सहजीवन

वैवाहिक सहजीवन

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 September, 2023 - 01:44

पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.

शब्दखुणा: 

एका लग्नाची दशकपूर्ती

Submitted by नादिशा on 28 August, 2020 - 07:11

पंधरा ऑगस्ट ला भारतातील सर्व लोकांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच आमच्या घरात अजून एक आनंद वाहत होता . तो दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता , खूप गोडकडू आठवणींचा पिसारा सोबत घेऊन आलेला होता , कारण त्या दिवशी असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस !यावर्षी हा दिवस आमच्यासाठी अजून खास होता , कारण त्या दिवशी होती, आमच्या लग्नाची दशकपूर्ती !

त्या दिवसभरात सुहृदांच्या शुभेच्छा घेता घेता त्यांच्या कोपरखळ्यांनाही आम्हाला दरवेळी तोंड द्यावे लागते, "असा काय दिवस निवडला तुम्ही लग्नासाठी?" "सगळ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले या दिवशी आणि तुम्ही मात्र पारतंत्र्यात!"... वगैरे.. वगैरे..

विषय: 
शब्दखुणा: 

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

शब्दखुणा: 

चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे.

हिच तर गंमत असते........

Submitted by सौ. वंदना बर्वे on 10 November, 2012 - 03:45

मंदा बऱ्याच दिवसांनी भेटली. प्रेमविवाह केल्यापासून ती एवढी खूष होती की विचारू नका. मनासारखा जोडीदार मिळाला होता. दोघेही कमावती होती. सगळं हेवा वाटावा एवढं सुरळीत चाललेलं. पण जेंव्हा भेटली तेंव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता.

"तो कसं असा वागू शकतो?"
"काय झालं?"
"एवढा सुशिक्षित, सो कॉल्ड सभ्य, मी....."
"अगं नीट सांग काय झालं"

नंतर तिनं जे सांगितलं त्याने मी हादरूनच गेले. वरवर दिसणार सौख्य हे दूरून दिसणाऱ्या डोंगराएवढच साजरं होतं.

शब्दखुणा: 

सविताची वेदना

Submitted by सौ. वंदना बर्वे on 6 November, 2012 - 13:27

आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात. फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात. तो अनुभव आपल्या अनुभवांशी, विचारांशी पडताळून पाहण्याचा मोह आवरू म्हणता आवरत नाही. माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? अनेक पुरुषांचं टिपिकल उत्तर असेल भरजरी साड्या व भरजरी भानगडी. स्त्री ही मुळातच संवेदनशील असल्याने, ती त्या मालिकेमधल्या पात्रांशी समरस होते. त्यांचे प्रोब्लेम्स तिला आपले वाटतात. समरस व्हायला संवेदनाच असून भागत नाही, वेदनाही असावी लागते.

शब्दखुणा: 

मेगा मॉल

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 31 January, 2011 - 09:06

पांढर्‍याशुभ्र गुळगुळीत फरशीवर पडलेलं गाळीव ऊन
डिम लायटिंगवाली चमकदार टॉयलेटं
आडोशातली टेबलं अडवून बसलेली प्रेमी युगुलं

नुक्त्याच उठून गेलेल्या एका कपलच्या टेबलावरचे
स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि सॉसचे शिंतोडे त्याने पुसून घेतले
आणि
उरलेला कपं, प्लेटी आणि पेपर नॅपकिनांचा कचरा तिने आवरून घेतला

टेबलानं त्यांच्या सहजीवनाकडे कृतज्ञता व्यक्त केली...

ते दोघं एकमेकांना पाहून सहजच हसले.

आल्हाद
२.४१ दुपार
३१ जाने ११

स्थळ: मेगा मॉल, ओशिवरा

Subscribe to RSS - सहजीवन