भाग ७
https://www.maayboli.com/node/71844
"तळेगाव हे सरदार दाभाड्यांच्या जहागिरीमधील एक महत्वाचं गाव, मात्र तळेगाव कायम गाजत राहिलं ते इथल्या अमानवीय गोष्टींमुळेच. छत्रपतींच्या काळापासून ते इंग्रजांपर्यंत या गावाने अनेक आख्ययिका ऐकल्या, दंतकथा बनवल्या. पण सगळ्यात गाजलेली दंतकथा असेल ती हंसराजाची. ज्याच्या वाड्यात तुम्ही राहतात."
त्याने एक कपाट उघडलं. त्या कपाटातून एक बाड काढलं.
...बाहुलीच्या गाठोड्यात असलेलं बाड....
"तळेगावात सर्वात आधी मी वाड्यावरच गेलो होतो. तिथे ही वस्तू सापडली."
"ते पूर्णपणे कोरं आहे." मी म्हणालो.
"प्रत्येक कागदाची एक किंमत असते... कधीकधी पैसा, कधीकधी वस्तू, कधीकधी..."
त्याने हात पुढे केला.
मी गोंधळलो.
"तुमचाही हात द्या."
मी हात समोर केला. त्याने एका धारदार टोक असलेल्या सुईने टचकन बोटाला टोचले. एक थेंब रक्त बाहेर आलं.
"त्या बाडावर तो थेंब टाका."
मी तसंच केलं.
हळूहळू त्या बाडावर अक्षरे उमटू लागली.
त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागलं.
--------------------------------------
::हंसराज आणि दाभाडे::
--------------------------------------
जसजसा सूर्य उगवला, तसतशी गावातली लगबग वाढली. एरवी गावात कायम शांतता असली, तरी आज लोकांना एक अनामिक घाईने पछाडले होते.
तळेगावचा वाडा मात्र या सर्वांमध्ये दिमाखात उभा होता. वाड्याची तटबंदी आज रंगरंगोटी करून स्वागताला सज्ज होती. दरवाज्याला झेंडू, शेवंती इत्यादी फुलांच्या माळेने शोभा आणली होती. तटबंदीपासून थोड्सचं आत गेल्यावर मजबूत काळ्या कातळातील वाडा स्वागत करत होता. वाड्याच्या अभेद्य सागवानी दरवाजाच्या बाजूला दोन धिप्पाड दरवान पहारा देत होते. दरवाजासमोर मोठ्या विहिरीच्या आकाराची रांगोळी काढली होती, व झेंडूच्या पाकळ्यांनी ती सुशोभित केली होती.
ही सगळी तयारी बघून कुणीतरी मोठी असामी आज वाड्यावर येणार असल्याची सगळ्यांना खात्री पटली.
गावापासून काही कोसांवरून घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागला, आणि गाव थरारलं. हळूहळू धुळीचे लोट उडवत एक जथ्था गावाच्या दिशेने येऊ लागला.
सुमारे पन्नास घोडेस्वार, सहा हत्ती, पाच पालख्या आणि तीनशे पायदळ यासमवेत तो जत्था गावात आला.
गावात आल्याबरोबर त्यातील बरीच मंडळी पांगली, मात्र काही मोजक्या घोडेस्वारांनी हत्ती व पालख्यांसह वाड्याच्या तटबंदीत प्रवेश केला, त्याचबरोबर सनईच्या मंजुळ स्वरांनी व नगार्याच्या गडगडाटी आवाजाने वाडा दुमदुमला.
हत्तीवरून एक धष्टपुष्ट व्यक्ती उतरली. कुणाच्याही उरात धडकी भरवेल, असं ते व्यक्तिमत्व होतं. साडेसहा फूट उंची, काळा रापलेला चेहरा, चेहऱ्यावर जखमांचे व्रण, काळ्या झुपकेदार मिशा, गुळगुळीत राखलेली दाढी, पंधरा अंगरखा आणि पांढरी विजार.
'धर्मवीर, दानशूर, युद्धशिरोमणी... सरदार दाभाडेंचा विजय असो.'
सरदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
एव्हाना पालखींचीही हालचाल झाली. चारही पालख्यांमधून डोक्यावर पदर घेऊन चार स्त्रिया उतरल्या. पाचवी पालखी मात्र अजूनही स्थिर होती.
वाड्यातून घाईघाई एक स्त्री बाहेर आली. तिने अंगभर केशरी वस्त्र परिधान केले होते, डोक्यावरून पदर घेतला होता.
"चंद्रसूर्यापर्यंत सरदारांची विजय पताका अक्षय्य राहो."
तिने सरदारांना ओवाळले, आणि त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या.
मात्र सरदारांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी आठी आली.
'हंसराजाला कुणी सवाष्ण मिळाली नाही?'' एक घोडेस्वार हलकेच कुजबुजला.
"चलावं सरदारसाहेब," त्या स्त्रीने आत इशारा केला.
सर्वजण आत निघाले.
वाडयाच्या आतला आवार प्रचंड मोठा होता, तीन मजले मावतील, एवढ्या उंचीवर छत होतं आणि त्यावर उंची उंची झुंबरे लटकत होती. भिंतींवर दीड पुरुष उंचीच्या काही तसबिरी होत्या. त्यात आपली तसबीर बघून सरदार सुखावले.
तसबिरींच्या खालीच सागवानी कपाटे होती. त्यात मात्र वेगवेगळ्या आकाराच्या, चेहऱ्याच्या बाहुल्या ठेवण्यात आल्या होत्या. शेकडो बाहुल्यानी ती कपाटे भरली होती.
रेशमी थरांनी काही खुर्च्या मढवल्या होत्या, आणि त्या रांगेत मांडल्या होत्या. शेवटी थोड्या उंचीवर एक अतिप्रचंड गादी ठेवली होती, व तिच्यावर लोड, टक्के यांची रेलचेल होती.
सरदार आत प्रवेशताच खुर्चीवरचे लोक अदबीने उभे राहिले.
गादीवर मात्र एक नमुना बसला होता. अतिशय धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या त्या तरुणाने मात्र चेहऱ्याला एखाद्या सुंदरीला लाजवेल अशी रंगरंगोटी केली होती. दाढी व मिश्या असल्याचं चिन्ह दिसू नये, म्हणून त्याने अक्षरशः कातडी सोलवटून काढल्याचं दिसत होतं. भुवया व्यवस्थित कोरून त्याने त्या गडद काळ्या केल्या होत्या. चेहऱ्यावर पांढरा रंग फासून त्यावर हलकासा लाल रंग लावला होता. वाढलेले केस चापून मागे बांधले होते.
"यावे मालक, किती दिवसांनी... हीही..." तो टाळ्या पिटत खाली उतरला आणि दाभाडेंना सामोरं गेला. त्याने बळेच दाभाडेंना मिठी मारली. ते बघून काही घोडेस्वार गालातल्या गालात हसले.
"चलावं." त्याने दाभाडेंना हात धरून वर नेले, आणि गादीवर बसवले. तोही गुढघ्यावर समोर बसला.
तेवढ्यात एका सेवकाने एक तबक आणले. आणि दाभाडेंसमोर धरले.
दाभाडेंनी त्या तबकावरच कापड दूर केलं.
आत एक कोंबडीच्या आकाराचा मोती चमकत होता.
सरदारांचे डोळे विस्फारले.
"एक छोटीशी भेटवस्तू... आमच्या प्रेमाखातर... " तो लडिवाळपणे म्हणाला.
दरबारात जाणवण्याइतकं हास्य पसरलं.
"ही भेटवस्तू आणली कुठून?" दाभाडेंनी विचारले.
"निजाम...."
"हैद्राबाद?"
"हो, मागच्याच आठवड्यात गेलो होतो. निजामाचं आमच्यावर फार प्रेम हो, आल्याआल्या प्रेमाने त्यांनी गळाच आवळला. मग काय तो शामियाना, काय ती अत्तरे, काय त्या उंची खजूर, द्राक्षे सगळंच अप्रतिम! जेवण तर काय सांगू? बावीस प्रकारचे तर नुसतेच कबाब. माझं मेल्याचं चव घेतानाच पोटं भरलं."
वाड्यातील लोक मोठ्या मुश्किलीने हसू आवरत होते.
