मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
समाज
वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम
करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
कोरोनाविरुद्ध बढाई नव्हे लढाई!
लॉकडाऊनमध्ये घरात नक्की काय घडू शकतं? - भाग २ - समुपदेशन
लॉकडाऊन, समुपदेशक काय म्हणतात - भाग १
लढाई कोरोनानंतरची (आर्थिक मंदी आणि बेरोजगारीशी)
एकवीस दिवसांचे लाॅकडाऊन. ते संपले किंवा थोडे अजून काही दिवस वाढले,तरी ही कोरोनाविरोधी लढाई आपण नक्की जिंकू. पण गेले दोनतीन दिवस टीव्हीवरती जरा वेगळी चर्चा कानावर पडते आहे. बहुतेक तज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. 2009 मध्ये इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात मंदीचा तितका प्रभाव पडला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती बिकट आहे. कोरोनानंतर आपल्याला यादेखील लढाईला सामोरे जावे लागेल. अशावेळी प्रत्येक पातळीवर, घरीदारी या मंदीवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो. आपल्या जीवनावर काय परिणाम होतील आणि आपल्याला काय बदल करावे लागतील.
एक व्हायरस साला आदमी को..
ये व्हायरस साला आदमी को.
...बहुत कुछ सिखाया
मर्यादा-
श्रध्देच्या,
विज्ञानाच्या,
स्वयंघोषित तज्ञांच्या
अवघडपणा-
जुन्या सवयी सोडण्यातला,
पंख बांधून उडण्यातला,
जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला,
शांततेची गाज ऐकण्यातला,
अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला,
हतबलांच्या तांड्यातील एक असूनही..
विझत्या आशेवर जगत राहाण्यातला
न जाने ये व्हायरस साला आदमी को...
और क्या क्या सिखायेगा
संतोस
खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने ! ए मामा , चल दे दे फटाकसे ! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही.
रखमा...
' साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती.
प्रश्न
दोन दिवस झाले एक प्रश्न सतत डोक्यात भुंग्या सारखा भुणभुणतोय.. मित्राकडून चेतन भगत ह्यांचे हाफ गर्लफ्रेंड (मराठीत) पुस्तक मागून घेतले.
वाचताना एका क्षणी नायकाला पडलेला प्रश्न मलाही पडला आहे.
प्रश्न असा आहे की स्वतःला वाटेल तेव्हा शारीरिक स्नेह मागून घ्यायचा अधिकार आपल्याला आहे पण तो पुरुषाला नाही असे स्त्रियांना वाटते की काय..??
खरच असे आहे का..??
Pages
