वय

माबो आयडीधारकांचे वय किती वाटते?

Submitted by मानव पृथ्वीकर on 14 September, 2020 - 12:17

तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.

आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!

वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.

आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.

चला तर मग.

विषय: 
शब्दखुणा: 

रंगपेटी

Submitted by रंगराव on 15 July, 2019 - 11:45

काल प्रवासात नेटफ्लिक्सचा तीन और आध‍ाचा शेवटचा एपिसोड पाहिला. एम. के. रैना अन् सुहासिनी मुळेच्या 'कामराज' ची थीम आहे सत्तरीच्या जोडप्याला जगताना मध्येच हरवलेली इंटिमसी. एकाच शॉटमध्ये पुर्ण कथा शुट करण्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यापेक्षा मी अडकलो तो वेगळ्याच गुंत्यात... अचानक गवसलेला क्षण बांधुन ठेवण्यासाठी ती त्याला म्हणते की आता बाहेर जावु नकोस, tomorrow you will not be same again.

विषय: 
शब्दखुणा: 

झळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...

Submitted by Anuja Mulay on 22 March, 2018 - 12:57

मीराचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. ऑस्ट्रेलियाला जाऊन MS केलं आणि तिकडेच पुढे PhD देखील करण्याची तिची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या मते वय वाढत चालल्याने आता तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करणं आवश्यक होतं. 'तुझं कुठं काही आहे का? आत्ताच सांग बाई! नंतर अभ्रूचे धिंडवडे नकोत आमच्या.' असं तिच्या वडिलांनी विचारल्यावर तिचं कोणावरही प्रेम नाही किंवा तिच्या मनात देखील कोणी नाही असे सांगताच 'आम्ही आता तुझ्यासाठी स्थळ बघायला मोकळे, हो की नाही?' असे तिच्या वडिलांनी विचारले. जरा नाराज होऊनच तिने 'हो' म्हणून सांगितले. तिला पुढे अजून शिकायचं होतं. अगदी परदेशातच नाही तर भारतात सुद्धा तिला चाललं असतं.

विषय: 
शब्दखुणा: 

पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का?

Submitted by सचिन काळे on 7 March, 2017 - 12:08

आज रविवार! मस्त सुट्टीचा दिवस. श्रीयुत दिलीप, सकाळचा नाष्टा वगैरे आटपून आरामखुर्चीमध्ये पेपर वाचत बसलेले आहेत. त्यांचे रिटायरमेंटहि जवळ आलेले असल्याकारणाने पेपरमध्ये त्यासंबंधित लेख वाचण्यावर आजकाल त्यांचा भर असतो. त्यांच्या सौभाग्यवती अनिताची स्वैंपाकघरात आवराआवर चाललीय. मुलगी जाई, स्टडीरुममध्ये कॉलेजचे प्रोजेक्ट पूर्ण करत बसलीय. तिचे हे कॉलेजचे शेवटचे वर्ष. पुढील दोनएक वर्षात तिला उजवायचा त्यांचा विचार आहे. तिला आतापासूनच लग्नाच्या मागण्या येण्यास सुरुवात झाली आहे.

शब्दखुणा: 

वय आणि मन

Submitted by संजय मेहेंदळे on 19 January, 2017 - 21:17

लहानपणी निरागस असतं
जसं देवाघरचं फूल असतं
पाप-पुण्याच्या बाहेर असतं
द्यायचं घ्यायचं काही नसतं
.
तरुणपणी भावनाप्रधान असतं
सगळं जग सुंदर दिसतं
हळुवार क्षणी कोणावर तरी जडतं
मग आपल्या हातात काही नसतं
.
उतारवयात हळवं होतं
गतस्मृतीत जास्त रमतं
दुःखद आठवणींनी डोळे टिपतं
आता सगळं विसरायचं असतं
.
मन खरं तर मुक्त असतं
उगाच वयाचा चष्मा चढवतं
कधीतरी वयाला चुकवायचं असतं
मनाला मनासारखं वागू द्यायचं असतं
.

शब्दखुणा: 

प्रवास

Submitted by prachi kulkarni on 2 January, 2014 - 13:18

लहानपणापासून इंग्रजी माझं पाहिलं प्रेम कि मराठी, ह्या मी कधीच सुरु न केलेल्या वादात मी नेहमीच अडकते! मी इंग्रजी माध्यमातून शिकल्याचा काही मंडळींना राग येतो तर अनेक अति इंग्रजाळलेले प्राणी माझ्या इंग्रजी संभाषणातील येणाऱ्या मराठी संदर्भांबद्दल माझ्यावर डूख धरतात. खुप त्रिशंकू अवस्था होतो हो माझी! डोक्यात एक तर मराठीत विचार येतात नाहीतर इंग्रजीत( हिंदीचं तर सोडूनच द्या,ती अजून 'परडी में करडू वरड्या' वरचं अडकलेली आहे.) आणि ते विचार जसे ज्या भाषेत येतात तसे मी व्यक्त करते. इंग्रजी कि मराठी हा विचार कधीच येत नाही माझ्या डोक्यात! हि पोस्ट लिहिताना डोक्यात भराभर मराठी शब्द वाहत होते.

विषय: 

वयाची ऐशीतैशी...

Submitted by मोहना on 12 February, 2013 - 22:49

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकर्त्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोटाळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वय