गद्यलेखन

साक्षात्कार

Submitted by श्रीराम-दासी on 7 January, 2013 - 05:42

साक्षात्कार!

जगता जगता अगणित वेळा माणसाच्या आयुष्यात साक्षात्काराचे प्रसंग येतात. दैनंदिन जीवनात येण्यार्‍या सर्वसाधारण अनूभुतींना साक्षात्कारचे नाव दिले तर हा शब्द, त्याचा अर्थ, आणि त्या अर्थाचे गांभीर्य हे सगळंच अगदी बोथट होऊन जाईल. पण तरीही.. खरोखरच ज्याला ’साक्षात्कार’ म्हणता येईल असं आपल्या आयुष्यात कितीदा घडतं?

शब्दखुणा: 

दुनियादारी ! दुनियादारी !!

Submitted by सागर कोकणे on 4 January, 2013 - 09:43

दुनियादारी हे एक व्यसन आहे.

दुनियादारी म्हणजे तरुणाई ! दुनियादारी म्हणजे प्रेमभंग ! दुनियादारी म्हणजे अतूट मैत्री ! दुनियादारी म्हणजे कोमेजलेले बालपण ! दुनियादारी म्हणजे नियतीने केलेली फसवणूक ! दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण !

शब्दखुणा: 

आपले ब्रह्मांड - लेख

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2013 - 01:13

आपले छंद या मासिकात हा लेख प्रकाशित झाला. त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे देत आहे.

-'बेफिकीर'!

====================================

माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका गुरफटलेला असतो की त्याला याचेही भान राहात नाही की त्याचे आयुष्य क्षणभंगुर आहे. जेथे स्वतःच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयीचेच भान नाही तेथे आपल्या विश्वात, या ब्रह्मांडात काय चालले आहे व का चालले आहे याचे भान कुठले असायला.

"ते" - ४

Submitted by मुरारी on 3 January, 2013 - 00:58

भाग १: http://www.maayboli.com/node/38066
भाग २: http://www.maayboli.com/node/38133
भाग 3 : http://www.maayboli.com/node/39907

'जयदीप .. हो जयदीपच. तू परत आलायस इथे , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये . दत्त दत्त '

शब्दखुणा: 

नेमकं तेव्हाच.....

Submitted by मुग्धमानसी on 3 January, 2013 - 00:29

नेमका तेव्हाच संचारतो काळोख दिवसाच्या अंगात!
नेमका तेव्हाच एकमताने ठराव पास होतो ढगात... कि आता बरसायचं आहे...
अगदी तेव्हाच लख्ख कोरडं रहायचा निश्चय केलेल्या मला... चिंब चिंब भिजवायचं आहे!

हळवेपणाची कात टाकून खंबीर व्हायचं ठरवते... नेमकी तेव्हाच कातरवेळ होते
मग आकाशात रंग... गार गार वारे...
पानांची सळसळ... अंगावर शहारे...
बुडणारा सूर्य... गळणारं पान...
परतणारे पक्षी... सुटलेलं भान...
तशातच नेमकी कुठलीशी आठवण...
आणि मघाच्या निश्चयाची सपशेल बोळवण!!

भास हे भासच असतात.
झोपल्यानंतर होऊ लागले तर त्याला स्वप्न म्हणतात...
आणि जागेपणी होऊ लागले तर त्याला तंद्री म्हणतात...

शब्दखुणा: 

हरवलेल्या पाऊलखुणा...

Submitted by मुग्धमानसी on 2 January, 2013 - 01:20

इथं... इथं एक झाड होतं...
हिरव्या पानांचं... लाल लाल फुलांचं...
--- जळून गेलं! मागचा वणवा जरा मोठाच होता!

आणि... आणि इथला झरा...?
झुळूझुळू बोलक्या पाण्याचा...
---आटलाय आता. उन्हं फारच कडक!

मी विचारत राहीले, आणि तू सांगत राहीलास...
आपणच एकत्र चाललेच्या रस्त्यावर, आपल्या पाऊलखुणा मी शोधत राहीले...
आणि तू न थकता देत राहिलास... त्यांच्या पुसलं जाण्याची निमित्त्य!

पण मी कुठं विचारलाय तुला कसला जाब?
मी कुठं म्हटलंय तुला कि माझ्यासोबत जरा थांब...
तुझे साथी वेगळेच.... ते राहिलेत आता लांब!
खरा तू तिथंच आहेस... त्यांच्यासोबत... त्यांच्यासाठी...

शब्दखुणा: 

सहा शब्दांच्या कथा

Submitted by अनंत ढवळे on 1 January, 2013 - 10:21

सहा शब्दांच्या कथा :
-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

तेजोभंग

Submitted by प्रकाश कर्णिक on 31 December, 2012 - 04:51

tejobhang.jpgहरीअप्पा प्रभुदेसाई नेहमी प्रमाणे बरोबर गजर होण्याच्या काही क्षणच अगोदर जागे झाले. खरं तर आज तरी असं होण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी आजचा पहाटे पाचचा गजर लावला होता जरी नेहमी ते साडे पाचला उठत. त्यांना आपल्या शिस्तीचं कौतुक वाटलं. ते जागे पण उजव्या कुशीवर झाले होते याचा अर्थ आजचा दिवस चांगला सुरु झाला असा त्यांनी कयास बांधला. आपल्या शिसवी पलंगावरून त्यांनी पाय खाली घेतले आणि ते उठून बसले. पलंगावरील त्यांच्या डाव्या बाजूच्या खिडकीकडे त्यांनी नजर टाकली पण बाहेर अजून अंधारच होता.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन