सुट्टी

Submitted by वावे on 20 October, 2022 - 06:10

दिवाळीची सुटी तोंडावर आलेली.
हवेत गारवा वाढायला लागलेला.
दुपारचं मऊ ऊन हवंहवंसं वाटणारं.
जवळपास रिकामं झालेलं कॉलेज आणि होस्टेल.
कुठेतरी तुरळक चुकार मुलंमुली.
तेही आपल्यासारखेच निवांत.
कॅन्टीनही शांत.
किंबहुना सगळ्या हवेवरच एक उबदार, आनंदी निवांतपणा पसरलेला.
आपलं काही तरी बारीकसं काम कॉलेजमध्ये.
ते आटपून आपणही दिवाळीला घरी जायला निघणार.
अशा वेळी कॅन्टीनमध्ये अनपेक्षितपणे भेटलेला मित्र आणि त्याच्याबरोबर घेतलेला चहा.
काय रंगतात ना गप्पा अशा वेळी!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्चुअली औघड आहे अश्या वेळी गप्पा रंगणे.. कारण मन ऑलरेडी घरी पोहोचलेले असते.
अपवाद - भेटलेला मित्र भिन्नलिंगी आणि तसाच आवडीचा असेल Happy

कॉलेजचं/होस्टेलचं पहिलंच वर्ष असेल तर होमसिकनेस असतो. नंतर कमी होतो. म्हणजे घरी जायची ओढ असतेच, पण जिथे राहतोय तिथेही मन रमलेलं असतं. उद्या जाणारच आहोत घरी हे माहिती असल्यावर आपण अस्वस्थ नसतो फारसे. निवांतपणा असतो.
'भिन्नलिंगी आणि आवडीचा'>> शक्य आहे. पण जनरल मित्रच म्हणायचंय. 'खास' नव्हे.

होस्टेलवर राहण्याचा अनुभव नाही. पण सुरुवातीचं वर्णन वाचून, का कोण जाणे, हॅरी - हर्मायनी- रॉन एका ख्रिसमसला हॉगवर्ट्समध्येच राहतात तेव्हाचं वर्णन आठवलं.

कॉलेजचं/होस्टेलचं पहिलंच वर्ष असेल तर होमसिकनेस असतो. नंतर कमी होतो.
>>>
अच्छा, मला याचा अनुभव नाही. मी एकच वर्ष राहिलो आहे हॉस्टेलला.

पण वर मी जे म्हटलेय त्याचा अनुभव आहे. अगदी तसाच नाही. थोड्याफार फरकाने..
तेव्हा आम्ही कॉलेज हॉस्टेलला न राहता पेईंग गेस्ट म्हणून बाहेर राहायचो. ज्या रात्री मुंबईसाठी निघायचे होते त्याच दुपारी एका मित्राला पकडून शुकशुकाट झालेल्या कॉलेजला भटकायला गेलेलो. कारण आवडीची मुलगी हॉस्टेलला राहायची. ती कुठेतरी दिसेल ही अपेक्षा. तिची एक झलक दिसावी म्हणून दुपारपासून संध्याकाळपर्यंत भटकणे झालेल. शेवटी संध्याकाळी ती दिसली. डिटेल पुन्हा कधीतरी. पण त्यानंतर समाधानाने रूमवर परत आलो तेव्हा आमचे पॅकिंग राहिल्याने ईतर मित्रांच्या, रूमपार्टनरच्या तितक्याच शिव्याही खाल्लेल्या Happy

असो, पण एक्झाम झाल्यावर निवांत कॉलेज बघायची मजा वेगळीच असते हे खरे..

वावे! अगदी कॉलेज आठवले. स्फुट छान झाले आहे.
मी काही हॉस्टेलवर राहिले नाही, तरीपण, उद्या पासून सुट्टी आणि मित्र मैत्रिणी भेटणार नाहीत काही दिवस याची हुरहुर वाटायची सुरवातीला (तेंव्हा मोबाईल नव्हते) ! अर्थात, सुट्टीची मजा पण खुणावत असायचीच.
सुट्टीत कॉलेजला जाऊन मी काही वेळा पाहिले आहे, सुट्टीत कॉलेज कसे दिसते ते Happy

निकु Happy
निवांत कॉलेज बघायची मजा वेगळीच असते>> येस.
हॅरी - हर्मायनी- रॉन एका ख्रिसमसला हॉगवर्ट्समध्येच राहतात >> मी हे बघितलेलं नाही, पण हेच म्हणायचंय.

