भुतकथा

प्रतिशोध भाग-पहिला

Submitted by कविता९८ on 15 September, 2016 - 04:21

कथेचे नाव - " प्रतिशोध"
लेखिका - कविता नाईक (कऊ)

प्रसंग पहिला
" शीट यार ,खूपच late झाला..
एवढा ngo चालवतो हा आकाश , पण एका मेंबरला माझ्यासोबत पाठवू शकला नाही का...
मीच मूर्ख जी गेली रांगोळी काढायला..
पुन्हा सकाळी जायचयंरांगोळी काढायला..
गुढीपाडवा ना..
रात्री जागून रांगोळ्या काढा मग सकाळी मस्त तयार होऊन Rally मध्ये भाग घ्या.."
स्वतःशीच बडबडत ती चालत होती.
[आकाश एका NGO (संस्थेचा) अध्यक्ष..]
आणि ती???
बिचारी आकाश साठी अन संस्थेसाठी म्हणून रात्री 10.30 ला गेली,रांगोळी काढायला..
तो बैठकीवरून येईपर्यंत लेट झाला आणि म्हणून तिला रांगोळी पूर्ण करून घरी जायला लेट झाला..

शब्दखुणा: 

पद्मा आजींच्या गोष्टी ६ : भुताची गोष्ट

Submitted by पद्मा आजी on 24 February, 2016 - 14:49

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

विजय ने 'तेल गेले पण वर्ष मिळाले' च्या प्रतिसादात भुताच्या गोष्टीची मागणी केली आणि तश्या काही गोष्टी आठवल्या. त्यातली एक.

गोष्ट आहे जुनी. मी शाळेत होते तेव्हा. तिसरी केव्हा चौथीत असेल. मी आणि माझ्या बहिणी मिळून आम्ही शाळेत जायचो. आमची शाळा होती तशी दूरच. चालत चालत जायचो दररोज.

आमचा नेहेमीचा रस्ता जाई बाजार पेठेतून. फिरत फिरत. बऱ्याच वेळा आई आम्हाला काही काही विकत पण आणायला सांगायची शाळेतून येताना.

विषय: 
प्रांत/गाव: 

चकवा

Submitted by नितीनचंद्र on 14 October, 2012 - 22:46

पार्टी संपली, सगळे डुलत डुलत बाहेर आले. चला पान खाऊ घालतो सगळ्यांना बाब्या म्हणाला. बाब्याने किक मारताच मी उस्मान्या आणि दिल्या त्याच्या मागे आपापल्या गाड्यांना किका मारुन जाऊ लागलो. अजुनही जुन्या जकात नाक्यावरच पानाच दुकान उघड होत. केवळ अंगावरचे कपडे घेऊन आलेला बाबुलाल आता दुकानाच्या वरची दोन फ़्लॅट घेऊन मोठ्ठा पानवाला झाला होता.

विषय: 

मी परत येइन ......

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 October, 2010 - 03:35

तांदळ्याला जाणारी एस.टी. तडवळे फाट्यावर थांबली. ड्रायव्हरने सीटखाली ठेवलेली डाकेची पिशवी उचलुन फाट्यावर उभ्या असलेल्या दिरगुळे मास्तरांच्या हवाली केली. मास्तरांनी हातावर मळलेली तंबाखु थोडी दाढेखाली दाबली, उरलेली ड्रायव्हरच्या हातावर टेकवली.

"कसं काय मास्तर, बरं हाय ना?"

"होय की, सगळं ठिक आहे सखारामदादा."

गुलमोहर: 

तहान

Submitted by प्रसिक on 16 September, 2010 - 05:39

haunted_house_1_0.png "अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"

"८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.

अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - भुतकथा