नैराश्य

Submitted by Abhishek Sawant on 23 October, 2017 - 10:55

मानवी जीवनात प्रयेकालाच नैरश्याचा सामना करावा लागतो. कारणंं वेगवेगळी असली तरी तो अनुभव सारखाच असतो. या काळात अनेक लोक आपल्याला काही बाही सांगत असतात पण आपल्या निगेटीव्हीटी नैराश्य यावर त्याचा काहिही परिणाम होत नाही. अनेकजण बरेच ऊपाय सांगतात पण ते त्यावेळी खरच डीप्रेस किंवा निराश नसतात. माझ्यामते नैराश्य आलेल्या माणसाने दुसर्‍या नैराश्य आलेल्या माणसांशी बोलायला पाहिजे. तर हा धागा तुमच्या डिप्रेसीव्ह विचारांसाठी. तुमच्या आयुष्यातील निगेटीव्ह गोष्टी इथे लिहा.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०१४ मध्ये पार वाट लागलेली. शेवटी जान है तो जहान है म्हणून एका झटक्यात सगळे फाट्यावर मारले.

नैराश्य भयंकर असतं, त्यात रोमांटिक काही नाही. दुसर्‍यांना सल्ले देणं सोपं असतं, स्वतःला सावरणं महाकठीण.
नेमक्या मूळाशी जाऊन परिस्थितीशी थेट भिडणं एवढाच उपाय असतो.
कितीही मूर्खपणा वाटत असला तर ओळखीच्या समजूतदार लोकांना स्वतःची अवस्था सांगितली पाहिजेच. अशी लोकं भेटणं कठीण असतं, तेव्हा प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे.

ऋन्मेष अरे हे फिलॉसॉफिकल बोलणे सोपे असते पण its not प्रॅक्टिकल always जो यातून जातो त्याच्यासाठी ..
>>>>>
मी कुठे म्हणालो की करायला सोपे आहे. पण करणे अवघड असल्यास बोलणेही अवघड करून ठेवायचे का?
जर एखादी व्यक्ती निराश असेल तर त्याला अमुकतमुक आशादायी विचार सांगताना तुम्ही नंतर असे म्हणालात की बघ बाबा आता हे जे मी तुला सांगितले ते बोलायला सोपे असले तरी करायला कठीण आहे हं, बघ कसे जमते ते तुला.. मग काय होणार त्याचे?

तू वर दिलेली उदाहरणे सुद्धा फुटकळ वाटली मला (नापास च सोडून)
>>>>>>>
तुम्हाला माझी उदाहरणे फुटकळ वाटली तर ठिक आहे, जी माझ्याशी घडली ती मी सांगितली. पण खरं सांगायचे तर नापास होणे, प्रेमभंग, अहंकार दुखावणे ही टिपिकल कारणे आहेत. यात फुटकळ असे काही नाही. तरी एखाद्या निराश व्यक्तीला कधी चुकूनही असे म्हणू नका की ज्या कारणासाठी तो निराश आहे ते कारण फार फुटकळ आहे. कारण त्यावेळी त्याची मेंटेलिटी अशी असते की त्यासाठी त्यावेळी तेच जगातली सर्वात मोठे कारण आणि जीवनमरणाचा प्रश्न असतो. तुम्हाला त्रयस्थ नजरेतून पाहताना ते कधी जाणवणार नाही. ते त्याच्या नैराश्याच्या दृष्टीकोणातूनच समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असतो.
लहान मुले लहानसहान गोष्टींमुळे आत्महत्या करतात त्यामागे हेच कारण असते. कारण जे ज्या कारणासाठी निराश असतात त्यांना त्यांच्या जवळचे फुटकळ समजून त्यानुसार वागतात. त्यांना नेमके तेच सहन होत नाही.

तळटीप - मी माझ्या आयुष्यात आजवर एक चांगला मित्र बनत एका मित्राला नैराश्येच्या खाईतून बाहेर काढलाय तर एकाचा अगदी आत्महत्येचा विचार पलटवला आहे. कधी मला यावर धागा काढावासा वाटला नाही, वा कुठे हा उल्लेख करावासा वाटला नाही. पण कधी वाटलेच तर नावं बदलून ते शेअर करेन.

नैराश्य भयंकर असतं, त्यात रोमांटिक काही नाही. दुसर्‍यांना सल्ले देणं सोपं असतं, स्वतःला सावरणं महाकठीण.
नेमक्या मूळाशी जाऊन परिस्थितीशी थेट भिडणं एवढाच उपाय असतो.

