नाग

सर्परानी

Submitted by कृतिक शैलेश पटेल on 15 May, 2021 - 09:39

नाही पाहिले भय कधी नेत्री तुझ्या
नाही दिसले भय त्या चेहऱ्यावर
हरवून गेले सर्व भय मनातील माझ्या
जेव्हा फेकला सहज तो साप उचलून सूपावर ।।१।।

असा कसा मी भयभीत झालो
नको नको ते करीत बसलो
करून गेली तू ते त्या क्षणी
बसली तेव्हाच माझ्या मणी ।।२।।
नाही कधीच हिंमत लोकांसमोर येण्याची
मग कुठून आली ती ऊर्जा तांडव करण्याची
मीही होतो धैर्याने अंधारात हिंडनारो
परंतु ऐकून लोकांचे भय झालो घाबरणारो।।३।।

विषय: 

घरात खुप साप झालेत - उपाय सुचवा

Submitted by ऋन्मेऽऽऽष on 20 March, 2021 - 05:54

माझ घर तस शहराबाहेर आहे. इकडे आधीही लोक कमी यायचे पण जवळच्या रस्त्याला थोडी रहदारी राहायची. करोना आल्यापासून इकडे माणुस दृष्टीस पडणे कठीण झाले.

तशात हळुहळू आजुबाजुला आणि अंगणात सापांची संख्या फोफवून राहिली होती. आधी छोटे पिल्ले दिसायचे. ते आता लई मोठे झाले आहेत. माझ्या कडे खूप गाई म्हशी आहे आणि पुशकळ दूध रहाते घरात. त्यामुळे साप घरात पण शीरु लागले दूध प्यायला. अन आता त्यांची संख्या प्रचंड होउन गेली आणि ते आता खुप उपद्रवही देउन राहिले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

नागिण [हरपिस ]

Submitted by प्रभा on 3 December, 2014 - 04:31

आम्हाला जपानला येवुन दीड महिना झाला. एक महिना खुप आनंदात गेला. त्यानंतर माझी मान सारखी अकडायची. खुपच त्रास होत होता. फोमच्या गादी, उशीने असेल म्हणुन मानेचे , हाताचे व्यायाम करुन बघितले. पण काहीच आराम नाही. उलट त्रास वाढतच होता. नंतर खांदा, व उजवा हात खुपच दुखायला लागला. असह्य वेदना-- सहनच होईना. येथे मेडिकल प्रॉब्लेम. काय कराव कळेना.. पेन-किलरचाहि उपयोग होईना. हातावर रॅश दिसायला लागली. शेवटी जापनीज डॉ. कडे गेलो. ते म्हणाले 'हरपिस ' आहे. ट्रीटमेंट चालु केली. आता थोडा आराम आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

हत्या: द मर्डर

Submitted by मंदार on 1 November, 2014 - 12:40

थ्री इडीयटस मधे वीरु सहस्रबुद्धे एके ठिकाणी म्हणतो, की चंद्रावर गेलेल्या पहील्या माणसाचं नाव सर्व जगाला माहीतीय, पण त्याच्या मागोमाग गेलेल्या दुसर्‍या माणसाचं नाव मात्र कोणालाच माहीत नाही. तसाच काहीसा प्रकार 'हत्या: द मर्डर' या चित्रपटाबाबत घडलेला आहे. निर्मीतीस ११ वर्षे लागलेला 'मुघल-ए-आझम' सगळ्यांना माहीत आहे, पण १९९२ ते २००३ अशी तब्बल ११ वर्षे अविरत कष्ट करुन बनलेली उत्तुंग कलाकृती म्हणजेच 'हत्या: द मर्डर' मात्र फारशा लोकांना माहीत नाही. या भव्य चित्रपटाची ओळख व्हावी म्हणून हा रिव्हूप्रपंच!

विषय: 

दुर्दैव

Submitted by डॉ अशोक on 11 August, 2013 - 03:59


दुर्दैव

वहात जावे ज्यांच्या संगे, प्रवाह ऐसे उरले नाही
दिपून जावे डोळे ज्यांनी, भास्कर ऐसे दिसले नाही
*
कितीक पंचम्या आल्या गेल्या, पुंग्या ही वाजवून झाल्या
भिनून घ्यावे जहर जयांचे, नागच ऐसे डसले नाही !
*
प्रवास झाला उभा-आडवा, थकून होतो कधी थांबलो
राहुन जावे कायम जेथे, गावच ऐसे भिडले नाही
*
शिकार व्हावी हीच मनीषा, व्हावे लक्ष्य ही एकच आशा
रक्ताळूनही मन हासावे, बाणच ऐसे घुसले नाही
*
रदिफ-काफिये नाचून गेले, घेवुन आले अलामतींना
ठाव घेतील रसिक मनाचा, शेरच ऐसे सुचले नाही

शब्दखुणा: 

सर्प ...

Submitted by सेनापती... on 31 May, 2011 - 05:47

पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे..

१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नाग