ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.
********************************************************************************************
"स्वत:चे ठेवायचं झाकून अन दुसर्याच बघायचं वाकून"ही म्हण आपल्याला माहित आहे. यात आपल्या त्रुटी/चुका/विसंगती झाकून ठेवायच्या व दुसर्याच्या चुका/ त्रुटी/विसंगती याबद्दलच फक्त बोलायच असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.
महोदय,
तुमच्या निबंधलेखन स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून 'रस्ते अपघात' या विषयावरील एक निबंध सोबत पाठवत आहे. तो तुम्ही स्पर्धेसाठी विचारात घ्यावा, ही विनंती.
कोविड महामारीपासून, घरून कामाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ती काळाची गरज होती. पण आता परिस्थिती नसताना त्याच गोष्टीला चिकटून राहण्यात काय शहाणपण आहे? काही प्रमाणात प्रवासातील अडथळे आणि प्रवासाचा वेळ दूर होतो, कर्मचाऱ्यांची ऊर्जा वाचते. पण तुमचा प्रवासाचा त्रास वाचला म्हणून ऑफिसमधून काम करण्याचे इतर मौल्यवान फायद्यांचा त्याग करणे योग्य आहे का?
मला नेहमीच पंजाबी लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आवडतो. कधीच नशिबावर . हवाला ठेवून न जगणारे, भिक न मागता, कष्टावर अतोनात विश्वास ठेवणारे, धर्मातील सेवेसारख्या व्रताचा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अंगीकार करणारे आणि कोणत्याही कसोटीच्या क्षणी मनासारख्या न होणाऱ्या गोष्टीला ‘ओ! कोई गल नहीं’ असं म्हणत काळजीचीच विकेट घेणारे; खाण्यापिण्यात, आदरतिथ्यात आणि वागण्यात कमालीचा मोकळेपणा राखणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्यांक (अगदी २-३%)असूनही कधीही कुठल्या आरक्षणाची मागणी न करता स्वतःच स्थान नोकरी,व्यवसाय ते देशाचं संरक्षण करण्यापर्यंतच्या क्षेत्रात निर्माण करणारे असे ते पंजाबी!
ही झोपमोड अटळ होती. कारण टाळ-मृदंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज-रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला - पहाटे ४ च्या आसपास. आमच्या गॅलरी मधून सोलापूर हाय-वे साफ दिसतो. इंद्रायणी काठी स्नान करून दिंड्या-पताका याचा दिशेने येत होत्या. नंतर उजाडले तेव्हाच जाग आली. तोच सौ. चा आवाज “अहो आवरा लवकर, ती लोकं यायची वेळ झालीये.” अर्धा-पाऊण तासांत जिकडं-तिकडं करून खाली पार्किंग मध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेष च तो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही.
रणवीरसिंगने दीपिका पदुकोणचा पेटीकोट घातला. व्वा! व्वाव्वा!! व्हॉट अ फेमिनिस्ट गाय! क्यूडोस!! मिंत्राने आपल्या जाहिरातीत पुरुषाला साडी नेसवले. ओ हो! सो क्यूट! किती छान कल्पना! स्त्रीवादी कल्पनेला सलाम!


दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.