इरॉटिका आणि पॉर्न यांच्यात फरक काय असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फार कठीण आहे असे नाही. पॉर्न (अश्लील) साहित्य, गाणी, प्रतिमा किंवा चित्रपट म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक जवळीकीचा संपूर्ण देखावा. स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचे मादी आणि नरात झालेल्या संभोगाचे हीन रूपांतर, ज्यात आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, भावना किंवा अगदी खोलवर वाटणारी काळजी याचा संपूर्ण अभाव असून केवळ प्राणीजन्य मैथुनाचा तो एक भाग होऊन जातो. यात भाग घेणारे सर्व स्त्री पुरूष एका विवक्षित क्षणी अपमानित केले जातात, खास करून स्त्री पात्राला तर अगदी नेहमी तसे केले जाते.
गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमामध्ये सातत्याने घेतले जात होते, आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदार पूनावाला यांचे.
‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’...
"लोक"down
मंत्री संत्री बिजनेसवाले कुणाला फरक नाय
पण जे "लोक"झाले त्यांनी करायचं काय...
कुणी कुणी चमचमीत अन्न रोज पोटभर खाय
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...
पडली बंद रोजनदारी नाही हाताला काम
मरण यातना उपवासाने कधी मिळेल हो दाम
पोट आहे हातावर ज्यांचे त्यांचा सवाल हाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...
हायवेवरती गर्दी कसली मजुरांची ही लाट
शहर आता ते पडले मागे धरली गावाची वाट
कधी आपल्या घरी पोहचू चालून थकले पाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...
शब्द दाराजवळी येऊनि वाट विसरले काही ।
हरवलेल्या शब्दांचा तो गाव दूरच राही ।
गावामध्ये सगळे होते सोडूनि शब्द काही ।
त्या गावाची खासियत त्या गावाच्या लोकांमध्येच येई ।
सुख दुःख होते सोबती शेजारीच घर त्यांचे ।
मध्ये येऊनि वसली नियती दोघांवर हुकूम जिचे ।
जय पराजय एकामागे एक वसले होते ।
गर्वाचे घर आडवे येता घर पराजयाचे भासे मोठे ।
आपले सगळे सोबती आनंदाने नांदती ।
अहंकार शिरता मध्ये मी आणि ते आपल्यातून वेगळे होती ।
माया मोह यांचे घर गावात उठून दिसे ।
आपुलकी मात्र त्या घरासमोरी तळ ठोकून बसे ।
नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते.