Submitted by मंदार खरे on 14 March, 2016 - 01:04
मन
मन चंचल पाखरु
कसे त्याला आवरु
कधी रमते ऐलतीरावर
क्षणात नजर पैलतीरावर
मन चंचल पाखरु
कसे त्याला सावरु
कधी आनंदडोही विहार
क्षणात चिंतेचा शहार
मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलासी भोगी
मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलक्षण भोगी
मन चंचल पाखरु
कसे त्याला चितारु
कधी ऊंच गगनात
क्षणात सोनेरी पिंजर्यात
मन चंचल पाखरु
कसे त्याला गोंजारु
कधी घुटमळे पायात
क्षणात नखे नरड्यात
मन चंचल पाखरु
कसे त्याला चुचकारु
कधी जाज्वल्य अभिमान
क्षणात उपहास कस्पटासमान
मन चंचल पाखरु
कसे त्याला धरु
कधी कवडसा खिडकीतून
क्षणात चांदणे नभातून
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा