------------------- अन्यत्र पूर्वप्रकाशित---------------------
मला जर २० वर्षापूर्वीच्या "मला" काही सल्ला द्यायचा झाला तर नक्कीच ४ शहाणपणाच्या गोष्टी सुचवता येतील. पण मग तोच धागा पुढे ओढून, "२० वर्षापुढील मी" माझ्या आत्ताच्या स्वतःला नक्कीच मोलाचे काही सांगू शकेन. शकेन का? कशी असेन मी २० वषांनंतर? खरं तर कल्पना करण्याचाही धीर होत नाहीये. पण असे नक्कीच वाटते की तिने (भविष्यातील मी) स्वप्नात येऊन काही मार्गदर्शन करावे. ही प्युअर कविकल्पनाच आहे. पैकी सुख = नातवंडात रममाण होणे अन दु:ख = एकटे निरुद्देश्य रस्तोरस्ती भटकणे या माझ्या सुख-दु:खाच्या सरळसोट अन माझ्या तोकड्या बुद्धीला जाणवणार्या कल्पना यात आलेल्या आहेत. ज्या अगदीच बाळबोध अन ब्लॅक & व्हाइट असू शकतात. अनेक बुद्धीमान लोकांच्या काही वेगळ्या कल्पना असतीलही.
कविता विशेष जमलेली नाही पण लिहीताना डोळ्यात पाणी आले होते. खरच स्वप्नसंकेत मिळावा असे कधीकधी वाटते.
__________________________
इकना हुकमी बखसीस इकि हुकमी सदा भवाईअहि
Some, by His Command, are blessed and forgiven; others, by His Command, wander forever.
कशी आहेस तू, कशी दिसतेस,
बेघर, आजारी,
गुन्हेगारी भावनेने खंगलेली,
अपयशाने खचलेली
रस्त्यावरुन निरुद्देश्य भटकणारी,
अनुभवाने शहाणपण आलेली,
की अनुभवाने शहाणी झालेली,
कडवट, विदीर्णशी,
आतल्या आत रडणारी?
कशी आहेस तू, कशी आहेस,
मनस्वी, धीराची,
शांत जलाशयासारखी
तटस्थ, नितळ समाधानी,
आत्ममग्न ,भरुन पावलेली?
लेकुरवाळी,
खेळवतेस तुझ्या नातवंडांना?
भरवतेस मेतकूट-भात त्यांना?
कशी आहेस, कशी आहेस?
एखाद्या गूढ स्वप्नी येशील का?,
मला जवळ घेशील का?
केसांतून हात फिरवत, सांग एवढच
कोणता रस्ता घेतला होतास,
सर्पांचा अन जंगलाचा
की
खर्या हिरवळीचा?
अपयशाने खचून गेलीस,
की त्यांच्यावर मात केलीस?
खोल डोळ्यांनी भटकत राहीलीस?
की सावरुन घेतलस घरकुल?
एकटी संघर्ष करत राहीलीस?
की बनलीस कणा कुटुंबाचा
कशी आहेस तू, कशी दिसतेस,
तुझी सुखंदु:ख काय?
एखाद्या गूढ स्वप्नी येशील का?,
मला जवळ घेशील का?
केसांतून हात फिरवत, सांग एवढच
कोणता रस्ता घेतला होतास,
सर्पांचा अन जंगलाचा
की
खर्या हिरवळीचा?
इकना हुकमी बखसीस इकि हुकमी
इकना हुकमी बखसीस इकि हुकमी सदा भवाईअहि .... /\
लेखन उत्कट झाले आहे. तुझा प्रोफाईल फोटोही गोड आला.
छान!
छान!
खूपच मनापासून वाटली, छान
खूपच मनापासून वाटली, छान लिहिलीय
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
छान..
छान..
लड़कपन खेल में खोया ,
लड़कपन खेल में खोया ,
जवानी नींद में सोया ,
बुढ़ापा देखकर रोया ,
यही रिश्ता पुराना है ।
आई ग्ग, काय लिहिलेस गं सामो.
आई ग्ग, काय लिहिलेस गं सामो.
एखाद्या गूढ स्वप्नी येशील का?,
मला जवळ घेशील का?
केसांतून हात फिरवत, सांग एवढच
कोणता रस्ता घेतला होतास, >> पाणी वाहायला लागले डोळ्यांतून.