तू _ हॅ _ री _पॉ ट _ र _वा_च _ ले _ लं _ना _ ही _ स ??? का? का?? का???
ताबडतोब आधी वाच!
हे अगदी असंच अनुभवलेलं आहे. शांत निवांतपणा.. घरी जायचं आहे तरी तिकडून अजिबात पाय निघत नाहीये. उगाच गप्पा मारत बसून जरा आणखी वेळ दवडू वाटतं.
आता भरत नी सॉर्सरर्स स्टोनचा प्रसंग काढल्यावर अगदी तेच वाटतंय. Happy

मी काही हॉस्टेलवर राहिले नाही त्यामुळे हे रीलेट नाही झालं. शिवाय सुट्टी वगैरे असली तरीही रमाबाईचा कट्टा कधीही गाठता यायचा. त्यामुळे सुट्ट्यांमधेही ग्रूपातल्या टाळक्यांना भेटता यायचं. कोणी ना कोणी पडीक असायचंच.

ती कुठेतरी दिसेल ही अपेक्षा. तिची एक झलक दिसावी म्हणून >>> हे वाचून एकदम "उसकी एक झलक मिल जाए, इतनी है फरियाद" आठवलं Happy

सुट्टीत कॉलेजला जाऊन मी काही वेळा पाहिले आहे, सुट्टीत कॉलेज कसे दिसते ते Happy
>>>>>

काही वेळा Happy
विजेटीआयला असताना दर सुट्टीत आम्ही कॉलेजजवळ राहणारी पोरं नेहमी कॉलेजलाच पडीक असायचो. आमच्यापैकी कोणाचे आईबाप काही आम्हाला सुट्ट्यांमध्ये युरोप टूरला नेणारे नसल्याने सुट्ट्यांमध्ये काय करावे हा तसेही प्रश्न असायचा. त्यामुळे टाईमपासला कॉलेजच सोयीचे पडायचे.

काही हॉस्टेलाईटस मित्र किंबहुना ओळखीची पोरं असायची जी सुट्ट्यांमध्येही हॉस्टेललाच थांबलेली असायची. त्यामुळे कुठेही रात्री राहायची सोय व्हायची.

दिवसा कॉलेजच्या हॉस्टेलसमोरील मैदानावर क्रिकेट खेळा, रात्री लेट नाईट प्लान बनवा, कधी पिक्चरला जा तर कधी गप्पा मारतच फाईव्ह गार्डनला पडीक राहा... मग गाडीवर कुठेतरी चायनीज, भुर्जीपाव, भाजीपाव वगैरे हादडून हॉस्टेलवर झोपायला जा.. तिथे पत्ते कुटत कुटत कधीतरी झोपी जा. सकाळी उठून आंघोळीला म्हणून घरी जा.. उरलेली झोप घरी पुर्ण करून पुन्हा दिवस मावळायच्या आधी कॉलेजला क्रिकेट खेळायला हजर Happy

  • सुंदर लिहिलेय वावे

मला हॉस्टेल ला न राहिलेल्या लोकांबद्धल थोडेसे वाईटच वाटते... त्यांनी काय मिस केले आहे ते कधीच समजणे शक्य नाही...

धन्यवाद Happy
अमित,नाही खरं वाचावंसं वाटलेलं अजून हॅरी पॉटर. सिनेमे बघितलेत दोन. वाचून बघायला हवं. आवडेलही एखादवेळेस.

वावे, एकदम रिलेट झाले.
हॉस्टेल जवळपास रिकामं फक्त काहीजण आणि त्यात आपल्या जवळचे मित्र असणं, सकाळी लौकर उठण्याची घाई नसणे.... रात्र उलटून गेली तरी कळत नाही.