>>>>>
हे खरे तर फसवे आहे. एकदा नैराश्याने तुम्हाला ग्रासले तर तुम्ही मूळाशी जाऊन परिस्थितीशी भिडणे वगैरे उपाय करायच्या मनस्थितीत नसता. तसे असाल तर तुम्हाला नैराश्याने ग्रासले आहे हेच खोटे ठरेल Happy
तुम्हाला कोणी तुमच्या जवळचा वा एखादा समुपदेशक यातून बाहेर काढू शकतो किंवा नशीब चांगले असेल तर तुम्ही काही न करता त्या नैराश्याशी संबंधित घडलेली एखादी चांगली घटना तुम्हाला यातून बाहेर काढू शकते.

ते काय म्हणतात ना ईंग्लिशमध्ये, prevention is better than cure .. बस्स तसेच नैराश्याशी लढायला आधीच तयार राहायला हवे. आणि म्हणूनच जे वर बोलणे सोपे असते असे वाटते ना, ते तितकेच सोपे समजून बोलत राहावे लागते. नैराश्याने तुम्हाला आपल्या विळख्यात घेण्याआधी त्याला तुमचा स्वत:वर असलेल्या विश्वासाचे कडे भेदावे लागते. त्यामुळे ते वेळोवेळी चेक करत राहावे.

ऋ, किती पकवतो रे भौ? जा झोपायला. मग म्हणशील आता मुंबैत रात्रीचे तीन वाजत आहेत.

नानाकळा, तुम्ही ही पकवायला घ्या लोकांना, जगाला, आयुष्याला... डाव्या हाताने लिहून देतो, नैराश्याच्या सातबारा वर तुमचे नाव कधी लिहिले जाणार नाही.
असो, शुभरात्री,
जाता जाता मुंबईत तीन वाजून गेले हे तुम्हाला कसे कळले हे विपु करून जा. हल्ली काही खाजगी म्हणून राहिलेच नाही. कधी आले तर नैराश्य या गोष्टीनेच येईल अशी भिती वाटते.

नैराश्य भयंकर असतं, त्यात रोमांटिक काही नाही. दुसर्यांना सल्ले देणं सोपं असतं, स्वतःला सावरणं महाकठीण.
नेमक्या मूळाशी जाऊन परिस्थितीशी थेट भिडणं एवढाच उपाय असतो.
कितीही मूर्खपणा वाटत असला तर ओळखीच्या समजूतदार लोकांना स्वतःची अवस्था सांगितली पाहिजेच.
>>>>+१११
समजून घेणारा लायक असेल तर नक्कीच मदत होते पण जर तो सगळं ऐकून घेऊन निराश व्यक्तीची खिल्ली उडवायला लागला (तोंडावर वा पाठीमागे) तर नैराश्याची तिव्रता आणखीनच वाढते. मग हळूहळू ती व्यक्ती एकलकोंडी बनत जाते, जगाची भिती वाटायला लागते, न्यूनगंड वाढत जातो आणि आत्मघात करण्याच्या विचारांकडे झुकते. याउलट आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असेल तर नैराश्य निघून जाण्यास परिणामकारक मदत होते.
'देव' ही संकल्पना अशा वेळी बरेचदा मनाला उमेद देते.

पण जर तो सगळं ऐकून घेऊन निराश व्यक्तीची खिल्ली उडवायला लागला (तोंडावर वा पाठीमागे) तर नैराश्याची तिव्रता आणखीनच वाढते. >> +१

अवांतर...
'देव' ही संकल्पना अशा वेळी बरेचदा मनाला उमेद देते.>>>>> अजिबात पटल नाही.आनि मनाप्रमाणे नाही घडल तर देवाला दोष द्यायल मोकळे.निम्म्या वेळेला लोक फक्त आणि फक्त परिस्थिती न स्विकारता आल्यामुळे देवाला दोष देतात.देवाची आराधना ,एखाद्याचे श्रध्दास्थान हे कितपत पॉझिटीव्हीटी देणार हे मुळात त्या माणसांमधे किती पॉझिटीव्हीटी आहे यावर अवलंबुन असते.

हे मुळात त्या माणसांमधे किती पॉझिटीव्हीटी आहे यावर अवलंबुन असते.
>>>>

एक्झॅक्टली!
म्हणून मी सुद्धा वर लिहिलेय की रोगाशी लढताना तुमची स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढवता तसे ईथे तुमच्यातील सकारात्मकता वाढवणे गरजेचे.

