#कथा

कथाशंभरी - बदल - मामी

Submitted by मामी on 3 September, 2022 - 14:56

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

*************************************************

त्या बाकावरची नजर न हलवता तिने दुसरीला इशारा केला. दोघेजण तिथे बसले होते. आजूबाजूच्या जगाला विसरून. एकमेकांच्या नजरेत नजर, हातात हात आणि ओठही जुळलेले.

विषय: 
शब्दखुणा: 

बटू (शतशब्द कथा)

Submitted by ध्येयवेडा on 7 May, 2022 - 01:07

"आता प्रत्येकाने आपल्या डाव्या हाताने बटूच्या पायावरून एक एक पळी अर्घ्य सोडावे. उजव्या हातात ते जमा करून तीर्थ समजून प्राशन करावे"

एक एक जण आला,
कोणी ओलं बोट ओठांना लावलं,
कोणी केवळ हात तोंडाजवळ नेला,
कोणी ओला हात केसांवरून फिरवला.
अगदी शेवटी ती आली आणि तिनं अर्घ्य दिलं. बटूच्या पायावरून ओघळणारा शेवटचा थेंब जमा झाल्यानंतर, उजव्या हातात जमा झालेलं तीर्थ तिनं मनोभावे प्राशन केलं..

ती परतताना बटूचा हात आशीर्वाद देण्यासाठी वर आलेला मी बघितला.

- भूषण

शब्दखुणा: 

तिची डायरी

Submitted by ShabdVarsha on 17 August, 2021 - 01:02

त्या दिवशी ती सकाळी लवकर उठली व सर्व कामे लगबगीने आवरू लागली. नाश्ता वगैर सर्व तिने अगदी ठरलेला वेळेत पुर्ण केले. नवीनचं लग्न करून सासरी आलेली ती जरा विचारात हरवलेली असायची. सर्व काही वेळेत होवो कुणी बोलणार तर नाही ना याच विचारात. त्या दिवशी सासूबाई घरी नसल्यामुळे तिची चिंता वाढलीच होती.
"पाखी! माझं वाॅच भेटत नाही ये जरा शोधून देतेस का?"

विषय: 

८ ते १२ वयोगटाच्या मुलांसाठी गोष्टी

Submitted by अनघा दातार on 27 July, 2021 - 09:13

माझ्या आईने एका orphanage मधल्या मुलांसाठी गोष्टींचा व्हिडीओ केला आहे. करोना मुळे तीकडे जाउन गोष्टींचा कार्यक्रम करता येत नसल्यामुळे व्हिडीओ करुन युट्यूब वर गोष्टी अपलोड केल्या आहेत. जर तुमच्या कोणाची मुले या वयोगटात असतील आणी मराठी समजत असेल तर जरुर बघा.
https://www.youtube.com/playlist?list=PL9AA6NhvUU7I5Gn76Y45SouaEbSzKlq6M

विषय: 

निर्णय

Submitted by pintee on 28 May, 2021 - 02:42

" आई, काय ग कशी वागतेस तू. तुला ना कधी कसं वागायचं ते समजतच नाही. शी, लाज आणतेस कधी कधी." श्वेताचे जळजळीत शब्द ऐकून सीमा अगदी अवाक झाली.
" अग काय झालं काय एवढं?"
" आणि वर मलाच विचारतेस? का केलास तू मुग्धाच्या आईला फोन?" आपले संतापातिरेकाने भरलेले डोळे दिसू नयेत म्हणून श्वेता पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. सीमा हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिली.
तशा श्वेताच्या दिवसभरात लहान मोठ्या कुरबुरी चालूच असायच्या पण आताची वेळ वेगळी आहे हे लक्षात आल्यावर सीमा तिच्या खोलीत गेली.
"श्वेता, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, इकडे येऊन बस."

विषय: 
शब्दखुणा: 

परीक्षा

Submitted by Rohan_Gawande on 14 January, 2021 - 13:16

"चला आटपा लवकर, किती वेळ झाला मी बाहेर बसलो आहे"

आराम खुर्ची वरून प्रतापरावांनी आवाज दिला. कॅलेंडर मध्ये एप्रिल महिना लागला होता, त्याच बरोबर लग्न आणि रिसेप्शन चा मौसम ही सुरु झाला होता. संध्याकाळ ची सुंदर वेळ होती, तुलशी जवळ दिवा तेवत होता. नुकताच अंगणात शिंपडलेल्या सड्यामुळे एक मंद मृदगंध हवेत पसरला होता. प्रतापराव व्हरांड्यामध्ये आराम खुर्ची वर बसून हलका झोका घेत होते.
इकडे घरामध्ये राकेश आणि त्याची आई तयार होत होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #कथा