ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. जगातील सर्वांत मोठा सोहळा. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा. वेगवान, उच्च आणि बळकट असे ब्रीड मिरवणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजक होऊन आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे.
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं).
वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!
सेहवाग आज निव्रुत्त झाला. तसा तो गेले काही वर्षे असूनही नसल्यासारखाच होता. तसा दोन वर्षांपूर्वी IPL बाद फेरीमधे जुना सेहवाग दिसला होता ते चमकणे अल्पजिवीच होते. सेहवाग काय चीज होता ह्याचे वर्णन शब्दांमधे करणे अशक्य आहे. किंबरचा haa लेख सेहवाग काय होता हे बरोबर पकडतोय असे वाटले म्हणून इथे डकवतोय.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/930743.html
क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका व्हावी म्हणून बरेच प्रयत्न करत आहेत असे वाचले. खालील बातमीमधे लिहिले आहे त्याप्रमाणे, त्यांनी त्यासाठी ढाका - कोलकाता प्रवास केला, त्यादम्यान पोलीसांनी पकडल्यावरही त्याबद्दल काही न बोलता दालमियांचे कौतुक केले इत्यादी.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5120885376480359052&Se...संपादकीय&NewsDate=20150512&Provider=-&NewsTitle=पाकिस्तानचा ‘न्योता’
७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्याच्या डोक्यात येणार्या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"! तेथे कोणी कॅच घेतला का, आणि नसेल तर फोर गेली का, बास!
चहा, क्रिकेट आणि रेल्वे! ज्या ट्रीप मधे हे मुबलक व सहज दिसेल्/मिळेल त्या ट्रिप बद्दल मला जरा जास्तच उत्सुकता असते. न्यूझीलंडला जायचे ठरल्यावर याचा रिसर्च लगेच केला. चहा तेथे सहज मिळतो असे कळाले, क्रिकेटबद्दल माहिती होतेच. रेल्वे फार नाहीत असेही कळाले. पण एक दोन प्रवास चांगले आहेत ही माहिती मिळाली.