देवावरून आठवले. एखादा कट्टर आस्तिक माणूस निराश झाल्यावर काय विचार करत असेल? या जगात माझे कोणीच नाही. देवा मी तुझ्याकडे येतो. आणि आत्महत्येचा टोकाचा निर्णय !
किंवा त्या नैराश्याच्या काळात अचानक त्याला साक्षात्कार झाला की अरे एवढे दिवस मी देव मानत होतो पण देवाने आपल्यासाठी काही नाही केले, म्हणून आपल्यावर ही वेळ आली, म्हणजे देव नाहीयेच जगात किंवा असला तरी तो माझ्यासाठी नाहीये.. हा विचार आणखी खोलात नेऊ शकतो.

देवावरून आठवले. एखादा कट्टर आस्तिक माणूस निराश झाल्यावर काय विचार करत असेल? या जगात माझे कोणीच नाही. देवा मी तुझ्याकडे येतो. आणि आत्महत्येचा टोकाचा निर्णय ! >>>
तुम्ही नास्तिक असा एकांगी विचार का बरं करतात? आस्तिक प्रयत्नवादी नसतात असं का वाटतं तुम्हाला?
पराकोटीचा आस्तिक म्हणजे ज्याला १००% देवाच्या अस्तित्वा विषयी खात्री आहे तो. पण देव असं नाही म्हणत की तू प्रयत्नच करू नको म्हणून! तो तर म्हणतो, 'तू जे काही करतोस ते मला अर्पण कर मग ते यश असो वा अपयश असो. समचित्त रहा. लढ मी तुझ्या सोबत आहे.'
धागा नैराश्य या विषयी आहे. वर मी एका प्रतिसादात 'देव' संकल्पनेचा उल्लेख केला तो निव्वळ जाणूनबुजून नव्हे तर स्वानुभव म्हणून. माझा स्वत:चा आजवरचा जिवनप्रवास एक नैराश्याच्या गर्तेत खोलवर अडकलेला अल्पवयीन मुलगा ते आजचा एक जबाबदार आनंदी माणूस असा झालेला. जिवनातील कठीण प्रसंगात, आत्मघाताची दिशा खुणावत असताना, 'आत्मघात म्हणजे जिवन उद्धिष्ट नव्हे. आम्ही सोबत आहोत, तू फक्त चालत रहा.' अशी नि:संदिग्ध सुचना शेकडो वर्षांपूर्वीच्या समाधिस्त चैतन्य कानिफनाथांनी वारंवार केलेली आहे. (हा काळ आहे २००६-१२).

तुम्ही नास्तिक असा एकांगी विचार का बरं करतात?
>>>

एकांगी नाही. फक्त एकांगी विचार करणारया आस्तिकांना दुसरे अंग दाखवले ईतकेच Happy
एकांगी विचार श्रद्धेतून येतात, तर्कातून नाही.

असो, आस्तिक नास्तिक धाग्याचा विषय नाही. मात्र नैराश्याबाबत बोलायचे झाल्यास देवावरची श्रद्धा ही दोनधारी तलवार आहे. शेवटी तुमच्यातील सकारात्मकताच देव या संकल्पनेचा कसा फायदा करून घेते वा त्याचे नुकसान होते हे ठरते.

आणि हो, माझा देव आहे यावर विश्वास नसला तरी देव या संकल्पनेला माझा विरोध नाही. देवाचे फायदे तोटे दोन्ही आहेत. फक्त ते ध्यानात घेतले पाहिजे.

मी थोडं विषयाशी संबंधित, देवबिव गोंधळात न पडता, सिरिअस लिहू का? (पूर्वी दुसर्या ठिकाणी लिहीलेले पेस्ट करत आहे..)

मी डिप्रेशन ह्या विषयावर कधीच नीट लिहू शकले नाही. कारण तो माझ्या आयुष्यातला फार डार्क पिरिअड आहे. आणि स्वतःच्या अशा निराश, उदास भावना कोणाकडे एक्स्प्रेस करणे हा माझा कधीच स्वभाव नव्हता. त्यामुळे हे इथे लिहीणे माझ्यासाठी फारच जास्त धाडसाचे आहे. मी माझ्यातील इतकी व्हल्नरेबल साईड कधी जगासमोर आणली नसेल. पण लिहीता लिहीता मला वाटले, व्हाय नॉट? काय होईल? सगळ्यांना समजेल मी किती कामातून गेलेली मुलगी आहे? की माझी प्रत्येक अ‍ॅक्शन जज होईल? I don't think so! इन्फॅक्ट झालाच तर कोणाला तरी उपयोगच होऊ शकतो. म्हणूनच केवळ इथे लिहीत आहे.

