स्फुट ३८ - मदनिका अवतरली देवळात

Submitted by बेफ़िकीर on 16 December, 2016 - 01:11

मदनिका अवतरली देवळात!
अत्याधुनिक पोषाख!
उतू चाललेलं यौवन!
स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाची योग्य जाणीव!
देवापुढे उभी राहिली हात जोडून, डोळे मिटून!
काहीतरी पुटपुटत होती थोडा वेळ!
मग डोळे उघडले!
दोन प्रदक्षिणा घातल्या घायाळ करणार्‍या चालीने!
प्रसाद घ्यायला गुरुजींपुढे उभी राहिली!

ध्यानमग्न बसलेला एक पेन्शनर
डोळे वासून बघत राहिला तिच्याकडे
ध्यान सोडून!

मुलाला उचलून घंटा वाजवायला मदत करणारा बाप
मुलाला तसाच धरून बघत बसला तिच्याकडे!

कसलेसे स्तोत्र म्हणणारी एक विवाहिता
स्तोत्र पुटपुटताना
नजर खिळवून राहिली तिच्यावर

एक कॉलेजकुमार
देवाबरोबरचे नमस्कार चमत्कार सोडून
तिचे कर्व्ह्ज आणि उफाडा न्याहाळत राहिला

आणि गुरुजी!
तिच्या हातावर प्रसाद ठेवताना,
क्षणभर त्यांनीही रोखून पाहिले

देवळातल्या यच्चयावत भक्तांच्या
भक्तीत आला एक अडथळा!
क्षणातच श्रद्धेची जागा घेतली सामान्यत्वाने!
देवाची जागा घेतली त्या आकर्षक युवतीने
डोळ्यांमधील शांततेची जागा घेतली अधाशीपणाने

केवळ एका क्षणात
देवळातील सगळ्या अध्यात्मिक वातावरणावर
भक्तीरसाने ओथंबलेल्या पावित्र्यावर
वासनिक ओरखडे उठले

आणि ती....
ती स्वतःच्याच नादात निघून गेलीही

मी गाभर्‍यात डोकावलो
तसा देवही चपापला!

================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी .... लिवता राव तुम्ही...
देव हि चपापला! .... +++

केवळ एका क्षणात
देवळातील सगळ्या अध्यात्मिक वातावरणावर
भक्तीरसाने ओथंबलेल्या पावित्र्यावर
वासनिक ओरखडे उठले++++१११११११११११

आठवल्या काही नजरा .......:राग:

आवडले !

नाही पटलं ! अस म्हणतात श्रावणात डोळे गेलेल्यास सर्वत्र हिरवळच दिसते.

मी गाभर्‍यात डोकावलो तसा देवही चपापला!
तो बहुतेक इंद्र असावा. देवांचा राजा! (कु) प्रसिद्ध आहे तो, दिसली बाई की चळला!
वासनिक ओरखडे - मस्त वर्णन.

मुळ कल्पना उत्तम आहे पण दोन गोष्टी खटकल्या :

मी गाभर्‍यात डोकावलो
तसा देवही चपापला!

>> इंद्र सोडून असे कामं कुणी करत नाही. इंद्राचं मंदिर असतं का? मी अजून पाहिलं नाही

तुम्ही म्हटलंय की श्रद्धेची जागा वासनेने घेतली. पण पुजा करणाऱ्या बाईनेपण त्या मुलीकडे बघितलं होतं. तिनेपण वासनेने बघितलं असा अर्थ निघतोय. Was she lesbian ? असेल तर तसा उल्लेख हवा होता.

Was she lesbian ? असेल तर तसा उल्लेख हवा होता.
हो सगळे कसे स्पष्ट पाहिजे. आस्ट्रोनॉट लोकांना असे गुळमुळीत चालत नाही, जरा जरी चूक झाली कुठेहि तरी चंद्रावर जाण्याऐवजी कुठेतरी नाहीसे होतील.
आणि स्पष्ट करणार असाल तर मला देवळातील इतर सर्व लोकांची सर्व माहिती पाहिजे, किती शिकले, लैंगिक वर्तन, देवळात का आले होते? नेहेमी येणारे होते का? वगैरे.

४३ साहेब, माझा प्रश्न एवढाच् आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे वासनेच्या दृष्टीने का बघते?

ती तर निघुन गेली न केव्हाच मग आता चर्चा करून काय उपयोग Lol एक आपला भाबड़ा प्रश्न
पुरेशा पुराव्या अभावी सर्वजण निर्दोष कारण पुरावा तर केव्हाच निघुन गेला न देवळातुन Wink