लेखन स्पर्धा-१ - स्त्री असणं म्हणजे .. माणूस असणं - सामो

Submitted by सामो on 19 September, 2023 - 05:43

'स्त्री हे काय रसायन आहे' याचा भल्याभल्यांना अगदी देवांनाही थांग लागलेला नाही असे म्हणतात. तेव्हा हा तर भलताच अवघड विषय आहे. अश्या अवघड, आव्हानात्मक विषयांनी कवि, साँग रायटर, लेखक यांना भुरळ घातली नाही तरच नवल. मी प्रयत्न तर करुच शकते आणि कॅलिडोस्कोपमधील एखाद-दुसरं रुप दाखविण्याचा प्रयत्नही करते. आता आमचा किप मुरच घ्याना. हा माझा सर्वात आवडता कंट्री सिंगर. केनी रॉजर्स, जॉनी कॅश, जॉर्ज जोनस हे झाले जुन्या पीढीतील गायक, नवीन पिढीतले - ल्युक ब्रायन, स्कॉट मकरीरी, ब्रॅड पास्लेय, आणि कित्येक जण आहेत. पण नव्या पिढीत, किप मुर माझा सर्वात आवडता. त्याचा आवाज सिम्प्ली ऑस्सम!!! त्याचे 'समथिग अबाऊट अ ट्रक' घ्या. दिवसची सुरुवात या एव्हरग्रीन गाण्याने झाली की दिवस मस्त जातो. एक फ्रेश स्मितहास्य चेहर्‍यावर आणि दुर्दम्य आशावाद मनात जागवतं हे गाणं. 'बॅकसीट' सारखं त्याच्या आवाजाइतकच सिडक्टिव्ह चित्रीकरण असलेलं गाणं घ्या किंवा 'डर्ट रोड' सारखं प्रामाणिक परखड सत्य सांगणारं गाणं - "जर स्वर्गात आमच्या गावासारख्या धूळमाखल्या वाट नसतील, तर मला स्वर्गही नको. अरे ठेवलय काय असल्या स्वर्गात!" पण आज एका वेगळ्या गाण्याबद्दल बोलू यात. हे गाणं ऐकून मी किपचा आदर करु लागले. म्हणजे एक कलाकार म्हणुन फॅनच होते त्याच्या आवाजाची, संगीताची, चित्रीकरणाचीही. पण या गाण्याने - https://www.youtube.com/watch?v=o7H-bSlLoqI - More Girls Like You , त्याच्यातला हळवेपणा कुठेतरी मला जाणवुन दिला हे गाणे आहे - एका आर्क्टाईपचे. आर्क्टाईपला मराठीत काय म्हणू आपण, एक साचा ज्या साच्यात वर्षानुवर्षे, कित्येक पुरुष फिट बसत आलेत. मुक्त, बेफाम, बेलगाम जीवन जगणारे , कोणतेही बंधन घालून न घेणारे, एका जागी न थांबणारे पुरुष. अनडॉमिस्टिकेटेड.
.
Well, I've been livin' like a wild old mustang
Out in Montana fields
Might've earned me a bad reputation
But never stopped these wheels
From goin' and rollin' too far
Runnin' and gunnin' a little too hard
So unreigned, so untamed, yeah

.
किप म्हणतो - अशा फास्ट लेनमध्ये जगणार्‍या , बेपर्वा, निष्काळजी, हरफन मौला अश्या मला एकदा तू भेटलीस, आणि माझ्याही नकळत मी प्रेमात चक्क कोसळलो. मी पहील्यांदा तुझ्या डोळ्यात आणि नंतर प्रेमात कधी कसा गुंतत गेलो मलाही कळले नाही. वारा नेइल तिथे मस्तीत जाणार्‍या माझ्या तारुचा तू नांगर झालीस. माझ्यातील ऊर्जेला एक चॅनल मिळाला. तू आलीस ते माझ्या जीवनाला सकारात्मक वळण देण्यासाठीच जणू. काय करु मी तुझ्याकरता, आकाशातली शुक्राची चांदणी आणून तुझ्या अंगठीत जडवु की चंद्र-तारे तोडून आणू. मला तुझ्याकरता काय करु आणि काय नको असे होते. तुझ्यासारखं सुंदर, निष्कलंक मन असणारं कोणी मी पाहीलच नाही. एवढच काय मी कधी एका जागी स्थिर स्थावर होइन अशी मी कल्पनाही केलेली नव्हती पण काय आश्चर्य तू मला भेटलीस आणि जादू झाली - मला घर बांधून तुझ्याबरोबर जीवन व्यतित करावेसे वाटू लागले. मी सहजीवनाची स्वप्ने पाहू लागलो खरा. म्हणजे मी इतका माणसाळलो की मला तुझ्यासारखीच, तुझी सावली अगदी असेल अशी मुलगी हवी असे वाटायला लागले - हे श्रेय तुझेच. तूच आहेस माझी प्रेरणा.
.
Yeah, God made girls like you make guys like me
Wanna reach for the brightest star, set it on a ring
Put it on your hand, grab a piece of land
And raise a few
Yeah, more girls like you

.
मला वाटते , गाण्यात गुंफलेले, हे जंतरमंतर हा निसर्गाने, उत्क्रांतीमध्ये स्त्रीला दिलेला गुण आहे. निसर्गाने, पुरुषाला, नराला, अपत्य पालन-पोषणाच्या, जबाबदारीतून मुक्त ठेवलेले आहे. स्त्रीकडे हे काम सोपवलेले आहे. पण हीच जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याकरता निसर्गाने स्त्रीस आकर्षक, भुरळ घालणारे बनविले आहे. कोमलता, मार्दव, वात्सल्य दिलेले आहे. अंहं फक्त शारीरीक नव्हे तर मानसिक प्रतलावरती आकर्षुन घेण्याचे, समोरच्याच्या हृदयात सद्गुण जागृत करण्याचे असे असीम अध्यात्मिक सौंदर्य, शक्ती स्त्रीकडे सोपविलेली आहे. घरात मायेचा ओलावा ठेवण्याचे, अपत्यास , डोळ्यात तेल घालून आणि प्रेमाने वाढविण्याची, कुटुंब सुरक्षित भरभक्कम ठेवण्याची नैसर्गिक उर्मी आणि उर्जा बहाल केलेली आहे.
.
पण थांबा हं जिथे प्रकाश असतो तिथे सावली ही असतेच. स्त्री ही आधी एक माणूस आहे मग ती आहे मैत्रिण, प्रेयसी, आई, बहीण, यंव न त्यंव. आता स्त्रीरुपाची छाया दाखविणारं १९५९ चं गाणच घेउ यात ना - हे गाणं आहे कॉनी फ्रान्सिसचं. यात कॉनी म्हणते - आपण बेसबॉल मॅच पहाताना, तू सोडा आणायला म्हणुन बाहेर गेलास. तुला खूप वेळ झाला. मी वाट पहात होते. तू आलास खरा; तुझ्या लक्षातही आलं नाही पण तुझ्या शर्टच्या कॉलरवरती होत्या लिप्स्टीकच्या खूणा, ज्या माझ्या चाणाक्ष नजरेने त्या हेरल्या. गेस व्हॉट मी तर बेबी पिंक लिप्स्टीक लावते आणि या होत्या गर्द लाल. मेरी जेनच्या लिप्स्टिकच्या. म्हणजे काय तर गाण्यातल्या नायिकेचा प्रियकर टु टायमिंग करत होता व त्याला फूस होती कॉनीच्याच मैत्रिणीची - मेरी जेनची –
https://www.youtube.com/watch?v=YMlALAaEwfA
.
You said it belonged to me, made me stop and think
And then I noticed yours was red, mine was baby pink
Who walked in but Mary Jane, lipstick all a mess
Were you smoochin' my best friend? Guess the answer's yes

आहे की नाही बळी तो कान पिळी - जंगल कायदा. तर हेसुद्धा आहे एक स्त्रीचे रुप.
.
अजुन एक असेच गाणे आहे - टेनेसी वॉल्ट्झ. हे तर फारच सुश्राव्यआणि शोकाकुल करणारे गाणे आहे. अनेक गायिकांना या गाण्याने भुरळ न घातली तरच नवल. यात नायिका म्हणते कशी विसरु मी आमचा बॉल डान्स - टेनेसी वॉल्ट्झ. या नाचाच्या वेळेस तर मी माझा प्रियकर हरवला. आणि अशी दुधारी तलवार निघाली की - माझ्या प्रिय मैत्रिणीनेच माझ्या प्रियकराला माझ्यापासून तोडला. मीच वेडी ठरले - तिची गाठ माझ्या प्रियकराशी घालून दिली. ते दोघे नाचत होते आणि त्याच वेळी तिने माझा प्रियकर माझ्यापासून तोडला. कशी विसरु मी हे! हे पॅटी पेज ने गायलेले गाणे - https://www.youtube.com/watch?v=QcMrymNmO7s
.
I was dancing with my darling to the Tennessee Waltz
When an old friend I happened to see
I introduced her to my loved one
And while they were dancing
My friend stole my sweetheart from me

.
आता तुम्हीच सांगा स्त्रीचं कोणतं रुप खरं? आपल्या प्रियकराला योग्य त्या मार्गावरती आणणारं, एक सुखी संसाराचं स्वप्न साकारणारं की दोन प्रेमिकांच्या प्रेमात विघ्नं आणणारं? तेव्हा या आलम दुनियेत, काळं - पांढरं असं कोणतच सत्य नाही. आहे तो करडा रंग. आहे तो प्रत्येक माणसाचा पर्याय. आपल्याला प्रगतीपथावर कूच करायचय की दुसर्‍याला आणि सरतेशेवटी त्यातूनच मिळणार्‍या स्वतःच्याही दु:खाला सामोरे जायचे आहे - हे प्रत्येकाने आपले आपण ठरवायचे. बहुसंख्य स्त्रिया या स्पेक्ट्रममध्ये कुठेतरी मध्यात येतात. ना एंजल्स ना व्हॅम्प्स.

मगाशीच सांगीतल्याप्रमाणे - तेव्हा स्त्री ही आधी एक माणूस आहे मग ती आहे मैत्रिण, प्रेयसी, आई, बहीण, लेक, मामी, काकू, आत्या, पणजी, आजी. तिला मखरातही बसवु नका, तिला पायदळीसुद्धा तुडवु नका. तिला हाडामासाची गुणावगुण असलेली माणूस म्हणुन प्रतिष्ठा द्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
गुणावगुण असलेली माणूस म्हणुन प्रतिष्ठा द्या
>>>> +१

तिला मखरातही बसवु नका, तिला पायदळीसुद्धा तुडवु नका...
+७८६

छान लिहिले आहे सामो..
विषय आला कधी आणि तुम्ही लिहिले कधी.. इथेही लेडीज फर्स्ट Happy

अरे रागवायचे काय Happy विनोदी आहे.
------
अनिंद्य 'कॉनी फ्रान्सिस'ची गाणी आवडली असतील तर तिचं ' स्टुपिड क्युपिड' ऐका. उडतं आहे. कीप मूर तर सर्वच गाणी छान.

प्रतिसादाकरता धन्यवाद.

पर्फेक्ट . स्त्री हि माणूस आहे. आणि हेच सत्य आहे. तिला अजून कोणतेच लेबल लावू नका.
वुमन्स डे ला मी ऑफिस च्या newsletter मध्ये पाठवलेला मेसेज
womens-day.png