हिअर गोजः

I have mentioned it but never talked about it in details. I have been there. I was extremely depressed for almost 2-3 years. म्हणजे अधनंमधनं नैरश्य जाणवत होते. मग काही दिवसांनी जायचे. असे बराच काळ चालू राहिले. पण दोनेक वर्षापूर्वी जरा आउटबर्स्ट झाला. शेवटी शेवटी भयंकर मेल्टडाऊन्स झाले. कोणीच म्हणजे कोणीच मला समजू शकत नाहीये या प्रकाराचा मानसिक त्रास जास्त झाला. आमच्याकडे सगळे ओवरहेल्पर्स आहेत. म्हणजे मी दु:खात आहे हे कळत होते सगळ्यांना. नवरा भरपूर सपोर्ट करत होता. पण रोज रडे त्याला कोण मरे असेही झाले होतेच माझ्याबबतीत. तेव्हा आईबाबा आले होते माझ्याकडे. ते इतके ओव्हर द बोर्ड जाऊन मदत करतात. घरचे आवरणे, नीलचे बघणे, इतरही काही. मला मात्र चांगलं वाटायचे सोडून प्रत्येक अ‍ॅक्शन खटकायला लागली. सगळ्यांचीच. माझं काहीतरी मेजरच बिघडले आहे हे कळत होते. पण दोरीने बांधून काळ्या काळ्या विहिरीत टाकल्यासारखे झाले होते. धडपड करून उठले पाहिजे,,बाहेर पडले पाहिजे हे कळत होते. पण जमत नव्हते. नक्की काय केले म्हणजे उठता येईल, हात पाय हलवता येतील हे कळत नव्हते. मला मदत नको होती. I just wanted someone to acknowledge what I am going through. मग एके क्षणी लाईटबल्ब मोमेंट आली. एका मेल्टडाऊनलाच. ओक्साबोक्शी रडत होते. अन् कोणालाच 'समजत' नाहीये मी; ह्या कल्पनेने हताश झाले. आधी अजून जास्त डार्क प्लेसला ढकलले गेले. पण मग लक्षात आले. ह्यातून बाहेर येणे केवळ तुलाच जमणार आहे. बाकी, Nobody is going to help you.. I mean, they can. they are. going overboard with it. but that's not what you want. तर मग तूच प्रयत्न केले पाहीजेत. मी जगात एकटी आहे हे फिलिंग मला एकाचवेळेस घाबरवून व सुखाऊन गेले. कारण मी जर एकटीच आहे, तर I am on my own. तर अपेक्षाभंगाचे दु:ख्ख नाही. नाही कोणाला कळते माझं दु:ख्ख तर काय बिघडते. You know what it is. own it.. change it. then, I did.. एका क्षणात नाही बदललं. पण मी एकटी आहे हे फिलिंग कायम मला हेल्प करते. एकटी हा जरा निगेटीव्ह छटा असलेला वर्ड आहे. पण एनीवे..

मला माहीतीय माझे डीप्रेशन फक्त नीलमुळे नाहीये. नीलमुळे आउटबर्स्ट झाला. पण फार फार पूर्वीपासून बऱ्याच कारणांमुळे मी निराश होत गेले होते. मला कळत होतं मी उदासिन होत आहे पण तितकं महत्व दिले नव्हते. पोस्टपार्टम मला वाटतं व्होल्कॅनो साठत गेला. पण तेव्हा मात्र मला कळले नाही की मला पोस्ट पार्टम डिप्रेशन आहे/होते.

