मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
समाज
इरा, काश्मीरी पंडित
माननीय ॲडमीन, इराची कहाणी तिच्याच शब्दात, हिंदीत मांडली आहे. हिंदी आपल्या नियमात बसत नसेल तर ही कथा काढून टाकावी. धन्यवाद.
इरा, काश्मिरी पंडित. द काश्मीर फाईल्स या इंग्रजी शीर्षक असलेल्या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने इराची कहाणी तिच्याच शब्दात:
" हां इरा, अब आप सुना दो जो कहानी आप कहने जा रही है।"
हरवलेले गवसेल काय? 2
सर्व प्रतिसादीत वाचकांचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय.
बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता.
हरवलेले गवसेल काय?
साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे. जर जादा कापूस लागणार असेल तर त्याचे पैसे व कापडाचे पैसे आगाऊ घ्यायचे . मग २-३ दिवसात तयार गाद्या घरी डिलिव्हरी देऊन जातात.
द टिंडर स्विन्डलर' - एका इस्रायली भामट्याची कहाणी.
द टिंडर स्विन्डलर' - एका इस्रायली भामट्याची कहाणी.
पाळीव प्राण्यांसंबंधीची - प्रश्नोत्तरे, शंका निरसन, सल्ले इ.
पाळीव प्राण्यांसबंधी पडणारे प्रश्न विचारण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी, हा धागा काढत आहे.
पसंद अपनी अपनी
भारत देश हा विविधतेतून बनला आहे. प्रत्येक प्रांताची, धर्माची , भाषेची आपली एक खासियत आहे.
मा़झ्या बाजूच्या डेस्कवरची माझी एक साऊथ इंडीयन कुलीग आहे. तिला रस्सम आवडते. ती रस्सम पाऊडर आणून ऑफीसमधे रस्सम बनवते. त्याचा फायदा म्हणजे मला हमखास रस्सम मिळते. पण ती माझी आमटी भातची डिश खात नाही. तोंड वाकडं करते. मी तिला म्हणालो की रस्सम तुमच्यासाठी खूप ग्रेट आहे आणि मलाही तुझ्या या आवडीबद्दल फुल्ल रिस्पेक्ट आहे तरी आमची आमसुलाची आमटी आणि नारळभात आम्हाला प्रिय आहे.
तीन बेटांची कहाणी (रेफ्युजी मालिकेतला पुढचा लेख)
सरकार
"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू."
सरकारांचा मेसेज.
आता तुम्ही म्हणाल की बरं मग?
तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने
हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग
काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित
करण्याची त्यांची पद्धत आहे.
आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही. अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील. किंवा करू करू म्हणता येईल.
टीम बिल्डींग अॅक्टीव्हीटीज ची खरच गरज असते का?
अनेक कंपन्यांमधे HR तर्फे आणि कधी टीम लीडर किंवा मॅनेजर कडून वेगवेगळ्या टीम बिल्डींग अॅक्टीव्हीटीज organize केल्या जातात. करोना पूर्व काळात ह्या अश्या अॅक्टीव्हीटीज साठी अनेक पर्याय उपलब्ध होते. कुठे तरी सहलीला जाणे/ एकत्र जेवायला जाणे इथपासून ते सगळ्यांनी मिळून काहीतरी हॉबी वर्कशॉप करणे इथपर्यंत मोठी रेंज होती पर्यायांची. पण वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून या अॅक्टीव्हीटीज वर बर्यापैकी मर्यादा आल्या आहेत. तरीही त्यातही HR किंवा टीम लीडर किंवा टीम लीडर बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे होतकरू लोक सतत नविन नविन टीम बिल्डींग अॅक्टीव्हीटीज organize करत रहातात.
Pages
