भयकथा

खेळ तर आता सुरु झाला आहे!

Submitted by निमिष_सोनार on 29 May, 2024 - 03:35

राजेश त्याच्या खोलीत एकटा बेडवर बसला होता कारण त्याचे खोलीतील दोन्ही मित्र दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीचे अंधारलेले क्षण खोलीत पसरले होते कारण लाईट गेलेले होते. त्याला एकटेपण सहन होत नव्हते. तो फक्त घड्याळाची टिकटिक ऐकत होता.

विषय: 
शब्दखुणा: 

भरणी श्राद्ध ( भयकथा ) भाग १

Submitted by प्रथमेश काटे on 2 October, 2023 - 13:25

आज रंगाच्या वडिलांचे भरणी श्राद्ध होते. सकाळची वेळ. किचनमध्ये तयार होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट घरभर पसरला होता. बाहेरच्या खोलीत लोक येऊन बसायला लागली होती‌. रंगनाथ भिंतीला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसून त्यांच्याशी बोलत होता चाहुलीनं त्याची नजर दरवाज्याकडे गेली. त्याचे दोस्त शांताराम दामू आणि येसाजी आले होते.

शब्दखुणा: 

कलूआजी! - संपूर्ण!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2021 - 14:06

बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो.
दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही.
तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं.
म्हातारी गेली, तर मग तेही बंद...
संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो.
रात्र झालेली, भरपूर पाऊस....
कलूआजीचं दार उघडं दिसलं...
कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला.
कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात.
चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते.

शब्दखुणा: 

थरारकथा संकलन

Submitted by प्रथमेश काटे on 2 September, 2020 - 00:28

सर्वप्रथम कथा लिहीण्यापेक्षा लिंक्सच जास्त मागतोय त्याबद्दल क्षमा असावी. २०१५ मध्ये थरारकथा संकलन नावाचा लेख आला होता, तसा धागा पुन्हा सुरू करता येईल का ?

विषय: 
शब्दखुणा: 

प्लँचेट !! भयकथा

Submitted by Kavyalekha on 29 June, 2020 - 11:57

प्लँचेट !
ते पाच जण आज टाकीवर जमले होते…. बऱ्याच दिवसांनी… वेळ काढून…! बिल्डिंगमधले लहानपणापासून चे मित्र होते ते… सगळ्यांच्या करियरच्या वाटा जरी वेगळ्या होत्या तरी कशी का होईना त्यांनी आपली मैत्री टिकवली होती…. खरंतर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इतकंही कठीण नव्हतं ते….
.. आदित्य, नेत्रा, अवनी, विशाल आणि सुदीप.

शब्दखुणा: 

उलट्या पायांची म्हातारी - अंतिम भाग

Submitted by निरंजन कुलकर्णी on 21 May, 2020 - 10:20

कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.

शब्दखुणा: 

उलट्या पायांची म्हातारी - भाग चार

Submitted by निरंजन कुलकर्णी on 20 May, 2020 - 13:54

म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल.

शब्दखुणा: 

उलट्या पायांची म्हातारी - भाग तीन

Submitted by निरंजन कुलकर्णी on 19 May, 2020 - 10:10

"आता अजून एक गोष्ट ऐका.” आज्जी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आज्जीने गोष्टीला सुरुवात केली-

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भयकथा