मालकी
।। श्री ।।
।। श्री ।।
आधीच्या भागांची लिंक
भाग १ - http://www.maayboli.com/node/40847
भाग २ - http://www.maayboli.com/node/42011
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077
भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134
भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252
भाग ६ - http://www.maayboli.com/node/42292
पुढे..
अनेक कारणांनी आत्याबाईंच्या कित्येक गोष्टी मनातच राहिल्या. वेळ परत्वे, ईतर कारणाने लिहीणे झालेच नाही. पण आता लिहायचे ठरवले आहे. गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला.
त्यातूनच हा आत्याबाईंच्या गोष्टीतला ३ रा भाग लिहून झाला.
पहिल्या २ भागांच्या लिक्स खालील प्रमाणे.
आत्याबाईंच्या गोष्टी - १
आत्याबाईंच्या लहानपणची गोष्ट.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
ज्ञानेश्वरी समजावून घेताना....
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||
सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||
"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.
हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
पडले ते ऊनच होते,
खोटे ते मृगजळ होते,
आनंदातही पाझरणारे,
अश्रू ते अश्रूचं होते!
हारले ते ससे होते,
जिंकले ते कासव होते,
क्षमतेला डावलणारे,
ते आळसाचे नमुने होते!
हसणारे ते नेत्र होते,
हसवणारे ते किस्से होते,
काळासोबत गळून पडलेले,
ते ह्रदयाचे हिस्से होते!
वाटा त्या मोकळ्या होत्या,
रिकामे हे जग होते,
रस्ता सापडूनही चुकलेले,
हतबल ते वाटसरु होते!
घडल्या त्या मूर्त्या होत्या,
बनले ते शिल्प होते,
प्रहारांनी रक्ताळलेले,
दगड ते दगडचं होते!
तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब..
निमित्त फक्त एका भेटीचे
परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.