वय आणि मन

Submitted by संजय मेहेंदळे on 19 January, 2017 - 21:17

लहानपणी निरागस असतं
जसं देवाघरचं फूल असतं
पाप-पुण्याच्या बाहेर असतं
द्यायचं घ्यायचं काही नसतं
.
तरुणपणी भावनाप्रधान असतं
सगळं जग सुंदर दिसतं
हळुवार क्षणी कोणावर तरी जडतं
मग आपल्या हातात काही नसतं
.
उतारवयात हळवं होतं
गतस्मृतीत जास्त रमतं
दुःखद आठवणींनी डोळे टिपतं
आता सगळं विसरायचं असतं
.
मन खरं तर मुक्त असतं
उगाच वयाचा चष्मा चढवतं
कधीतरी वयाला चुकवायचं असतं
मनाला मनासारखं वागू द्यायचं असतं
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान..... !