गद्यलेखन

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 6 December, 2012 - 02:28

वसंत ऋतु नुकताच सुरू झाला होता. एका गुलाबी थंडीत सकाळचा नाश्ता नुकताच संपवून मी आणि होम्स बेकर स्ट्रीट वरील आमच्या खोलीत भट्टीची आल्हाददायक ऊब शेकत बसलो होतो. खिडकीसमोरच्या ओळीने पसरलेल्या करड्या रंगाच्या घरांच्या रांगांमधून धुक्याचा एक दाट ढग तरंगत चालला होता. त्याच्या पिवळसर आच्छादनात लपेटलेल्या त्या घरांच्या खिडक्या अंधुक, धुरकट दिसत होत्या. आम्ही नाश्ता केलेल्या मेजावर अजूनही चीनी मातीची भांडी व प्लेट्स इत्यादी सामन तसेच पडले होते. शेरलॉक सकाळपासूनच शांत शांत होता. गेल्या काही दिवसांतल्या वर्तमानपत्रांतले जाहिरातींचे रकाने बारकाईने वाचण्यात तो गढून गेला होता.

प्रवास.....

Submitted by Anvay on 5 December, 2012 - 01:30

ती आणि तो रेल्वे स्टेशनवर ..
निशब्द शांततेत दोघे स्टेशनच्या पायऱ्या उतरू लागले. गाडीची वेळ होत आली होती. रेल्वेत बसल्यानंतर तिने एकवार त्यच्याकडे पहिले. तोही तिच्याकडेच बघत होता, पण आज त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. काही समजत नव्हते. किती वर्षांची मैत्री ती पण असे कधी जाणवले नाही त्याला.

सहजीवन

Submitted by abhishruti on 5 December, 2012 - 01:28

तुमच्या कधी असं लक्षात आलयं का एक असं चित्र, जिथे आपण एकाच माणसाला काम करताना पहातोय आणि बाकीचे सारे आरामात बसलेत. अगदी लहानपणापासून, म्हणजे मला कळायला लागले तेंव्हापासून, मला हे दृश्य अजिबात आवडत नाही. मग ते घ्ररात असो वा बाहेर! लहानपणी वाटलं नव्हतं की हे आपल्याला वारंवार पहायला लागेल. कारण आमच्या घरी अगदी घर साफ करण्यापासून ते दिवाळी, लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमापर्यंत सगळ्या कामात घरातील सर्व सभासदांचा थोडा सहभाग असायचा. मग आजोबा असोत, मोठ्ठे काका असोत की छोटा पाच वर्षाचा बंड्या असो प्रत्येकाला जमेल ते काम तो तो माणूस करत असे, तशी कामाची विभागणीही केली जात असे.

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... (एक अत्यंत टुकार गद्यकविता)

Submitted by चैत रे चैत on 4 December, 2012 - 11:48

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...

-- इतरत्र पूर्वप्रकाशित

दोस्ती (भाग २)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

अखेर आज तो दिवस उजाडला. आज तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस. लहानपणी इंडियात जायचं म्हटलं की तिला राग यायचा. हा देश तिला कधीच आवडला नाही. पण आज इथेच ती तिचा संसार उभा करणार होती. नाझियाला आपण कुठे आहोत तेच कळत नव्हतं, मधेच तिने मान वर करून रेहानकडे पाहिलं. शेरवानीत एकदम वेगळा दिसत होता. तिचा ड्रेस तर त्यानेच बनवला होता. .. How romantic ...

निकाहची नमाज पढून झाली.. मुल्लासाहेब आता कुराणमधले आयत दोघाना वाचून दाखवत होते.

प्रकार: 
शब्दखुणा: 

समारंभ

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 3 December, 2012 - 11:02

आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.

शब्दखुणा: 

दोस्ती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ही कथा जुन्या मायबोलीवरची आहे. त्यावेळेला या कथेचे नाव फ्रेंड असे ठेवले होते. इथे नविन मायबोलीवर दोस्ती असे नाव दिलेले आहे.

हा माझा कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न. थोडाफार बालिश आहे पण तरी आवडेल असी आशा करते.

आपल्यापैकी कित्येकांनी ती वाचलेली आहे. आता नविन मायबोलीवर आणत आहे. माझ्या बहुतांश कथांप्रमाणे या कथेचा शेवटदेखील गंडलेला होता; आता शेवट बदलत आहे Happy (अन्यथा रिमेक कसा म्हणणार?)
असं आधी म्हट्लं होतं खरं पण शेवट बदलता आला नाही; त्याबद्दल दिलगीर आहे. (दुसर्‍या कुणाला नविन शेवट सुचत असल्यास मलादेखील सुचवाच) Proud

प्रकार: 

अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ५ (अंतिम) (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)

Submitted by निंबुडा on 3 December, 2012 - 05:12

‘देव अजब गारुडी’-बहिणाबाई चौधरी यांना आदरांजली

Submitted by किंकर on 2 December, 2012 - 22:45

अचानक एखादा गुप्त धनाचा साठा समोर यावा आणि त्यातल्या रत्नजडीत दाग-दागिन्यांनी डोळे दिपून जावेत तशी अवस्था एकदा आचर्य प्रल्हाद केशव अत्रे यांची झाली होती. त्याला कारणही तसेच होते. आपल्या अशिक्षित आईच्या तोंडून ऐकलेल्या काव्य रचनांच्या हस्तलिखिताची वही भीतभीतच अभिप्रायासाठी सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या समोर ठेवली होती.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन