गद्यलेखन

अवतार

Submitted by शैलेंद्रसिंह on 15 January, 2013 - 22:52

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

शब्दखुणा: 

१ फेब्रुवारीपासून गुलमोहरात झालेले बदल

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 14:47

दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.

लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः

आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)

गाय वासरू छाप गोमुत्र

भारतीय

डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)

गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)

देवपूरकर

या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.

==========================

विवाहसंस्था मर्यादीत केल्यास...

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 06:48

सद्य परिस्थितीत ढवळून निघालेले वातावरण, मायबोलीवर अश्या स्वरुपाचे काही धागे येणे यातून मनात जे आले ते लिहीत आहे. उत्स्फुर्त भावनेतून लिहीत असल्यामुळे आगापीछा ( / मेरिट्स - डिमेरिट्स) चा विचार केलेला नाही. तो विचार चर्चेतून होईलसे वाटत आहे.

आशीर्वाद

Submitted by विजय देशमुख on 15 January, 2013 - 05:57

घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.

कांती शाह नावाच कल्ट

Submitted by बावरा मन on 15 January, 2013 - 03:17

काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.

तेथे पाहिजे जातीचे..

Submitted by चिमण on 14 January, 2013 - 08:34

ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! सदानं घड्याळात पाहिलं.. सकाळचे १० वाजले होते. 'बायकोचा फोन असणार! श्या! आज काय विसरलं बरं? पण लँडलाईनवर कसा आला?'.. मेंदुला ताण देत सदा पुटपुटला. छातीची धडधड कारच्या २५ किमी वेगाइतकी झाली. त्यानं फोन घेतला. सदा प्रोजेक्ट मॅनेजर असला तरी घरची प्रोजेक्टं मॅनेज करणं म्हणजे मेदुवड्याच्या रेसिपीने बटाटेवडे करण्यातला प्रकार!

'हॅलो! सडॅ स्पेअर आहे का?'.. इंग्रजीतून विचारणा झाली. अमेरिकन उच्चार कळत होते.. स्वर थोडा वैतागलेला वाटत होता. बायकोचा फोन नाहीये म्हंटल्यावर सदाची धडधड कारच्या आयडलिंग इतकी कमी झाली.

आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १

Submitted by टीम गोवा on 14 January, 2013 - 07:17

सूड (संपूर्ण)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.

प्रकार: 
शब्दखुणा: 

नरभक्षी भाग १

Submitted by बेधुंद on 12 January, 2013 - 08:17

वेळ रात्रीचे ११ ,

डॉ.रावते आपले क्लिनीक बंद करुन निघण्याच्या तयारीत होते,सायंकाळ ची ओ.पी.डी. संपली होती,त्यांनी श्यामला , त्यांच्या कंपाऊंडरला, क्लिनीक चा मुख्य दरवाजा बंद करायला सांगितले,नर्स व रिसेप्शन वरची मुलगी दोघेही थोड्या वेळापुर्वीच पेशंट संपले तसे घरी गेले होते.डॉ.रावते दोन मिनीटे खुर्चीत बसुन उद्या लागणार्या पेशंटचे रिपोर्ट लॉकर मध्ये ठेवत होते,ते काम संपले,आता ते रिसेप्शनिस्ट ने आणून दिलेले पैसे मोजत होते.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन