गद्यलेखन

कहाणी राजपुत्राची

Submitted by पाषाणभेद on 18 May, 2013 - 12:50

कहाणी राजपुत्राची

आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.

घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.

शब्दखुणा: 

काश्मिर – १

Submitted by vaiju.jd on 16 May, 2013 - 12:22

॥ श्री ॥
अठ्याऐंशी साली मे महिन्यात आम्ही काश्मिरला गेलो. मी, नवरा आणि पाहिलीतून दुसरीत गेलेला मुलगा. बरोबर सांगलीचे मोठे दीर, जाऊ, त्यांच्या दोन मुली, भाऊजींचे दोघे मित्र फॅमिलीसह अशी तेरा माणसे. श्रीनगरमध्ये आम्ही उतरलो ते हॉटेल बंगाली होते. जेवणात माश्याचे पदार्थ मुख्यत्वेकरून मिळायचे. आम्ही देशपांडे मंडळी शाकाहारी. रात्री जेवायला बाहेर जायचे असे ठरवले. पहीले दोनतीन दिवस बरोबर नेलेल्या गोड पोळ्या, परोठे पुरले. मग बाहेर जेवणे क्रमप्राप्त झाले.

“वसंत – स्पर्श चैतन्याचा”

Submitted by vaiju.jd on 15 May, 2013 - 11:19

।। श्री ।।

नुकतीच फुटू लागली चैत्र पालवी, वसंताची झळाळी पानोपानी नवी ।

कुठे गुलाबी कुठे पोपटी नाजुक रंगकळा, सृष्टीचा साज असे आगळा |

लालकेशरी गुच्छ घेउनी उभा गुलमोहोर, आम्रही सुगंधी निजमोहोर ।

सुवर्ण पिवळे घोस झुलवित उभा असे बहावा, वसंताचा उत्साह दाटला नवा ।

लॉंग ड्राईव्ह

Submitted by मुग्धमानसी on 9 May, 2013 - 03:59

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
रस्त्यावरती एकाचवेळी धावत असतं बरंच काही...
एक गाडी, चार चाकं, दोन मनं...
एक नशिब, लक्षावधी विचार अन्... काही अल्वार स्वप्नं...

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
स्टिअरिंग व्हीलवर आवळलेली त्याची दणकट मूठ
आव्हान देतेसे वाटते समोर पसरलेल्या सगळ्याच वाटांना...
आणि उघड्या खिडकिच्या कडेवर विसावलेली तिची नाजूक बोटं
भूल घालत रहातात त्याच्या आकाशभर पसरू पहाणार्‍या वितभर कर्तृत्वाला

मध्येच पहातो तो तिच्या डोळ्यांत... शोधतो काहितरी... त्याला हवंसं...
पण तिची नजर लांब आभाळात... शोधत असते काही नवंसं...

शब्दखुणा: 

धागा

Submitted by कोकण्या on 8 May, 2013 - 08:32

गझले वरच्या गझला वाचुन आणि त्यातिल प्रतिसाद पाहुन एक फुटकळ काव्य सुचले ते इथे टाकत आहे. त्यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी हे डीलिट करुन टाकेन.

(आणि इथे ते सुट होत नसेल तर इतरत्र हलविन्यात येयिल)

एक टाइम पास प्रयत्न

कोणाचा हा धागा
कोणाचा हा त्रागा
कोण भरे रागा
कळेनाचि!!

गझलेच्या बागा
करुनिया रोगा
करमे ती भोगा
फळेनाचि!!!

सरांचा तो सोगा
देउनिया दगा
ओढण्याचा त्रागा
संपेनाचि!!

कोण म्हने उगा
फोडतो हा फुगा
कवटाळी खगा
रुचेनाचि!!

कोन इथे सगा
पांघरुनी झगा
देयीलही दगा
मीळेनाचि!!

दुःख

Submitted by श्रीराम-दासी on 8 May, 2013 - 05:21

"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्‍यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."

शब्दखुणा: 

ऋतुराज – वसंत

Submitted by vaiju.jd on 3 May, 2013 - 12:45

॥ श्री ॥

‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा

बहरल्या दिशा दहा!

कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!

रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘

ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन