ड्रीम ईलेव्हन नावाचे जुगार - निषेध धागा
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 April, 2023 - 01:34
ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..
बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.
विषय:
शब्दखुणा: