समाज

मित्राचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा.....

Submitted by आदीसिद्धी on 28 March, 2018 - 06:57

2016  साली या दिवसात आमची दहावीची परीक्षा सुरू होती. आयसीटीचा पेपर संपला होता. शेवटचा फक्त एकच पेपर राहीला होता. आणि मग परीक्षा संपून आम्ही उनाडक्या करायला मोकळे होणार होतो. पण सगळच आपल्या मनासारख होईल तर नशीब हा फॅक्टर आपल्या आयुष्यात नसला असता. त्या दिवशीही आम्ही पेपर सुटल्यावर चर्चा करत शाळेबाहेर पडलो. माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यचा मित्र माझ्याच शाळेत होता.तो इंग्लिश मिडीयमला होता आणि मी सेमी इंग्लीशला. त्यामुळे सहसा आमची भेट होत नसे. पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे झालेल्या पेपरवर चर्चा करत बर्याचदा आम्ही भेटत होतो.त्या दिवशीही असेच पंधरा वीस मिनीटं गप्पा मारत उभे होतो.

शब्दखुणा: 

येड

Submitted by Pradipbhau on 24 March, 2018 - 03:33

येड
गण्याला त्याच्या गावचा लई अभिमान. गावाबद्दल कुणी काय येड वाकड बोलल की गण्याची सटकायची. लहान हुत तवापासन त्याला गावचं नाव घ्यायला लई आवडायचं. त्याच कारण म्हंजी दोन अक्षरी नाव अन उच्चार करायला बी लई सोपं. त्याला कुणी इचारल काय गण्या कुठल्या गावचा? गण्या लगीच म्हणायच, येड्याचा. समधी माणस त्याच्या उत्तरानं हसायची पण गण्याला त्याची काय बी फिकीर न्हवती.

विषय: 

अमानुष

Submitted by विद्या भुतकर on 12 March, 2018 - 21:12

कधी आपण मोठे होतो आणि कधी हे असे मनातले विचार ओठांवर न येता मनातल्या मनात मरून जातात हे कळत नाही, होय ना ? आणि कित्येक वेळा हे असे विचार किती काळे असतात याला काहीच मर्यादा नसते रे ! कधी असतात ते हावरे. म्हणजे सख्खे सोबत वाढलेले भाऊ संपत्तीसाठी दुसऱ्याच्या खुनाचा विचार करतात, तर काही बहिणीला घरातून घालवून देण्याचा, आई वडिलांना घरी न ठेवून घेण्याचा.

विषय: 

स्त्री

Submitted by पल्लवीजी on 10 March, 2018 - 03:13

स्त्री

जगास वाटते, स्री असावी सुंदरी
मोहक तरूणी, अप्सरा स्वर्गाची
मंजुळ मितभाषी, गोड स्वभावाची
तिच्या स्पर्षाने तृप्ती व्याकुळ मनाची !

जगास वाटते, स्री असावी शालिनी
माता-कन्या-भगिनी, मायेची संजीवनी
नम्र आज्ञाधारी, सेवाभावी पत्नी
तिच्या संयमाने शांती बेघर मनाची !

जगास खचित वाटते, स्री असावी पराक्रमी !
कुशाग्र बुद्धीची तेजस्वी सौदामिनी
उदात्त विचारांची सुसंस्कृती निर्माती
तिच्या ज्ञान, नेतृत्वाने प्रगती जगाची !

डरना जरूरी है .....

Submitted by यशू वर्तोस्की on 9 March, 2018 - 00:36

एकीकडे आपण प्रगती करतोय पुढारतोय पण दुसरीकडे माणसांमधे जनावरपण वाढतंय. हे असे विषय आहेत की यावर उघडपणे बोलायला माणसं कचरतात. वर्तमानपत्रात बातमी म्हणून मोजक्या शब्दात माहीती दिली की झालं . नंतर पेज ३ वर चर्चा करायला आपण मोकळे.
आपली मुलं आता वयात येत आहेत काही तारूण्यसुलभ भावना त्यांच्या मनात जागृत होत असतील. आपणही तरूण वयात सगळ्या गोष्टी केल्येत . याच अनैसर्गिक असं काही नाही . पण बदलली आहे ती सामाजिक परिस्थिती .

विषय: 

सहिष्णू सुखासिनता, गांधीवाद, सावरकरवाद आणि गांधीद्वेष

Submitted by अननस on 8 March, 2018 - 12:35

गांधीवाद आणि सावरकरवाद ही भारतातल्या समाजात अनेक दशके चालत आलेली विभागणी आहे. याच्यावर अनेक इतिहासकार, विचारवंत, राजकिय आणि सामाजिक विश्लेषक यांनी अनेक प्रकारे अभ्यास करून आपली मते मांडली आहेत. अस असले तरीही, या दोन मधला फरक आणि समाजामध्ये गांधीवादी विचारांचा प्रभाव असलेला गट आणि सावरकरवादी विचारांचा प्रभाव असलेला गट असे विभाग आणि त्यामध्ये असलेला वैचारिक किंवा तात्विक विरोध हा कायम राहिला आहे आणि माझ्यामते तो तसा यापुढे ही राहणार आहे.

विषय: 

सामाजिक उपक्रम -२०१८

Submitted by प्राची. on 7 March, 2018 - 22:56

सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.

बहुकोणी व्यक्तिमत्व

Submitted by kokatay on 3 March, 2018 - 13:36

मला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज