कुठेही कधीही मराठीमधे लिहा - गुगल मराठी संगणक प्रणाली (google marathi transliteration IME)

Submitted by सावली on 19 May, 2010 - 23:25

काल google marathi transliteration IME download केले
http://www.google.com/ime/transliteration/

वापरावयास सोपे वाटते, आणी शब्द पण सुचवते (like word auto complete )

या प्रणाली ने कुठेही मराठी लिहिता येते. म्हणजे आउट्लुक, नोट्पॅड, वर्ड अस कुठेही. फक्त शिफ्ट अल्ट दाबुन इंग्रजी व मराठी भाषा बदलता येतात.

हे विविध भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसर्‍या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल.

एक उदाहरण.
marathi.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy हे खरच फार उपयोगी आहे. हे इंस्टॉल केल्यापासुन मी मराठी सगळिकडे लिहायला लागलेय. अगदि वेब इमेल सुद्धा Happy

अजुन एक माहिती.
जिमेल वापरत असाल तर तीथे इमेल कंपोझ करायच्या स्क्रिन वर "अ" अस लिहिल अस्त. ते क्लिक केलत की मराठी मधे जिमेल पाठवता येईल. यासाठी सॉफ्ट्वेअर इंस्टॉल नसेल तरिही चालतं

Which fonts should be installed in order to see the correct characters in ubuntu for Marathi ?
लवकर माहिती मिळाल्यास हवी आहे.

http://www.baraha.com/download.htm

अजुन एक माहिती.
जिमेल वापरत असाल तर तीथे इमेल कंपोझ करायच्या स्क्रिन वर "अ" अस लिहिल अस्त. ते क्लिक केलत की मराठी मधे जिमेल पाठवता येईल. यासाठी सॉफ्ट्वेअर इंस्टॉल नसेल तरिही चालतं>>>
आभार!

बरहा आयएमईला तोड नाही...कुठेही लिहू शकता.
बाकी सगळे अपूर्ण आहेत...हे माझे अनुभवांती बनलेले मत आहे.

बरहाने नोटपॅडमध्ये लिहिलेले देवनागरी लेखन सेव्ह करतांना अन्सीच्या ऐवजी युनिकोडमध्ये सेव्ह करावे लागते..एरवी ते होत नाही..तसेच गुगलच्या बाबतीतही असणार.

मायक्रोसॉफ्ट, गूगल, बराहा व विंडोज/लिनक्स वरील सर्व टूल्स मध्ये मायक्रोसॉफ्ट चे टूल अधिक परीपूर्ण वाटले. बराहामध्ये फ्,ख वगैरे अक्षरे हिंदीप्रमाणे येतात. मायक्रोसॉफ्ट चे टूल अनेक किबोर्ड लेआऊटसाठी वापरता येते. त्यात गूगलप्रमाणेच शब्द दाखविण्याची, ऑनलाईन किबोर्ड दाखविण्याची सुविधा उपलब्ध आहे. एक महत्वाचा प्रॉब्लेम मायक्रोसॉफ्ट च्या टूल मध्ये आहे तो म्हणजे टाईपकेल्यावर लगेचच अक्षरे मूळ अ‍प्लिकेशनमध्ये उमटत नाहीत. त्यासाठी स्पेस किंवा एंटर द्यावे लागते. www.bhashaindia.com वरून मायक्रोसॉफ्टचे टूल डाऊनलोड करता येईल.

बरहा हे अतिशय उपयुक्त आहे. व्गमभन हे सुद्धा चांगले आहे परंतु आता ते विकत मिळते पूर्वी निशुल्क होते तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला होता

aschig, कृपया ओपन ईंटरनॅशनलची लिंक द्याल का ?