नील झाल्यावर दोन चार महीने टफ होते. मला भयंकर फिजिकल त्रास होते. त्यामुळे मी कावलेली असायचे. बहुधा त्यामुळे मला तितकं कनेक्टेड वाटत नव्हतं त्याच्याबरोबर. पण नशीबाने आई बाबा होते. त्यामुळे नीलची आबाळ झाली नाही. हळूहळू मीही ठीक झाले. एकदम मस्त. नील सव्वा वर्षाचा होईपर्यंत अक्षरश: सुखी होते. पण नील बोलेना मग नव्याने परत सुरू झाले. मी स्वत:ला टोटल फेल्युअर समजत होते. मग ते वाढतंच गेले. आॅटीझम डायग्नोस झाल्यावर कुठून तरी बळ आले. दोन वर्ष खूप मेहनत घेतली. जर्नी विथ आॅटीझम वगैरे या काळात सुरू केले. पण त्या पाॅझिटीविटी लेखात लिहील्यापर्माणे ओंडका झिजत चालल्याचे फिलिंग येऊ लागले.. कारण नीलमध्ये तशी सुधारणा नव्हती होत. एकही सिलॅबल बोलला नाही तो दोन वर्षात. मग वर्षभर भयंकर रडारडी केली. नीलचे फ्युचर डार्क दिसत होते. मग जरा मी मेले तर बरं विचार येउ लागल्यावर चपापले. डाॅ.शी भांडून सगळ्या टेस्ट करून घेतल्या . हायपोथायराॅईडीझम निघाले. तेव्हापासून स्वत:ला जास्त चांगली ओळखू लागले. मी निराशी मुलगी असू शकते पण स्वत:ला फेल्युअर समजणारी सुसायडल मुलगी नाही हा मोठा सिग्नल कळला. मग लक्ष ठेउन असते तेव्हापासून. काय केल्याने बरं वाटतं. काय खाल्ल्याने बरं वाटतं हा रीसर्च करून मनही रमत गेलं आणि मला फायदाही झाला. माझ्या वेबसाईटचे, आवडीचे काम सुरू केले, त्यामुळे सर्वात जास्त फायदा झाला. आता पूर्वीइतका वेळच मिळत नाही तर कुठले नैराश्य? पण तरी भावनांचा रोलर कोस्टर चालू असतो. कधी वर कधी खाली. मी पूर्णपणे आनंदी कधी होईन माहीत नाही. कदाचित नील बोलेल तेव्हा- हेच इमिडिएट उत्तर येते. पण ते उत्तर बदलवायचे आहे. तो बोलेल, नीट होईल तेव्हा मला भरपूरच आनंद होईल. पण केवळ तेच माझे ध्येय नसले पाहिजे. स्वतःला रिमाईंड करत असते. I am responsible for my own happiness. That kinda keeps me going.

मी काऊन्सेलिंग घेतले नाही. बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होईल. पण मला नसता झाला. I just knew that. I do not believe in counseling because of this nature of mine. मी पूर्ण मोकळं कधी होऊच शकणार नाही. मग पैसे मोजून सुद्धा हा बाबा/ही बया समजू शकत नाहीये आपल्याला म्हणून चिडचिड नक्की होईल.. पण मी प्रायमरी फिजिशियनशी मात्र बोलत होते. टेस्ट्स करून घेत होते..

Oh yes!.. One more thing helped me. My sense of humor.. Like chandler, it makes me crack jokes whenever I am nervous. तेव्हाची मोमेंट पार पडायची. well I know, इतरांना त्रास नक्कीच झाला असेल मात्र माझ्या सततच्या फाकोंचा. Proud

एनीवे.. थोडक्यात.. कायम लक्षात ठेवायचे जगात कोणतीही परिस्थिती अशी नाही ज्यावर उत्तर आपल्याकडे नाही. I would not advise to bear all the stress of getting out of this current state of mind on ourselves. शक्य त्यांनी, तेव्हा काउन्सेलरकडे जावेच. कोणाशी तरी बोलत राहावेच. But, if need be .. You can DO it! never forget this. शेवटी बदल आपल्यालाच घडवुन आणायचा असतो. गांधी फरसे आवडत नाहीत मला. but love - be the change you wish to see in the world. उत्तर कधीच पटकन सापडत नाही. Have patience and wait for the solution. ओप्राचा एक व्हीडीओ अफाट आहें आत्ता जे चालू आहे ते पटत नाहीये ना? मग स्ट्रॅटेजी बदला. If the current strategy is not working, that's the noise in your life. this noise is the distraction.. you need to move away from noise and go towards the solution; by trying out different strategies... everything falls into place, eventually..

डॉ. मनाली यांचा प्रतिसाद वाचायचा राहिला होता. सेम माझ्या मनातील विचार लिहीले आहेत त्यांनी. इमोशनल इंडीपेंडन्स. येस येस! धिस इज द की.

बस्कु, डॉ मनाली, खूप सेन्सिबल प्रतीसाद.
प्रत्येकासाठी बेस्ट वर्क करणारं सोलयुशन वेगळं.
पण हे खरं की 'देवावर विश्वास ठेवा, हिंडून फिरुन या,छंदात मन रमवा' (फक्त) इतकंच करुन सुटणारा हा विषय नाही.

Dev hi concept aali ki mala ekach vichar yeto.. Science is more convincing than God