लुकलुकती दिवाळी
पहाटे 5 वाजता आल्हाददायक वातावरणात मिट्ट काळोखात, गुलाबी थंडीमध्ये अभ्यंग स्नान करण्यासाठी उठवण्यात येते. घराघरांत केवळ खिडकीच्या कठड्यांवरच्या पणत्यांची गवताच्या पात्यांप्रमाणे लवलवणारी केशरी वात, प्रकाशाचे वेगवेगळे ताल धरून नाचणारी दिव्याची माळ आणि रंगीबेरंगी आकाशकंदील यांचा प्रकाश असतो. मातीमध्ये जागोजागी विखुरलेल्या रत्नांसारखा काळोखात उठून दिसत असतो. एरवी कर्णकर्कश्श वाटणारे आणि छातीत धडकी भरवणारे फटाके आज background music सारखे भासतात. अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांमध्ये शुक्राच्या चांदणीची भर पडते. दूर अंतरावरील मशिदीमध्ये चालू झालेली अजान पण या थंडीमध्ये आणि शांततेमध्ये कानावर पडते.

याच्या खालच्या दशा अंधारामुळे दिसत नाहीयेत. 