एक प्रश्न (एक का? खर तर अनेक प्रश्न आहेत) प्लिज प्लिज गाईड करा.
हे प्याकेज डाऊन लोड करता येते का?
मायबोलीवर कोणते प्याकेज वापरतात?
मी एका कुलवृत्तान्ताची जवळपास ७०० पानान्ची डाटा एण्ट्री करतोय, त्यासाठी स्ट्रिक्ट्ली "युनिकोड फॉण्ट" वापरायचा आहे, वरील गुगलची सोय "युनिकोड फॉण्ट" (मन्गल वगैरे) वापरते का? जेणेकरुन कुलवृत्तान्त भविष्यात इन्टरनेटवर उपलब्ध करुन देता येईल.
सध्या मी यातिल एका तज्ञ व्यक्तिने तयार केलेले प्याकेज वापरतोय, (डाटा एन्ट्री व देवनागरीत टाईप करणे दोन्ही) पण त्यान्नी रचलेला कीस्ट्रोक्स चा सिक्वेन्स मला आजवरच्या सवईपेक्षा खूपच वेगळा व अडचणीचा ठरतोय, टायपिन्गचा वेग मन्दावतोय. सबब मी हे शोधतोय. Happy
मायबोलीवर जे वापरले जाते, ते जरी मिळाले तरी चालेल.
धन्यवाद.

लिंबाजीराव, गूगल आयएमई डाऊनलोड होते. व वापरताही येते. त्या आधारकार्डवाल्यांकडे आयएमईच असते. पण ते भयंकर त्रासदायक आहे टाईप करायला.
डाटा एण्ट्री कशात करीत आहात ते सांगितलेत तर मार्ग सुचवता येतील. माबोवर गमभन चालते बहुतेक. माझ्याकडे जुने बरहाचे फ्री व्हर्जन आहे. हवे असेल तर देतो. व्यनी करा.

बाजो, तोच तर प्रॉब्लेम आहे, सध्या वापरत असलेल्या सिस्टिम बाबत. Sad
इब्लिस, डाटा एन्ट्रीकरता, बहुतेक वेब बेस्ड (एच्टीएमेल) फ्रण्ट शीट आहे व तो डाटा एक्स एम एल मधे ठेवतो. कुल दिसण्या/दाखविण्यासाठी ट्री वगैरे सुविधा आहेत
यात देवनागरीमधेच एन्ट्रि अपेक्षित आहे, व भविष्यात ती नेट वर पब्लिश होईल, सबब फॉण्ट युनिकोडच हवा.
बरहा सर्व माझ्याकडे आहेत, फक्त बरहा१० नाही जे ३० डॉलर भरुन मिळते, शिवाय ते एकाच पीसीवर वापरता येते, पीसी बदलायची सुविधा देखिल नाही. Sad सबब मी तिकडे जात नाही, अन्यथा मी बरहाच्या आधीच्या साध्या फॉण्ट च्या प्याकेजशी परिचित आहे.
गमभन बघतो, गुगलही बघतो, दुर्दैवाने इथे ऑफिसमधे मला काहीच प्रयन्त ट्रायल्स वगैरे करता येत नाही. म्हणून सर्व काही विचारावे लागते आहे. Sad
असो.
गुगलचे ऑन्लाईन वापरायचे तर पत्ता काय आहे?
हे डाऊनलोड करुन घेतलय, आज घरी बघतो.

लिंबाजीराव,
नवीन बराहा घेऊच नका. ट्रायल जरी इन्स्टॉल केलीत तरी जुन्य व्हर्जन्स बंद पाडतं ते.
जुन्या बराहाचं आयएमई चालवा की. सिंपल आहे ते वापरायला. ते चालू केलं की कुठेही टाईप करता येते. गूगल आयएमई वापरायला बोजड आहे. आपण टाईप एक करतो, तो दीडशहाणपणे तिसरेच अक्षर दाखवतो.
नवशिक्या टायपिंगला ठीक, पण इतरांना बोअर होते ते.
गूगलच्या पेजमधे ते मोअर येतं ना? तिथे याची लिंक आहे.
http://www.google.com/inputtools/windows/index.html

Pages