"निजामाने त्याच्या सगळ्या परिवाराच्या बाहुल्या माझ्याकडून बनवून घेतल्या. अगदी हुबेहूब बनल्या. निजामाच्या उजव्या भुवईवर मध्येच जखमेमुळे केस नाहीत. तेही हुबेहूब उतरले हो. इतका खुश निजाम, की हा मोतीच भेट दिला. चांगला महिनाभर मुक्काम ठोकणार होतो, पण अचानक निजमाचे लहान बंधू वारले. दुःखघरी पाहुणे म्हणून राहणं ठीक नसल्याने परतलो. पण निजामाचे बंधू म्हणजे प्रचंड राजबिंडे हो! अशी माझ्या हाताने त्यांची बाहुली बनवली, पण ते गेले, बाहुलीच राहिली. मग मी आलो परत."
"तेवढीतरी रितिभात हाय म्हणायची." दाभाडेनी शब्द उच्चारले.
वाड्यात खसखस पिकली.
"काहीतरीच तुमचं." तो हसला.
सरदार दाभाडेना त्यांच्या जहागिरीतील हा वाडा पेशव्यानी परस्पर एका बाहुलीवाल्याला देणं मुळीच पसंत नव्हतं. किंबहुना पेशवेही या मागणीने जरा नापसंतच होते. पण अंतःपुरातुन आज्ञा झाल्यावर पेशव्याचाही नाईलाज झाला होता.
"पण, हंसराज, निजामाला फक्त बाहुली पाहिजे होती की, अजून काही?" दाभडेंच्या एक खूषमस्कऱ्याने एक भुवई बारीक करून विचारले.
"म्हणजे?" हंसराजचा आवाज आता थोडा बदलला होता.
"निजामाला बाईबरोबर बाईमाणसाचा देखील शौक आहे म्हटलं, म्हणून विचारलं हो."
आणि दरबारात एकच हास्यकल्लोळ उडाला.
मात्र बाजूलाच दाभाडेना एक विचित्र हालचाल जाणवली.
"...नाही..." ते ओरडले.
एका तलवारीच्या घावाने त्या खुशमस्कऱ्याचे मस्तकापासून चिरत दोन तुकडे झाले होते.
"हंसराज, तुमची ही हिम्मत?" सरदार ओरडले.
"सरदारसाहेब...."
सरदारांच्या अंगात एक भीतीची शिरशिरी उमटून गेली.
एका खोल डोहातून यावा, तसा हंसराजचा आवाज येत होता.
"तुम्ही हत्तीच्या पायी आम्हाला दिलं, तरीही हरकत नाही. पण आमचा मान आम्हांला मिळाला पाहिजे."
क्षणार्धात तो आवाज घुमला, वातावरणात मिसळला...
वातावरण विषारी वायूने भारल्यासारखं झालं.
"सरदारसाहेब, सोडा, तुम्हाला मी माझा मस्कऱ्या देतो. सोडा ना हा राग... माझ्यासाठी???" हंसराज नेहमीच्या लडिवाळपणे म्हणाला.
आणि क्षणार्धात वातावरण पूर्ववत झालं...
मात्र सरदारांच्या मनात भीतीच्या सावलीने प्रवेश केला होता, ती सावली मोठीमोठी होत होती....
तलेगावात मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाला होता!!!!
छानच....... तळेगाव दाभाडे
छानच....... तळेगाव दाभाडे
अनपेक्षित ट्विस्ट! पुभाप्र!!
अनपेक्षित ट्विस्ट!
पुभाप्र!!
भारीच लिहिलंय. महाश्वेता
भारीच लिहिलंय. महाश्वेता ताईंना कसा वाटला हा भाग हे जाणून घ्यायला आवडेल.
Chan ahe as usual... Next
Chan ahe as usual... Next part lvkr plzzz
छान, पुढच्या भागाच्या
छान, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. एक वेगळीच कलाटणी.
मस्त!
मस्त!
छान चाललेय कथा. वाचतेय.
छान चाललेय कथा.
वाचतेय.
More than 6 months .. liha ki
More than 6 months .. liha ki saheb ata
.... Ata free ahes na
किती वाट बघायला लावताय??
किती वाट बघायला लावताय??
एक पांचट विनोद मारायची इच्छा होतेय. तसं मी मारणार नव्हते पण ठीके घ्या समजून... "तुम्ही नाही ना अज्ञतवासात गेलात?"
भारी लिहिलंय, पुभाप्र.
भारी लिहिलंय, पुभाप्र.
बऱ्याच दिवसांनी हा धागा वर
बऱ्याच दिवसांनी हा धागा वर दिसला! आजकाल मी बऱ्याच गोष्टी विसरत चाललोय...
एक पांचट विनोद मारायची इच्छा होतेय. तसं मी मारणार नव्हते पण ठीके घ्या समजून... "तुम्ही नाही ना अज्ञतवासात गेलात?"

>>>
हे स्टेटमेंट भारी आहे.
इच्छा आहे पण मारणार नव्हते तरीही समजून घ्या? हा काय प्रकार आहे?
इट्स लाईक 'बुलाती है, मगर जानेका नही, लेकीन फिरभी चलते है'
आणि डोन्ट वरी, अपुन इधरइच है. तसही मी अज्ञातवासी नाहीच, इथे बऱ्याच आयडीना मी नाव पत्त्यासहित माहिती आहे...
Nav patta srv mahit aahe ..
Nav patta srv mahit aahe ...yeu lockdown smpl ki bhetayla ... Ata Story liha ..
इच्छा आहे पण मारणार नव्हते
इच्छा आहे पण मारणार नव्हते तरीही समजून घ्या? हा काय प्रकार आहे? Lol >>> ते आपलं उगाच, कोणाला कधी कसला राग येईल सांगता येत नाही बुवा आजकाल...
तसही मी अज्ञातवासी नाहीच, इथे बऱ्याच आयडीना मी नाव पत्त्यासहित माहिती आहे... >>> यात मी नाही ना... आपका ना कोई नाम है ना कोई पता...
Nav patta srv mahit aahe ...yeu lockdown smpl ki bhetayla ... >>> मला पण यायचं
Nav patta srv mahit aahe ..
....
अरे भांडू नका, सगळ्यांना
माझ्या पत्त्यासाठी हा धागा. (सोपं पडेल यायला असं वाटतय
https://www.maayboli.com/node/69772
अरे भांडू नका, सगळ्यांना
..
Sorry.. mi asch sahaj maskari
.
बिलकुल नाही दुखावलो गेलो ग,
कितीदा एडिट करशील, वाचलं मी सगळं....

बिलकुल नाही दुखावलो गेलो ग, खरंच खूप स्टोरीज पेंडिंग आहेत, आणि आता मलाही लाज वाटते.
आणि उर्मिला मुंबईला बरेच मायबोलीकर आहेत. तुझ्याचकडे एखादं मोठं गटग करू.
(अर्थात स्टोरी संपवली नाही तर तू मला घरात घेणार नाहीस म्हणा
पण सध्या नाशिकलाच घरातून बाहेर पडायचे वांदे झालेत.
अज्ञा तुम्ही नाशिककर....????
अज्ञा तुम्ही देखील नाशिककर....????
इट्स सिक्रेट (बट ओपन)
इट्स सिक्रेट (बट ओपन)

आता बाकीची चर्चा धाग्यावर नको. आधीच मी माझ्या धाग्यावर बऱ्याचदा गप्पा मारतो असा आरोप झालाय
Lockdown संपला की भेटू
Lockdown संपला की भेटू
नक्की!!!
नक्कीच!
अज्ञातवासी , जयश्री साळुंके -
अज्ञातवासी , जयश्री साळुंके - साधना मिसळ ला भेटायचे का?
उडा मला चालेल...
उडा मला चालेल...
माझ्यामते लॉकडाऊन संपल्यावरच
माझ्यामते लॉकडाऊन संपल्यावरच ठरवू.
(कारण साधना मिसळ हेट लिस्ट मध्ये फार वर आहे.)
उत्तम लेखनशैली! तुमचे अलिकडे
उत्तम लेखनशैली! तुमचे अलिकडे पोस्ट केलेले लेखही वाचले. विषयवैविध्य कौतुकास्पद आहे. आता ह्या लेखाचे आधीचे भाग शोधून वाचते.
आता बाकीची चर्चा धाग्यावर नको
आता बाकीची चर्चा धाग्यावर नको. आधीच मी माझ्या धाग्यावर बऱ्याचदा गप्पा मारतो असा आरोप झालाय >>> मग कुठे???
कारण साधना मिसळ हेट लिस्ट मध्ये फार वर आहे.>>>> सेम टु सेम
#metoo
#metoo