देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)

दुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.

किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.

भाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’









Submit to kanokani.com

अतिशय इन्टरेस्टिंग माहिती. मस्त. पुढच्या भागाची वाट पहातोय.

किरण, हा लेख 'संगणक देवनागरी' गृपकरता मर्यादित आहे. तो सर्वांसाठी खुला कर.

अरे मी मुद्दामच ते सभासदांसाठी ठेवले होते म्हणजे ज्यांना खरोखरच Interest असेल त्यांना बघता येईल. पण आता असे वाटते की निदान हा लेख तरी सगळ्यांनी वाचावा. त्याप्रमाणे सुधारणा केली आहे.

ह्या लेखावरील काही प्रतिक्रिया लेख १ च्या शेवटी आहेत, कारण आधी मी सर्व एकाच लेखात लिहीत होतो पण तो लांबलचक होऊ लागला. आता अ‍ॅड्मिन साहेबांना त्या प्रतिक्रिया इकडे हलवायची विनंती केली आहे.

ह्म्म... मस्त माहिती. स्मित
मी नसल्याचा चांगला सदुपयोग केलायस फिदीफिदी

मस्त माहिती दिली आहेस रे किरण! ऋ आणि अ + रुकार ही अक्षरे टोपोलॉजिकली एकच येतात हे संशोधन फार भारी आहे!

अरे बापरे! हे काय आहे. मग मोडीच काय?

किती सुंदर आहे हे. सावरकर लिपित लिहिलेली काहि पुस्तके मी बघितलेली आहेत. म्हणजे कधी काळी, निदान त्या अक्षरांचे खिळे तरी वापरात होते. जिथे सावरकरच विस्मृतीत गेले, तिथे ..

ज्ञ चा उच्चार द्+न्+य असा नाही का करायचा ? सध्या तोच तर वापरला जातोय. (इथे ज्ञ लिहिताना, मी तरी हिच तीन अक्षरे वापरतो. )

दिनेशः ज्ञ चा सध्या रुढ असलेला "द्‍न्य" हा उच्चार चुकीचाच आहे. ह्याला ठाम आक्षेप बहुधा सर्वांचाच असेल कारण इतके ते अंगवळणी पडलेले आहे.

मात्र असा उच्चार रुढ होण्याचे कारण ज्‌ञ हा उच्चार करता येणे जीभेला कठीण जाते म्हणून.

ह्याच कारणामुळे जिथे जमेल तसे त्याचे उच्चार केले जातात.

संस्कृत मध्ये ह्याचा उच्चार ज्‌ञ असाच अपेक्षित आहे
हिंदी भाषक त्याचा उच्चार "ग्य" असा करतात.

मिन्ग्लिश मुळे जुनी चूक तशीच पुढे चालू ठेवण्यास (नवीन चुका रुढ करण्याबरोबरच) ही अशीच मदत होते.

इंटरेस्टींग आहे माहिती ..

(मूळात एव्हढे subtle फरक असलेले कठिण उच्चार का रुढ झाले असावेत आणि जर ते रुढ झाले होते आणि आता लयाला जात आहेत तर ह्याला evolution म्हणायचं का? (माझी मराठी भाषा फार चांगली नाही ह्याचा ह्या बीबी वर लिहीताना खेद होतोय आणि विचित्रही वाटतंय) स्मित

लेख छान आणि अभ्यासपुर्ण आहे. अजुनही संशोधन करावे. आपण ज्याला अपभ्रंश म्हणता त्याला अन्य काही म्हणावे असे वाटते. हे भाषासंवर्धन आहे असे वाटते.
माझ्या अल्पमतीने असे म्हणावेसे वाटते की मुळ शुध्द शब्द जेव्हा भाषाविषयक आडचणीमुळे किंवा भाषा विषयक कौशल्याअभावी चुकीचा उच्चारला जातो त्याला अपभ्रंश म्हणावे.

उदा. मुळचा संस्कृत शब्द ज्ञान मराठीत तसाच्या तसा आला कारण त्याला आवश्यक मुळाक्षरे मराठीत उपलब्ध होती. या उलट ती हिंदीत नव्हती म्हणुन ग्यान हा शब्द आला.

यावर विचार करावा.

पुनश्च अभिनंदन आणि पुढील संशोधनास शुभेच्छा

नितिनः शुभेच्छांबद्दल धन्यवाद

अपभ्रंश हा शब्द इथे चुकीचाच आहे ह्याची कल्पना आहे. फक्त अर्थाचे अवलोकन सहज व्हावे म्हणून तो शब्द वापरला आहे. सर्वसाधारणपणे बोलीभाषेवरच सर्व लोक भर देतात. त्यामुळे लिखीत खुणांच्या बदलासाठी असा काही शब्द असावा असे वाटत नाही.

ज्ञ हे अक्षर संस्कृत, हिंदी व मराठी ह्या तिन्ही भाषांमध्ये वापरले जाते, परंतु ते जोड अक्षर (जोडाक्षर) आहे हे मलाही पूर्वी माहित नव्हते. ते ज आणि ञ ह्यापासून बनलेले आहे.

तिच गोष्ट क्ष ह्या अक्षराबद्दल. मात्र त्याचा उच्चार आपण बर्‍यापैकी अचूक करतो. हे अक्षर क आणि ष ह्या मूळाक्षरांपासून बनलेले आहे.

हिन्दीमध्ये लिहिताना ज्ञान हा शब्द ग्यान असा लिहीत नाहीत (लिहीत असल्यास ती शुद्धलेखनाची चूक समजावी) मात्र त्याचा उच्चार ग्यान असा केला जातो तो वर उल्लेखलेल्या कारणामुळे.

sony ericsson mobile var marathi font che software kuthun uplabdha hoil ?

सोनि एरिक्सन मोबाईलावर मराथी फॉन्त कुथे मिळेल ?

ज्ञ च नवा उच्चार जिभेवर रुळवायचा प्रयत्न करतोय.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

विराट ज्ञानी

ज्ञानदेव बाळ माझा

ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव

सगळी गाणी गुणगुणून बघतोय. नाही जमत !!

दिनेश, हो खरा उच्चार मलाही नाही जमत स्मित त्याचे कारण ञ चा स्पष्ट उच्चार आपल्याला झेपत नाही.

छान

जाम इन्टरेस्टिंग आहे स्मित ... असे अजून वाचायला आवडेल ....
तसेच 'ञ' चा उच्चार आणि 'ष' , 'श' यांचे उच्चार पण शिकायचे आहेत ....