लेणं
उतरलं धरतीवर
वीज लकाकता आकाशी
अवघी धरा उजळली
माय लेकराची मग
मनोमन भ्याली
पाखरू बावरे
घरट्यातच वावरे
उब घराचीच करी
सर्वा आश्वस्त
उधानलं नदी नालं
ओढ कशी आवरु
सासुरवाशीण सई
लगबगीत माहेरा जाई
असा ओलेता उत्सव
झाले हिरवे रान
शिळ घालिते कसे
आज उनाड मन

शब्दखुणा: 

वय आणि मन

Submitted by संजय मेहेंदळे on 19 January, 2017 - 21:17

लहानपणी निरागस असतं
जसं देवाघरचं फूल असतं
पाप-पुण्याच्या बाहेर असतं
द्यायचं घ्यायचं काही नसतं
.
तरुणपणी भावनाप्रधान असतं
सगळं जग सुंदर दिसतं
हळुवार क्षणी कोणावर तरी जडतं
मग आपल्या हातात काही नसतं
.
उतारवयात हळवं होतं
गतस्मृतीत जास्त रमतं
दुःखद आठवणींनी डोळे टिपतं
आता सगळं विसरायचं असतं
.
मन खरं तर मुक्त असतं
उगाच वयाचा चष्मा चढवतं
कधीतरी वयाला चुकवायचं असतं
मनाला मनासारखं वागू द्यायचं असतं
.

शब्दखुणा: 

खंत वेड्या मनाची

Submitted by शार्दुल हातोळकर on 25 October, 2016 - 07:23

ही गझल मायबोलीवरुन मी स्वत: वैयक्तिक कारणामुळे काढुन टाकत आहे.

मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग २)

Submitted by दीपा जोशी on 11 September, 2016 - 05:36

मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग २)

(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, आणि दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.)

भगीरथ तप तुटो

Submitted by चितस्थधि on 7 July, 2016 - 13:57

भगीरथ तप तुटो
जटा सुटो
अवतरलेल्या गंगेला
पुन्हा प्रवाह फुटो....

खांब तुटो
शिळा फुटो
गाभाऱ्यातल्या देवाला
पुन्हा देहभान सुटो

किनारे तुटो
गुरुत्व सुटो
माणसांच्या धरित्रीला
पुन्हा विनाश नांदो

भाव तुटो
सत्व-रज-तम सुटो
उपद्व्यापी चैतन्याला
पुन्हा निराकार मिळो...

चितस्थधि

शब्दखुणा: 

मन । कुठे आणि काय ?

Submitted by महेश ... on 23 June, 2016 - 06:52

फारच गमतिशिर प्रश्न आहे. जे आपल्या शरीराला कायम ताब्यात ठेवत, ज्याला आपण कधीच कंट्रोल करू शकत नाही। आणि जे सतत आपल्याला वेगवेल्या भावनेत अडकवून ठेवत। तेच हे मन.

ज्याच्यावर आपली सगळी सुख दुख अवलंबून असतात किंवा जे ह्य सगळ्यांचा उगम स्थान आहे. ते मन.
ज्याचा आपण साधा विचारही करात नाही. (हे माझ्याचसाठी होतं) जिम , योग, डान्स इतर अनेक प्रकार केले पण मन साठी काय.

*********************
पण हे मन नक्की असता कुठं ? माझ्या शरीरात माझा मन नक्की कुठे आहे ?
***************************************************

मन

Submitted by मंदार खरे on 14 March, 2016 - 01:04

मन

मन चंचल पाखरु
कसे त्याला आवरु
कधी रमते ऐलतीरावर
क्षणात नजर पैलतीरावर

मन चंचल पाखरु
कसे त्याला सावरु
कधी आनंदडोही विहार
क्षणात चिंतेचा शहार

मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलासी भोगी

मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलक्षण भोगी

मन चंचल पाखरु
कसे त्याला चितारु
कधी ऊंच गगनात
क्षणात सोनेरी पिंजर्यात

मन चंचल पाखरु
कसे त्याला गोंजारु
कधी घुटमळे पायात
क्षणात नखे नरड्यात

मन चंचल पाखरु
कसे त्याला चुचकारु
कधी जाज्वल्य अभिमान
क्षणात उपहास कस्पटासमान

मन चंचल पाखरु
कसे त्याला धरु
कधी कवडसा खिडकीतून

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मन