दिवाळी

ठेवणीतील ऐवज.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 November, 2015 - 02:10

दिवाळी म्हणजे झगमगाट, चमचमाट. प्रत्येक घरात नवीन रंग, आकाशकंदील, लाइटची तोरणे ह्या बाह्य रोषणाई सोबत अंतर्गत सजावटीतही चमक आलेली असते. त्यात जास्त मेहनत केली जाते ती म्हणजे गृहीणीच्या लाडक्या स्वयंपाकघरावर. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकघरात भिंतीलाच फळी ठोकलेली असायची व फळीवर तांब्या-पितळेची भांडी हौशेने रचलेली असायची.ह्या तांब्या पितळेच्या भांड्यांवरून त्या घरच्या गरीबी वा श्रीमंतीचा दर्जा ठरला जायचा.

पण आता बदल हा काळाचा नियम असल्याने चिंच लावून तांब्या-पितळेची भांडी घासणे हे वेळखाऊ काम असल्याने तांब्या-पितळेची भांडी ९०% घरातील किचनमधून रिटायर्ड झाली आहेत.

शब्दखुणा: 

तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता?

Submitted by वारी on 11 November, 2015 - 10:05

नमस्कार,
दिवाळीच्या शुभेच्छा.
सध्या मी कामानिमित्त अमेरिकेत आलो आहे. दरवर्षी घरी आईवडीलांबरोबर लक्ष्मीपूजन केल्याने सगळ्या गोष्टी आणून देण्याशिवाय पुजा मांडण्यात फार कधी लक्ष घातले नाही. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता ते सांगाल का किंवा फोटो टाकाल का?

ऑनलाईन दिवाळी अंक २०१५

Submitted by नंदिनी on 4 November, 2015 - 13:22

आली आली दिवाळी जवळ आली!! दिवाळी अंकांच्या जाहिराती पण आल्यातच, काही अंक बाजारात येऊन दाखलसुद्धा झालेत.

इथे वेगवेग्ळ्या दिवाळी अंकांची आणि त्यामधल्या साहित्यची चर्चा करता येईल.

काही ऑनलाईन दिवाळी अंक :

http://reshakshare.blogspot.in/
http://digitalkatta.com/
http://aisiakshare.com/diwali15

शुभेच्छा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोली च्या सर्व वाचकांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची, सुखसमाधानाची, भरभराटीची व दीर्घायुरारोग्य देणारी जावो.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

टीलाईट डेकोरेशन

Submitted by प्रीति on 5 November, 2013 - 11:43

ह्यावेळी टीलाईट स्पार्कल ग्लुने डेकोरेट केले.

tealight 005.jpg

रात्रभर सुकवायला ठेवले आणि असे दिसत आहेत.
हे दिवाळीचं केलेलं कार्ड

tealight 004.jpg

पेटवल्यावर Happy

विषय: 
शब्दखुणा: 

पणत्या

Submitted by तृप्ती आवटी on 31 October, 2013 - 19:50

तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!

गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-

photo(1).JPGpaNatyaa.jpg

पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

नमस्कार मंडळी !

झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.

मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.

आली दिवाळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 October, 2013 - 05:00

माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे. चोपायचा कार्यक्रम दोन-तीन दिवस तरी चालायचा.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दिवाळी