लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती

Submitted by भागवत on 14 June, 2020 - 03:48

लॉकडाउनचा आत्ता ५.० टप्पा चालू आहे. या टप्यात भरपूर मोकळीक मिळाली आहे. पण या अगोदरच्या टप्प्यात पुष्कळ प्रमाणात निर्बंध होते. टीव्हीवर सगळी कडे करोना बाबत नकारात्मक वातावरण होते. त्याच-त्याच बातम्या बघून कंटाळा यायचा. मी टीव्ही वर त्याच-त्याच ब्रेकिंग न्यूज बघणंच सोडून दिले. कोणाला बाहेर जाऊन बोलता येत नव्हते. किंवा चित्रपट तर किती वेळ बघणार. या कठीण प्रसंगाच्या काळात समाज माध्यमा वरील काही व्यक्तीनी मला खूपच प्रभावित केले. मग अश्या वेळेस सोशल नेटवर्क हेच विरंगुळा साधन असते. इथे सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी असतात. पण त्यातील ३ व्यक्तीचा सोशल मिडियावर अतिशय सकारात्मक वापर केला आहे.

त्यातील पहिल्या आहेत “वीणा श्रीवाणी”. “श्रीवाणी” या अतिशय उत्कृष्ट वीणा वादन करतात. “श्रीवाणी” फेसबुक वर नियमितपणे आपली कला सादर करत असतात. त्यांनी “ब्रेंथलेस” हे शंकर महादेवनचे गाणे वीणेतून सूर झंकारून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. “वीणा” बॉलीवूड, तेलुगु, तमिळ, कन्नड मधील गीतं, त्या सोबत भावगीत, भक्तिगीत, संगीत, यावर उत्तम सादरीकरण करतात. जेव्हा कलाकार कलेचा स्वत: आस्वाद घेतात तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा त्या कलाकृतीत अत्यंत रस निर्माण होतो. सादरीकरण करताना “श्रीवाणी” स्वत: कलेशी एकरूप होतात. त्यामुळे त्यांचे प्रत्येक सादरीकरण मंत्रमुग्ध करते. मी त्यांची जुनी फेसबुक लाईव्ह, पेज पाहीले. चेहर्‍यावर स्मित हास्य ठेऊन, हसत खेळत, संगीताशी एकरूप होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा त्याच्या सादरीकरणाचा विशेष गुण आहे. संगीतात त्यांचे मोठे नाव होणार हे नक्की. त्यांनी स्वत:चा एक खास प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होणारच आहे. त्यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षी पासून वीणा शिकणे चालू केले आहे.

यातील दुसरे आहेत दंतकथांचा किंवा पौराणिक कथेचे अभ्यासक “देवदत्त पटनाईक”. यांचे पौराणिक कथेवर विपुल लेखन आहे. “देवदत्त” हे प्रथीतयश आणि नामवंत लेखक आहेत. अतिशय उत्तम मांडणी, वैचारिक खाद्य आणि दंतकथा, पौराणिक कथेची साध्या भाषेतील उकल, त्यामुळे देवदत्त यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे मा‍झ्या सारख्या लोकांसाठी पर्वणीच असते. विविध विषयाचा ऊहापोह, वेगळी दृष्टी आणि वैशिष्ट्यपूर्ण, वेगळा विचार देणारी चर्चा. त्यामुळे लॉकडाउन मध्ये फेसबुक, Instagram लाईव्ह अतिशय उत्तम असतात. मी देवदत्त यांची बरीच पुस्तके वाचली आहेत. काही पुस्तके भेट सुद्धा दिली आहेत. “देवलोक देवदत्त सोबत” हा कार्यक्रम सुद्धा चांगला होता. या कार्यक्रमाच्या दोन मालिका अतिशय गाजल्या.

यातील तिसरे स्थान “मैथिली ठाकूर” यांनी पटकावले आहे. हिंदी, गाणे, संगीत, भाव गीत, इतर गाणे उत्कृष्ट रित्या सादरीकरण करतात. मैथिलीचे गायन, रिषभचे तबला वादन, आणि अयाची ठाकूरची साथ अशी ही त्रयी जबरदस्त आहे. काही दिवसापूर्वी या त्रयींनी मराठी भजन उत्तम रित्या सादर केले होते. “मैथिलीने” आत्ता पर्यंत जीवनात खूपच संघर्ष केला आहे. टीव्ही reality शो ते फेसबुक लाईव्ह, पेज वर आणि त्याद्वारे स्वत:ची गायिका म्हणून ओळख निर्माण करणे खूपच अवघड आहे. लॉकडाउन मध्ये त्यांची फेसबुक, Instagram लाईव्ह अतिशय उत्तम असतात. मैथिलीचे स्वत:चे लाखो चाहते आहेत. फेसबुकवर लाखो लाईक, कॉमेंट द्वारे ही चाहते मंडळी या त्रिकुटावर वर्षाव करत असतात. देश, विदेश, विविध कार्यक्रमात आपली कला सादर करून त्यांनी एक वेगळीच उंची गाठली आहे. .

या तिन्ही व्यक्तींनी लॉकडाउन मध्ये आपली कला सादर करून लाखो लोकांची मन जिंकली आहेत आणि आपल्या चाहत्यांना संगीता, चर्चे आणि गाण्या द्वारे मन जिंकले आहे. लॉकडाउन मध्ये फक्त विरंगुळा न राहता सकारात्मक वातावरण निर्मिती साठी सहभाग नोंदवला त्यासाठी त्रयीचे विशेष अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!!!
images (8).jpeg
देवदत्त पटनाईक
images (9).jpeg
वीणा श्रीवाणी
images (10).jpeg
मौथिली ठाकूर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझे आवडते युट्यूब चॅनेल म्हणजे, कॅरीमिनाटी आणि सध्या गाजत असलेली नजमाँ आपी एकेए सलोनी गौर (Salonayyy) कंसातले तीचे चॅनेलचे नाव आहे, आणि नजमा आपी त्यांचे एक पात्र. बाकी याशिवाय मी दुसरे चॅनेल फारसे पाहत नाही फक्त तेवढे काही ट्रॅव्हल व्लॉग्जचे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत, जिथे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रवास करतात आणि त्या ठिकाणी विषयी माहिती देतात.