३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.
"ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं! " .....
टोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दिलीप प्रभावळकरांचं असं वर्णन नक्कीच करता येईल. साधारण २-२.५ तासाचा असा हा कार्यक्रम, सुरुवातीपासुन शेवटपर्यंत त्यांनी हसताखेळता ठेवला!
"अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"
"८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.
अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.
परंपरेने झालोच पहा कसा वेगळा
विचार करताच मी जरासा 'तसा' वेगळा
माझी फांदी मलाच म्हटली, 'सोड मला तू...'
लटपट उडली झालो मी जसजसा वेगळा
एकरूप मी तुझ्या अंतरी निश्चित आहे
काय करावे? तरी उमटतो ठसा वेगळा
बोलायाचे असते पण ती बोलत नाही
स्वभाव असतो एकेकाचा असा वेगळा
वेगवेगळा मी असतो प्रत्येक ठिकाणी...
की असतो बघणार्याचा आरसा वेगळा ?
कुणास काही पडले नाही गुणवत्तेशी
मीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा
जवळीक बघुन ठरवू नकोस तू गूण 'अजय'
सूर्य वेगळा अन् त्याचा कवडसा वेगळा
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
काल google marathi transliteration IME download केले
http://www.google.com/ime/transliteration/
वापरावयास सोपे वाटते, आणी शब्द पण सुचवते (like word auto complete )
या प्रणाली ने कुठेही मराठी लिहिता येते. म्हणजे आउट्लुक, नोट्पॅड, वर्ड अस कुठेही. फक्त शिफ्ट अल्ट दाबुन इंग्रजी व मराठी भाषा बदलता येतात.
हे विविध भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसर्या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल.
पुन्हा एकदा सारेगमप !!!! 
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा